ETV Bharat / state

भाजपाकडून उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार, बावनकुळे, शेलार यांची ट्विटद्वारे टीका

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 10, 2024, 8:13 PM IST

Shelar criticized Uddhav Thackeray माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. त्याला उत्तर देत भाजपानेते आशिष शेलार आणि बावनकुळे यांनी ठाकरेंना लक्ष्य केलंय. एक्स म्हणजेच आधीच्या ट्विटरवर त्यांनी पोस्ट करुन ठाकरेंना खडे बोल सुनावले आहेत.

शेलार
शेलार

मुंबई Shelar criticized Uddhav Thackeray : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला भाजपाकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी एक्स आधीच्या ट्विटच्या माध्यमातून जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 100 कोटींची वसुली, पत्रा चाळीतून मराठी माणसांची लूट, पालघर साधू हत्याकांड, यावरही एकदा मनसोक्त बोला, असं आव्हान बावनकुळे यांनी दिलं आहे.

कळीच्या मुद्यांवर कधी बोलणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लांडग्यासारखे वागत आहेत. त्यांना फडतूस, कलंक हे शब्द कमी आहेत. ते मनोरुग्ण आहेत, कायद्याचे धिंडवडे निघत असताना हे कुठे आहेत, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केलीय. या टीकेला उत्तर देताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्टिटकरुन जोरदार निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, मुर्खांच्या नंदनवनात वावरणारे सदैव मनोरुग्णालयातच असल्यासारखे वागत असतात. त्यामुळेच त्यांच्या संगतीत न राहता सहकारी त्यांना सोडून जातात. आपली मानसिक अवस्था आम्ही समजू शकतो. पण, त्याचा अर्थ इतरांनाही तसंच समजण्याची गरज नसते, असा टोला बावनकुळे यांनी लगावलाय. तसंच ज्यांनी 2.5 वर्ष ‘वसुलीची गॅरंटी’ दिली, त्यांनी ‘मोदी गॅरंटी’वर बोलायचे नसते, असं सांगत आमची तुम्हाला विनंती आहे, या मानसिक धक्क्यातून स्वत:ला सावरा आणि मनसुख हिरेन, उद्योगपतींच्या घरासमोर स्फोटकं ठेवणे, वाझेची 100 कोटींची वसुली, पत्रा चाळीतून मराठी माणसांची लूट, सोशल मीडियातून लिहिणार्‍यांना घरात बोलावून मारहाण, कोविड काळात पत्रकारांना जेल, याकुबच्या कबरीवर रोषणाई, पालघर साधू हत्याकांड, खिचडी घोटाळा, सत्ता टिकविण्यासाठी दिल्लीत मुजरे करण्यावरही एकदा मनसोक्त बोला,असं आव्हानच त्यांनी दिलं आहे.


खरे 'लोमडी' कोण? - आशिष शेलार यांनी ट्विटच्या माध्यमातून पलटवार करताना म्हटलं आहे की, ज्या कुटुंबाचे तुम्ही स्वतःला प्रमुख म्हणवून घेता, त्या कुटुंबातील घोसाळकरांचं दु:ख काळीज कुरतडून टाकणारं आहे. घोसाळकरांच्या घरचा प्रसंग काय? याचं तरी भान ठेवा. अशावेळी हे तथाकथित कुटुंब प्रमुख बोलतात काय? करतात काय? असा सवाल शेलार यांनी उपस्थित केलाय. तर शब्दांच्या कोट्या? टोमणे? मारण्यात यांना स्वारस्य आहे. त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे, किंबहुना सगळ्यांसाठीच हा प्रसंग दु:खाचा आहे... अशावेळी उध्दव ठाकरे सत्तेसाठी धडपड करीत आहेत. त्यामुळे खरे 'लोमडी' कोण? हे जनतेनेच ओळखावे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

हे वाचलंत काय...

  1. राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून उद्धव ठाकरेंची बोचरी टीका, आता फडणवीसांनीही दिलं सणसणीत उत्तर
  2. "राज्याला मनोरुग्ण गृहमंत्री लाभलाय का?", उद्धव ठाकरे आक्रमक; राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.