ETV Bharat / state

अटल सेतूवर पहिल्या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन, वाहनांना पर्यायी मार्गावरून जाण्याच्या सूचना

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 17, 2024, 7:08 PM IST

Updated : Feb 17, 2024, 7:32 PM IST

Marathon competition on Atal Setu : शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूवर एमएमआरडीए विभागाकडून रविवार (दि. 18 फेब्रुवारी)रोजी सकाळी मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ही पहिलीच मॅरेथॉन आहे. या मॅरेथॉनमध्ये 5 हजारपेक्षा जास्त धावपटू सामील होणार आहेत.

Marathon competition on Atal Setu in Navi Mumbai
अटल सेतूव रविवारी मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन

मॅरेथॉनचे संचालक व्यंकट रमण यांंनी स्पर्धेबाबत दिली माहिती

मुंबई : Marathon competition on Atal Setu : काही दिवसांपूर्वी उद्घाटन झालेल्या अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूवर एमएमआरडीए विभागाकडून रविवार (दि. 18 फेब्रुवारी)रोजी सकाळी मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे अटल सेतू शिवडी-न्हावाशेवा सी-लिंकवर 17 फेब्रुवारी रोजी रात्री 11 वाजल्यापासून ते 18 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आली आहे. नवी मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. तसंच, अटल सेतूवरून ये-जा करणाऱ्या वाहनांना पार्यायी मार्गावरून जाण्याबाबत सांगण्यात आलं आहे.

वाहनांना पर्यायी मार्ग : पुण्याहून अटल सेतू मार्ग मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना यशवंतराव चव्हाण द्रूतगती मार्गाने बेलापूर, वाशीमार्ग पुढे इच्छितस्थळी जाण्यासाठी मार्ग निश्चित करण्यात आला आहे. तसंच, जुना मुंबई-पुणे हायवे, कोकणातून येणाऱ्या वाहनांना तसेच पनवेलकडून येणाऱ्या वाहनांनादेखील गव्हाण फाटा उरणफाटा वाशीमार्गे पुढे इच्छित जाण्यासाठी मार्ग निश्चित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे जेएनपीटीकडून मुंबईसाठी जाणाऱ्या हलक्या वाहनांना गव्हाण फाटामार्गे उलवे आम्रमार्गे वाशी खाडी पूलमार्गे मुंबईकडे इच्छित स्थळी जाण्यासाठी मार्ग निश्चित करण्यात आला आहे. या वाहतूक नियंत्रण अधिसूचनेतून पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका आणि इतर अत्यावश्यक सेवेतील तसंच, मॅरेथॉनमधील वाहनांना वगळण्यात आलं आहे.

पहाटे 4 ते दुपारी 12 होणार स्पर्धा : एमएमआरडीए विभागाकडून अटल सेतू शिवडी-न्हावाशेवा सी-लिंकवर 18 फेब्रुवारी रोजी पहाटे 4 ते दुपारी 12 या कालावधीत होणाऱ्या मॅरेथॉनला कुठल्याही प्रकारचा अडथळा येऊ नये, तसंच मॅरेथॉन कार्यक्रम सुरळीतपणे पार पडावा, यासाठी अटल सेतू शिवडी-न्हावाशेवा सी-लिंकवर दोन दिवस सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. नवी मुंबई पोलिसांनी याबाबत वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी केली आहे. तसंच, अटल सेतू बंद असलेल्या कालावधीत उरणकडून अटल सेतूवरून जाणाऱ्या वाहनांना गव्हाण फाटा, उरण फाटा, वाशी मार्गे पुढे इच्छितस्थळी जाण्यासाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.

हेही वाचा :

1 IND vs ENG 3rd Test : यशस्वी जैस्वालची इंग्लंडविरुद्ध झंझावाती खेळी, तिसऱ्या कसोटी सामन्यात ठोकलं शतक

2 राजकोट कसोटीत भारतीय संघाला मोठा धक्का; 500 बळी घेणाऱ्या अश्विननं अचानक सामन्यातून घेतली माघार

3 पंचांनी आऊट दिल्यानंतर 20 मिनिटांनी अजिंक्य रहाणे पुन्हा आला फलंदाजीला; आसाम-मुंबई रणजी सामन्यात नेमकं काय घडलं?

Last Updated : Feb 17, 2024, 7:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.