अजित पवार यांच्या नावाची कोनशिला तोडफोडप्रकरणी प्रशांत जगताप यांच्यासह 8 जणांवर गुन्हा

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 24, 2024, 11:04 PM IST

Prashant Jagtap

उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या नावाच्या कोनशिलेची तोडफोड केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह 8 जणांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रशांत जगताप यांची प्रतिक्रिया

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयातून अजित पवार यांच्या नावाचा कोनशिलेची तोडफोड केल्या प्रकरणात शरदचंद्र पवार यांच्या पक्षाच्या 9 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा देखील समावेश आहे.

कोणशीला कार्यकर्त्यांनी फोडल्याचा आरोप : सात महिन्यांपूर्वी अजित पवार यांनी पक्षात बंडखोरी केल्यामुळं राष्ट्रावादी फूट पडली. त्यानंतर अजित पवारांनी पक्षाच्या प्रमुख नेत्यांसह शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा जाहीर करून सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं राष्ट्रवादीत दोन गट पडले. त्यानंतर निवडणूक आयोगानं शरद पवार यांच्याकडून पक्षाचं घड्याळ चिन्ह, काढून अजित पवारांना दिलं. त्याविरोधात शरदचंद्र पवार पक्षानं आंदोलन केलं. तेव्हा पक्ष कार्यालयात अजित पवार यांच्या नावाची कोणशीला कार्यकर्त्यांनी फोडल्याचा आरोप आहे. त्यावरून शरदचंद्र पवार पक्षाच्या 9 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.


"निर्भया सभेत ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर हल्ला झाला. मात्र त्या प्रकरणातील हल्लेखोर मोकाट फिरत आहेत. माझ्या गैरहजेरीत घोषणा देणाऱ्या दलित कार्यकर्त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्यानं आमच्यावर अशा प्रकारे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. हे अत्यंत दुर्दैवी आहे. 23 वर्षे ज्यांच्यासोबत आम्ही काम केलं, ते अजित पवार एव्हढे बदलतील असं वाटलं नव्हतं", असं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले.

'या' नऊ जणावर गुन्हा दाखल : याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाच्या लावण्य मुकुंद शिंदे (रा. शिवाजीनगर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी प्रशांत जगताप यांच्यासह सुषमा सातपुते, अरबाज जमादार, प्रियंका सोनवणे, वंदना मोडक, प्रियंका खरात, अक्षता भिमाले, दीपाली कवडे, लखन वाघमारे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेव्हा ही घटना घडली तेव्हा, पोलिसांच्या मध्यस्थीने हा वाद मिटवण्यात आला होता, मात्र आता या प्रकरणी अजित पवार गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी पोलिसांत फिर्याद दिल्यानं शरद पवार गटातील नऊ जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सविता सपकाळे अधिक तपास करत आहेत.

हे वाचलंत का :

  1. आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल; शिवजयंतीला वाघाची शिकार केल्याचं वक्तव्य भोवलं
  2. "40 वर्षांनी शरद पवार रायगडावर गेले, अजित पवारांना क्रेडिट तर द्यावच लागेल", देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी
  3. वरळी कुणाचाही बालेकिल्ला नाही, राहुल नार्वेकर यांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.