ETV Bharat / state

यंदाही पुन्हा जुनाच डायलॉग! पावसाळ्यात मुंबई तुंबणारच नाय; मुख्यमंत्र्यांना विश्वास - Monsoon 2024 Review Meeting

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 24, 2024, 9:59 PM IST

Updated : May 24, 2024, 10:32 PM IST

CM Review Meeting : मुंबई दरवर्षी पावसाच्या पाण्याने तुंबते. यंदा ही स्थिती उद्‌भवू नये यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महत्त्वाच्या विभागांच्या प्रमुखांशी बैठक घेतली. यावेळी त्यांनी विभाग प्रमुखांना आवश्यक त्या सूचनाही दिल्या.

CM Review Meeting
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (ETV Bharat Reporter)

मुंबई CM Review Meeting : आज मान्सूनपूर्व बैठक महापालिकेच्या मुख्यालयात घेण्यात आली. या बैठकीला एनडीआरएफ, एचडीआरएफ, रेल्वेची टीम, पोलीस आयुक्त यांची टीम, नेव्ही, आर्मी यांची टीम तसेच मंत्री केसरकर, पालिका अधिकारी उपस्थित होते. तसेच या बैठकीत मानसून पूर्व जी तयारी करावी लागते याबाबत आढावा घेण्यात आला आणि संबंधित अधिकाऱ्यांना सूचनाही देण्यात आल्या. पावसाळ्यापूर्वी शंभर टक्के नालेसफाई झाली पाहिजे आणि नाले सफाई होताना जोपर्यंत हार्ड बेस लागत नाही तोपर्यंत नालेसफाई झाली पाहिजे. नाल्यातून काढलेला गाळ बाहेर काठावर न ठेवता त्याची विल्हेवाट लावण्यात आली पाहिजे. अशा प्रकारच्या सूचना बैठकीत अधिकाऱ्याना देण्यात आल्या, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीनंतर माध्यमाशी संवाद साधताना सांगितले.

पाणी तुंबनार नाही : मुंबई ज्या ठिकाणी पाणी साचते त्या ठिकाणी हाय प्रेशरचे पंप तैनात ठेवावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. जेणेकरून तुंबलेले पाणी पाईपद्वारे बाहेर काढता येईल. त्याचबरोबर जिथे पाणी साचते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्टोरेज यंत्रणा म्हणजे ते तुंबलेले पाणी स्टोरेज करता येईल अशी यंत्रणा बसवण्यात येणार आहे. याचसह नालेसफाई होत असताना नाल्यांची तोंड अरुंद करण्यात यावीत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुंबईत जवळपास एक लाख मेनहोल आहेत. यावर सुरक्षित जाळी बसविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच फुटपाथवरील गटारे, याच्यावरील झाकण नीट बसविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

तर अश्यावर कारवाई : तसेच रेल्वे, एमएमआरडीए, म्हाडा आणि रेल्वे यांच्या हद्दीतील नाले आणि गटारे याची सफाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच अनधिकृत hording आहेत, त्यावर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जे आहेत ते किती बाय कितीचे आहेत याची चौकशी करा. तसेच जिथे रस्त्याचे काम सुरू आहे. तिथे पाणी साचणार नाही किंवा लोकांना याचा त्रास होणार नाही याबाबत चर्चा झाली. जिथे पाणी साचते तिथे अधिक यंत्रणा मजबूत आणि सक्षम असावी असे आदेश देण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुंबईत सिमेंटचे रस्ते करणार असे आधीच सरकारने सांगितले आहे. पुढील 40 वर्ष ही रस्ते टिकतील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

हेही वाचा :

  1. ड्रायव्हर गाडी चालवत होता हे दर्शवण्याचा प्रयत्न, पण गाडी अल्पवयीन मुलानेच चालवली - पुणे पोलीस आयुक्त - Pune Hit And Run Case Update
  2. राज्यातील 48 मतदारसंघांत कोण मारणार बाजी? तुमच्या भागाचा कोण खासदार? जाणून घ्या 'ईटीव्ही भारत'चा खास रिपोर्ट - Lok Sabha Election 2024
  3. आमदार शून्य, खासदार एक अन् रामदास आठवलेंना कॅबिनेट मंत्रिपदाचं वेध - RPI President Ramdas Athawale
Last Updated : May 24, 2024, 10:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.