ETV Bharat / state

चौथीपासून बेस्ट फ्रेंड्स, दहावीत देखील दोघींना मिळाले 100 गुण, प्राजक्ता आणि सृजाचं होतय कौतुक - Prajakta Naik Sruja Ghanekar story

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 27, 2024, 5:54 PM IST

Updated : May 27, 2024, 6:30 PM IST

Prajakta Naik Sruja Ghanekar story : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीचा निकाल आज जाहीर केला गेला. यामध्ये पुण्यातील महादेव सदाशिव गोळवलकर गुरुजी महाविद्यायात शिकणाऱ्या प्राजक्ता नाईक आणि सृजा घाणेकर या दोन्ही मैत्रिणींना दहावीच्या परीक्षेत शंभर पैकी शंभर गुण मिळालेत. (100 Percent in 10th Class) विशेष म्हणजे या दोघीही चौथ्या वर्गापासूनच बेस्ट फ्रेंड आहेत. शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये या दोघींचं कौतुक केलं जात आहे.

Schlor Student In 10th Class
प्राजक्ता आणि सृजाचं यश (ETV Bharat Reporter)

पुणे Prajakta Naik Sruja Ghanekar story : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यंदा देखील या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे. (SSC Result 2024) नऊ विभागांपैकी कोकण विभागाचा निकाल हा अव्वल लागला आहे तर नागपूर विभागाचा निकाल हा सर्वांत कमी लागला आहे. अशातच पुण्यातील महादेव सदाशिव गोळवलकर गुरुजी महाविद्यायात शिकणाऱ्या प्राजक्ता नाईक आणि सृजा घाणेकर या दोन्ही मैत्रिणींना दहावीच्या परीक्षेत शंभर पैकी शंभर गुण मिळाले आहेत.

प्राजक्ता आणि सृजा त्यांच्या यशाबाबत ईटीव्ही भारत प्रतिनिधीशी बोलताना (ETV Bharat Reporter)

निकाल पाहून थक्कच झाले : याबाबत प्राजक्ता नाईक आणि सृजा घाणेकर म्हणाल्या की, आम्ही दोघी बेस्ट फ्रेंड्स असून चौथीपासून सोबत आहोत. आम्ही परीक्षेचा एकत्र अभ्यास केला आहे. आज (27 मे) निकाल लागत असताना मनात खूप धाकधूक होती. पास होऊ हे निश्चित होतं; पण टक्के किती पडतील याबाबत खूपच धाकधूक होती. एक वाजता निकाल लागणार असल्यानं अर्धा तास आधीच आम्ही निकाल बघत होतो. जेव्हा निकाल लागला आणि पाहिलं की शंभर टक्के मिळाले आहे तर विश्वासच बसत नव्हता; पण आता खूपच आनंद वाटत आहे की जे परिश्रम केलं आहे त्याचं चीज झालं आहे.

दोघींनीही एकत्रच केला अभ्यास : आम्ही दोघींनी एकत्र अभ्यास केला असून कुठेही शिकवणी लावली नव्हती. परीक्षेत वेगवेगळ्या वर्गात होतो; पण अभ्यास करत असताना एकत्र अभ्यास केला असून आता आम्हा दोघींना शंभर टक्के मिळाले असल्याने खूपच आनंद होत असल्याचं यावेळी या दोघींनी सांगितलं.

कोकण विभागाने मारली बाजी : यंदा राज्यात दहावीचा निकाल 95.81 टक्के लागलाय. तर यावेळीही निकालात कोकण विभागानं बाजी मारलीय. 99.00 टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल ठरला आहे. तर 94 टक्क्यांसह नागपूर विभाग शेवटचा आलाय. तसंच यावेळी देखील दहावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. 97.21 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांच्या निकालाची टक्केवारी 94.56 टक्के असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे. तसंच परीक्षेत यशस्वी न होऊ शकलेल्या विद्यार्थ्यांनी जुलैमधील पुरवणी परीक्षेला बसावं, असं आवाहनही यावेळी शरद गोसावी यांनी केलं. दहावीच्या परीक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांच्या निकालाची एकूण टक्केवारी 94.86 टक्के इतकी आहे. तर या परीक्षेत 135 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण प्राप्त झाले आहेत.

हेही वाचा :

  1. दहावीचा निकाल जाहीर; 135 विद्यार्थ्यांना मिळाले 100 टक्के गुण! - Maharashtra SSC Result 2024
  2. राजकोट गेम झोन अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ आला समोर; ठिणगीनं 2 मिनिटांत घेतला पेट - Rajkot TRP Game Zone Fire
  3. केकेआरनं आयपीएलची ट्रॉफी उचलताच 'मिस्टर आणि मिसेस माही'चा स्टेडियमवर जल्लोष - IPL 2024
Last Updated : May 27, 2024, 6:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.