ETV Bharat / opinion

Highway Terror : महामार्गावरील अपघातांची दहशत, सीट बेल्टने वाचू शकतात शेकडो जीव

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 17, 2024, 10:13 AM IST

Highway Terror : भारतामध्ये महामार्गावरील अपघातांचं प्रमाण प्रचंड आहे. जगातील इतर देशांच्या तुलनेत तर हे प्रमाण भयंकर आहे. तुलनात्मक विचार करता जगातील फक्त १ टक्के वाहने भारतात आहेत. मात्र जगाच्या तुलनेत भारतात तब्बल ११ टक्के अपघात होतात. सुरक्षा नियम न पाळल्यानं (safety norms) त्यामध्ये लोकांचा बळी जात आहे. यासंदर्भात मदुगुला गोपैय्या यांचा हा माहितीपूर्ण लेख.

Highway Terror
Highway Terror

हैदराबाद Highway Terror - भारतीय रस्ते अपघातांमुळे दर तीन मिनिटांनी एक मृत्यू होत आहे. सीट बेल्टचा (seat belt) वापर अशा दुर्दैवी घटनांमध्ये प्रवाशांचा जीव वाचवण्यात लक्षणीय भूमिका बजावतो. देशातील एकूण रस्ते पाहता द्रुतगती मार्ग आणि राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग फक्त 5% आहेत. मात्र अपघातांची संख्या प्रचंड आहे. केंद्रीय वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने खुलासा केला आहे की, या रस्त्यांवर 2022 मध्ये 51,888 लोकांचा मृत्यू झाला होता. ज्याचे कारण भयंकर वेग हे आहे. विशेष म्हणजे, सीट बेल्ट न लावल्यामुळे 8,384 ड्रायव्हर आणि 8,331 प्रवाशांचा मृत्यू झाला. संशोधनात असं सूचित केलय की, सीट बेल्टचा वापर केल्याने अपघातांमधील एक तृतीयांश लोकांच्या वाचण्याची शक्यता खूप असते. ज्यामुळे रस्त्यावरील रहदारीतील मृत्यू कमी करण्यासाठी सीटबेल्ट या सुरक्षा उपायाचे (safety norms) महत्त्व अधोरेखित होते.

आजच्या युगात जिथे रस्ता सुरक्षा सर्वोपरी आहे, अमेरिका, चीन, रशिया, नॉर्वे, डेन्मार्क आणि जपानसारख्या देशांनी गेल्या दशकात रहदारी अपघात आणि मृत्यूचे प्रमाण निम्मे करून एक आदर्श दिला आहे. शिवाय, तीस पेक्षा जास्त राष्ट्रांनी 30% ते 50% पर्यंत अपघातांची संख्या कमी करुन दाखवली आहे. या यशाचं श्रेय सीट बेल्ट तंत्रज्ञानातील प्रगती आणि वाहन सुरक्षा वैशिष्ट्यांसह रस्ता सुरक्षा नियमांच्या कडक अंमलबजावणीला दिलं जातं. यूएस नॅशनल हायवे ट्रॅफिक सेफ्टी ॲडमिनिस्ट्रेशनने अहवाल दिला आहे की, 2017 मध्ये, सीट बेल्ट कायद्याच्या कठोर अंमलबजावणीमुळे जवळपास 15,000 लोकांचे जीव वाचले. ज्याचे पालन दर 90% पेक्षा जास्त होते. याउलट, भारताला भयंकर परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. जिथे दरवर्षी 9,000 पेक्षा जास्त लोक बसेसच्या अपघातात, वाहनांची गर्दी असते आणि खड्डेमय रस्त्यांवर होतात. चिंताजनक बाब म्हणजे, या अपघातांमुळे दरवर्षी जवळपास हजार मुलांचा आणि प्रौढांचा बळी जातो. त्या तुलनेत, आंतरराष्ट्रीय रोड फेडरेशनच्या मते, अमेरिकेमध्ये 2021 मध्ये केवळ 14 मृत्यू झाले आणि चीनमध्ये 2022 मध्ये अशाच घटनांमुळे 215 मृत्यू झाले. ही एक शोकांतिका आहे की, जगातील केवळ 1% वाहने भारतात असूनही, जागतिक रस्ते अपघातांपैकी 11% अपघात भारतात होतात.

प्रख्यात उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा समावेश असलेल्या कार अपघाताच्या पार्श्वभूमीवर, परिवहन आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने सीट बेल्ट नियमांच्या अंमलबजावणीवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. ऑक्टोबर 2022 पासून सर्व नवीन उत्पादित कार, व्हॅन, बस आणि ट्रकमध्ये ऑडिओ-व्हिडिओ इशारा प्रणाली आणि वेगमर्यादा सूचनांसह सीट बेल्टचा समावेश अनिवार्य केला आहे. मंत्रालयाने 1989 च्या मोटार वाहन कायद्यातील तरतुदी मजबूत केल्या आहेत. याव्यतिरिक्त, स्वयंचलित ट्रॅफिक उल्लंघनांचे प्रभावीपणे निरीक्षण करण्यासाठी आणि दंड आकारण्यासाठी चाचणी केंद्रे (ATS) देशभर सुरू करण्यात येणार आहेत. हा उपक्रम सर्वसमावेशक उपाययोजनांचा समावेश करून पुढील सहा वर्षांत रस्ते अपघातातील मृत्यू आणि जखमींचे प्रमाण ५०% कमी करण्याच्या व्यापक धोरणाचा एक भाग आहे.

शिक्षण, अंमलबजावणी, आपत्कालीन काळजी आणि अभियांत्रिकी यावर भर देण्याची गरज आहे. त्याचवेळी याची जमिनीवर व्यावहारिक अंमलबजावणी अपेक्षित आहे. पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाचे चार वर्षांपूर्वीचे निर्देश, ज्यामध्ये मुलांसाठी सर्व स्कूल बसमध्ये सीट बेल्ट वापरणे आवश्यक आहे. मात्र त्याची अंमलबजावणी मोठ्या प्रमाणात होत नाही. त्याचप्रमाणे, RTC बसेससह सर्व अवजड वाहनांमध्ये सीट बेल्टसाठी केरळ सरकारने अलीकडे दिलेला आदेश, ऐच्छिक पालनाचे महत्त्व अधोरेखित करतो. या सुरक्षा उपायांचे पालन करणे सर्व ड्रायव्हर्ससाठी महत्वाचे आहे. त्याचा खूप फायदा होत आहे. एकूणच अपघात टाळण्यासाठी ज्या उपाययोजना केल्या जातात. त्यांची काटेकोर अंमलबजावणी गरजेची आहे. तरच अपघात टाळण्यात मोठी भर पडेल.

हे वाचलंत का....

  1. Chinas win over the Maldives : मालदीववर चीनचा विजय : भारताचा धोरणात्मक प्रतिसाद
  2. Big Brother Sydrome: सर्वात मोठा कोण? चीनचा प्रत्येक शेजारी देशांसोबत आहे वाद
  3. Defence Aatmanirbharta Advances : भारताची संरक्षण आत्मनिर्भरता प्रगती; अजून बराच पल्ला गाठायचाय...
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.