ETV Bharat / state

भाजपाच्या प्रचार सभेत पंतप्रधानपदी राहुल गांधींचं नाव; ऐकून सगळेच झाले अवाक् - Lok Sabha Election 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 1, 2024, 8:32 PM IST

Updated : May 1, 2024, 8:42 PM IST

BJP leader Shoumika Mahadik Video
BJP leader Shoumika Mahadik Video

BJP leader Shoumika Mahadik Video : भारतीय जनता पक्षाच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष शौमिका महाडिक यांचा कागल शहरातील प्रचार सभेतला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. सभेत त्यांनी पंतप्रधानपदासाठी तुम्हाला कोण हवं? असा प्रश्न विचारला. त्यावर तरुणानं राहुलं गांधींचं नाव घेतल्यामुळं एकच हशा पिकला.

शौमिका महाडिक यांचं भाषण

कोल्हापूर BJP leader Shoumika Mahadik Video : तिसऱ्या टप्प्यात कोल्हापुरात लोकसभेसाठी 7 मे रोजी मतदान होणार आहे. त्यामुळं मतदानाला अवघा आठवडाच उरला असल्यानं प्रचाराचा धडाका सुरू आहे. भारतीय जनता पक्षाच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष शौमिका महाडिक यांनी कागल शहरात प्रचार सभा घेतली. यावेळी बोलताना त्यांनी जनतेला प्रश्न विचारला. तुम्हाला नरेंद्र मोदी पंतप्रधान हवे आहेत की, राहुल गांधी? यावर सभेत बसलेल्या एका कार्यकर्त्यानं राहुल गांधींचं नाव घेतल्यामुळं एकच हशा पिकला. मिळालेल्या उत्तरामुळं महायुतीच्या नेत्यांसह शौमिका महाडिकही अवाक् झाल्या. देश कुणाच्या हातात द्यायचा आहे, असं म्हटल्यानंतर उपस्थितांनी राहुल गांधींचं नाव घेतल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

मुश्रीफ पोट धरून हसले : कोल्हापूरच्या कागलमध्ये महायुतीची झालेली प्रचारसभा चर्चेचा विषय बनली आहे. महायुतीच्या नेत्यासंमोरच तरुणानं चक्क राहुल गांधींच्या हातात देश देणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळं पालकमंत्री हसन मुश्रीफा यांच्यासह व्यासपीठावरील नेत्यांसह उपस्थितीतांमध्ये एकच हशा पिकला. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी कागलमध्ये महायुतीच्या नेत्यांची सभा मंगळवारी पार पडली. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, खासदार संजय मंडलिक यांच्यासह महायुतीचे नेते उपस्थित होते. यावेळी भाजपा नेत्या शौमिका महाडिक यांनी आपल्या भाषणात देश कुणाच्या हातात देणार? नरेंद्र मोदींच्या की, राहुल गांधीच्या? असा प्रश्न केला. त्यानंतर एका तरुणानं चक्क राहुल गांधींच्या हातात, असं उत्तर दिलं. त्यामुळं पालकमंत्री हसन मुश्रीफांसह महायुतीच्या नेत्यामंध्ये हास्याचा फवारा उडाला. हा व्हिडिओ सध्या सर्वत्र जोरदार व्हायरल होत असून ही सभा जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली आहे.

योगी आदित्यनाथ इचलकरंजी गाजवणार : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेचं इचलकरंजीत आयोजन करण्यात आलं आहे. पाच मे रोजी प्रचार सभा थंडावणार असल्यानं देशपातळीवरील मोठे नेते सध्या कोल्हापुरात तळ ठोकून आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचीही सभा कोल्हापुरात होणार आहे. आज सायंकाळी शरद पवार तसंच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्यासाठी सभा घेणार आहेत.

हे वाचलंत का :

  1. मुंबईत शिंदे गटाच्या कमकुवत उमेदवारांमुळं उद्धव ठाकरे गटाला मदत? - LOK SABHA ELECTION 2024
  2. "त्यांचा क्लीन बोल्ड झालाय...", महायुती मुंबईत षटकार मारणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - INDI alliance clean bowled
  3. नाशिकमध्ये महायुतीकडून अखेर हेमंत गोडसेंना उमेदवारी - Hemant Godse candidate from Nashik
Last Updated :May 1, 2024, 8:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.