ETV Bharat / state

Firing On Bus And Truck : एक्सप्रेस हायवेवरील गोळीबाराचे धागेदोरे उत्तर प्रदेशात

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 12, 2024, 10:20 PM IST

Firing On Bus And Truck
खाजगी बसवर गोळीबार

Firing On Bus And Truck : रविवारी मध्यरात्री अमरावती नागपूर एक्सप्रेस हायवेवर खाजगी बसवर गोळीबार (Firing Case) करणारे आरोपींनी ट्रक चालकाला मारहाण करून चोरून नेलेला ट्रक हा मध्य प्रदेशात आढळून आला आहे. नांदगाव पेठ पोलिसांना या प्रकरणाचे धागेदोरे थेट उत्तर प्रदेशात असल्याची माहिती मिळाली आहे. या गंभीर प्रकरणात आता नांदगाव पेठ पोलीस उत्तर (Nandgaon Peth Police) प्रदेशात आरोपींचा शोध घेणार आहे.

अमरावती Firing On Bus And Truck : नागपूर येथील काही भाविक शेगावला एका खाजगी बसने दर्शनासाठी गेले होते. परत येताना अमरावती येथील श्रीअंबा देवीचं दर्शन घेऊन हे भाविक रविवारी रात्री नागपूरच्या दिशेने निघाले असताना, नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या (Nandgaon Peth Police Station) हद्दीत त्यांच्या बसचा पाठलाग करून बसवर गोळीबार (Firing Case) करण्यात आला होता. या घटनेत बस चालक जखमी झाला असताना देखील त्याने बस मधात न थांबवतात थेट तिवसा येथे थांबवला होता.

ट्रक मध्य प्रदेशात आढळून आला : खाजगी बस थांबवण्यात आरोपींना यश आलं नसताना याच मार्गावरून येणारा एक ट्रक आरोपींनी अडवला. आरोपींनी ट्रकचालकास बांधून मारहाण केली आणि ट्रक घेऊन पळ काढला होता. या घटनेमुळं एक्सप्रेस हायवेवर (Amravati Nagpur Express Highway) प्रचंड दहशत पसरली होती. नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकारातील आरोपी हे उत्तर प्रदेशचे असावेत असा अंदाज खाजगी बस चालकाने दिलेल्या माहितीवरून व्यक्त करण्यात आलाय. दरम्यान, चोरट्यांनी पळविलेला ट्रक मध्य प्रदेशात आढळून आला असून हे आरोपी उत्तर प्रदेशचे असल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली आहे.



गुन्ह्याचा लवकरच उलगडा : अमरावती नागपूर एक्सप्रेस हायवेवर झालेल्या गोळीबार प्रकरणातील आरोपी हे उत्तर प्रदेशात गेल्याची माहिती समोर आलीय. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक रवाना झाले आहेत. या गुन्ह्याचा उलगडा लवकरच होईल असा विश्वास, पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा -

  1. Mumbai Railway Station Rename : मुंबईतील रेल्वे स्थानकांना मिळणार नवी ओळख; ब्रिटिशकालीन स्थानकांचं होणार नामांतर
  2. Modi Language : छत्रपती शिवरायांमुळे प्रचारात आली मोडी लिपी; जिल्हा परिषद शाळेतील दुसरीच्या विद्यार्थ्यांनी शिकून रचला इतिहास
  3. Rahul Gandhi News: राहुल गांधी, शरद पवारांसह संजय राऊत येणार एकाच व्यासपीठावर, 14 मार्चला चांदवडला सभा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.