ETV Bharat / state

'व्हॅलेंटाईन डे'ला बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचा विद्यापीठात राडा; विद्यापीठाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 14, 2024, 9:50 PM IST

Bajarang Dal Activists : छत्रपती संभाजीनगरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी 'व्हॅलेंटाईन डे' साजरा करत असलेल्या जोडप्यांवर हल्ला केला. त्यानंतर दहशत माजवत विद्यापीठात गोंधळ निर्माण केलाय.

Bajarang Dal Activists
Bajarang Dal Activists

'व्हॅलेंटाईन डे'ला बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचा विद्यापीठात राडा

छत्रपती संभाजीनगर Bajarang Dal Activists : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अचानक काही युवकांनी दहशत मजावण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडलीय. हातात लाठ्या-काठ्या घेऊन हे युवक घुसले होते. हे युवक बजरंग दलाचे कार्यकर्ते असून 'व्हॅलेंटाईन डे' साजरा करत असलेल्या जोडप्यांवर हल्ला करण्याच्या उद्देशानं ते आले असल्याची प्राथमिक माहिती मिळालीय. इतर विद्यार्थ्यांनी आरडाओरडा केल्यावर हुल्लडबाजी करणारे पळून गेले. विशेष म्हणजे मुख्य प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक आणि सीसीटिव्ही कॅमेरे असताना हे कार्यकर्ते आत आले कसे? असा प्रश्न उपस्थित होतोय.

विद्यापीठात घुसले बजरंग दल संघटनेचे तरुण : आज 14 फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास हातात लाठ्या-काठ्या आणि तलवार घेऊन काही जणांनी विद्यापीठ परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तोंडाला रुमाल बांधत विद्यापीठात अचानक प्रवेश करत त्यांनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. जोरजोरात दुचाकीवर आवाज करत मुख्य इमारत परिसरात त्यांनी गोंधळ निर्माण केला. मात्र परिसरात असलेल्या विद्यार्थ्यांनी आरडाओरड केल्यामुळं तेथून त्यांनी 'जय श्री राम'च्या घोषणा देत धूम ठोकली. सुरुवातीला दोन गटात वाद किंवा मुलीची छेडछाड झाल्याची शक्यता वाटत होती. मात्र नंतर 'व्हॅलेंटाईन डे' साजरा करणाऱ्या जोडप्यांना चोप देण्यासाठी आले होते. ते बजरंग दलाचे कार्यकर्ते होते अशी माहिती समोर आलीय.

दोन दिवसांपूर्वीच सुरक्षा केली होती कडक : गेल्या 2-3 दिवसांपूर्वीच विद्यापीठांमध्ये काही तरुणांनी प्रवेश करून विद्यार्थिनींची छेड काढण्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. त्यानंतर प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसंच तातडीनं सुरक्षारक्षक तैनात करण्यात आला होता. मात्र बुधवारी विद्यापीठामध्ये सुरक्षारक्षक असताना, हे हुल्लाडबाज तरुण विद्यापीठाच्या आवारात नेमके कुठून आले? हा प्रश्न उपस्थित होतोय. त्यामुळं अजूनही विद्यापीठाची सुरक्षा वाऱ्यावरच आहे, असं स्पष्ट दिसून येतंय. याबाबत विद्यापीठ प्रशासन तातडीनं कारवाई करुन पोलिसांत तक्रार देणार का? हेदेखील स्पष्ट झालं नाही.

हेही वाचा :

  1. आला प्रेमाचा दिवस; या 'व्हॅलेंटाईन्स डे'ला तुमच्या पार्टनरला द्या ‘ही’ सहा खास गिफ्टस्
  2. सिंगल आहात? डोंट वरी... असा साजरा करा 'व्हॅलेंटाईन्स डे'; जाणून घ्या टिप्स
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.