ETV Bharat / state

कर परतावा लुबाडणाऱ्या विक्रीकर अधिकाऱ्यासह 16 जणांवर एसीबीकडून गुन्हा दाखल

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 1, 2024, 7:54 PM IST

Crime filed on sales tax officer : माझगाव येथील जीएसटी भवनात वस्तू आणि सेवाकर विभागात विक्रीकर अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या अमित लाळगे वय 44 याच्या विरोधात एसीबीने (लाचलुचपत प्रतिबंध विभाग) 175 कोटी 93 लाख 12 हजार 622 रुपयांच्या कराची अफरातफर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. विक्रीकर अधिकारी अमित लाळगे यांच्या विरुद्ध भष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फाईल फोटो
फाईल फोटो

मुंबई : सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन दळवी यांनी ही कारवाई केली आहे. विक्रीकर अधिकारी म्हणून जीएसटी भवनात वस्तू व सेवाकर विभागात काम करणाऱ्या अमित लाळगे याने 16 करदाते ट्रेडर्स संबंधित व्यक्तीसह कराच्या परताव्यात कोट्यवधीचा गैरव्यवहार केल्याचं आढळून आल्याने कारवाई करण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन दळवी यांनी दिली आहे. एकूण 175 कोटी 93 लाख आणि 12 हजार 622 रुपयांचा गैरव्यवहार केल्याचं उघडकीस आलं आहे. अद्याप अमित लाळगे यास अटक केलेली नसून, पुढील तपास सुरू आहे.

पताव्यासाठी 39 कर परतावे अर्ज : विक्रीकर अधिकारी म्हणून काम करणाऱ्या अमित गिरीधर लाळगे याच्याकडे MUM-BCP-C-20 आणि MUM- BCP-C-26 घाटकोपर विभाग, नोडल 11 चा पदभार असताना ऑगस्ट 2021 ते मार्च 2022 दरम्यान एकूण 16 करदात्यांनी त्यांचे व्यवसायाचे ठिकाणाचं बनावट आणि खोटं भाडे करारपत्र सादर करून जीएसटीएन कमांक प्राप्त केले होते. त्यानंतर या 16 करदात्यांनी शासनास कोणताही कर भरणा केला नसतानाही एकूण 175 कोटी 93 लाख 12 हजार 688 कर पताव्यासाठी 39 कर परतावे अर्ज सादर केले होते.

आर्थिक नुकसान केलं : या कर परतावे अर्जावर जाणुनबुजून कोणतीही शहानिशा न करता तसंच 16 करदाते हे बनावट असल्याचे जीएसटी पोर्टलवरील बीओ सिस्टीम मध्ये दिसत असतानाही विक्रीकर अधिकारी अमित लाळगे याने कर परतावे अर्ज नामंजूर करण्याऐवजी पदाचा गैरवापर करून 16 करदात्यांशी संगनमत करून फौजदारी पात्र कट रचून बनावट आणि खोट्या अहवालाद्वारे स्वतःच्या आणि 16 करदात्यांच्या फायद्यासाठी अपात्र परतावा मंजूर केला. तोतयागिरी करणाऱ्या 16 करदात्यांना 175 कोटी 93 लाख 12 हजार 662 वितरीत करून शासनाची फसवणूक तसंच आर्थिक नुकसान केलं. म्हणून याप्रकरणी विक्रीकर अधिकारी अमित गिरीधर लाळगे आणि संबधित परतावा प्राप्त करणाऱ्या 16 कंपन्याशी संबधित व्यक्ती विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानूसार गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा :

1 फोनवर अन् पत्राद्वारेही शरद पवार यांचं निमंत्रण! मात्र, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी निमंत्रण नाकारलं

2 "राज्यातील गॅंगवॉर आता विधानभवनापर्यंत", भुसे-थोरवे धक्काबुक्की प्रकरणावरुन अंबादास दानवेंचा हल्लाबोल

3 आदिवासीतून धर्मांतर केलेल्या 257 प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांची चौकशी होणार, मंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.