ETV Bharat / state

Accident On Pune Bangalore Highway : पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; ट्रकनं मजुरांना चिरडलं, चार जण ठार

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 18, 2024, 9:26 AM IST

Accident On Pune Bangalore Highway
अपघातग्रस्त ट्रक

Accident On Pune Bangalore Highway : सिमेंट काँक्रीटची मशीन लावताना ट्रकनं चिरडल्यानं चार मजूर ठार झाले. हा भीषण अपघात पुणे बंगळुरू महामार्गावर रविवारी रात्री घडला. या अपघातात 8 मजूर जखमी झाले असून त्यांना सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

कोल्हापूर Accident On Pune Bangalore Highway : सिमेंट काँक्रीटची मिक्सर मशीन रस्त्याच्या कडेला लावताना मागून आलेल्या भरधाव ट्रकनं मजुरांना चिरडल्यानं चार मजुरांचा मृत्यू झाला. या अपघातात इतर सात मजूर गंभीर जखमी झाले. हा अपघात पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाठार (ता. हातकणंगले) येथील पुलाजवळ रविवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास घडला आहे. सचिन धनवडे (वय 40) बाबालाल इमाम मुजावर (वय 50), विकास वड्ड (वय 32),आणि श्रीकेश्वर पासवान (वय 60) अशी अपघातात ठार झालेल्या मजुरांची नावं आहेत.

Accident On Pune Bangalore Highway
अपघातग्रस्त ट्रक

भरधाव ट्रकनं मजुरांना चिरडलं : शिये गावातील रियाज कन्स्ट्रक्शन या स्लॅब टाकणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरचे मजूर आपलं काम आटोपून भादोले या आपल्या गावाकडं टेम्पो क्रमांक एसएच 09 सीए 9090 नं निघाले होते. सिमेंट काँक्रीटचे मिक्सर मशीन जोडून हे मजूर परत येत होते. यावेळी पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाठार इथं सर्विस रोडला त्यांचा टेम्पो आला. यावेळी सकाळी पुन्हा तिथं अजून एक काँक्रीटचं काम असल्यानं पाठीमागील मिक्सर मशीन तिथंच सोडून जाण्यासाठी मजूर टेम्पोच्या खाली उतरले. टेम्पोची मशीन सोडवून रस्त्याच्या बाजूला लावत असतानाच कोल्हापूरकडून पुण्याच्या दिशेनं येणाऱ्या भरधाव एमएच 12 एलटी 7095 या ट्रकनं या मजुरांना जोराची धडक दिली.

Accident On Pune Bangalore Highway
घटनास्थळ

चार जणांचा मृत्यू तर सात मजूर गंभीर : या भीषण अपघातात सचिन धनवडे (वय 40) हा जागीच ठार झाला. तर टेम्पोतील बाबालाल इमाम मुजावर (वय 50), विकास वड्ड (वय 32) आणि श्रीकेश्वर पासवान (वय 60) या 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच सुनिल कांबळे, सचिन नलवडे, लक्ष्मण मनोहर राठोड, ऐश्वर्या लक्ष्मण राठोड, सविता लक्ष्मण राठोड, कुमार अवघडे अन्य एक (सर्व रा. भादोले ) हे 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. या सर्व जखमींना सीपीआरमध्ये उपचारसाठी दाखल करण्यात आलं आहे. तर काही किरकोळ जखमींवर पेठ वडगावमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

घटनास्थळी रक्ताचा सडा पाहून नागरिक हादरले : या अपघाताची माहिती समजताच परिसरातील नागरिक घटनास्थळी बचाव कार्यासाठी दाखल झाले. घटनास्थळी रक्ताचा सडा पडलेला पाहून अपघाताची भीषणता समोर आली. त्यामुळे बचावकार्यासाठी आलेले नागरिकही हादरुन गेले. दरम्यान या अपघाताची नोंद रात्री उशिरापर्यंत पेठवडगाव पोलीस ठाण्यात झाली नव्हती.

हेही वाचा :

  1. Highway Terror : महामार्गावरील अपघातांची दहशत, सीट बेल्टने वाचू शकतात शेकडो जीव
  2. Satara Accident News : साताऱ्यातील व्यावसायिकाच्या विवाहित मुलीचा अमेरिकेतील भीषण अपघातात जागीच मृत्यू
  3. कास पठारावर फिरायला निघालेल्या तरुणांवर काळाचा घाला; कार दुभाजकाला धडकून दोघांचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.