ETV Bharat / state

शिवाजी नगर येथील सेंट्रल प्लाझा कॉम्प्लेक्स इमारतीला भीषण आग - fire broke Central Plaza Complex

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 28, 2024, 5:40 PM IST

Central Plaza Complex building fire : मुंबईतील शिवाजी नगर येथील सेंट्रल प्लाझा कॉम्प्लेक्स इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणण्यात यश आलं असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Central Plaza Complex building fire
Central Plaza Complex building fire

मुंबई Central Plaza Complex building fire : मालाड पूर्वेतील दफ्तरी रोडवरील आठ मजली व्यावसायिक इमारतीला भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याचं वृत्त नाही. इमारतीच्या पाचव्या तसंच सहाव्या मजल्यावर असलेल्या एका कपड्याच्या दुकानाला आग लागल्याचं सांगण्यात येत आहे.

आग आटोक्यात आणण्यात यश : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी 11.30 च्या सुमारास मालाड पूर्व येथील दिंडोशी येथील व्यावसायिक इमारतीच्या पाचव्या तसंच सहाव्या मजल्यावरील कपड्याच्या दुकानाला आग लागली. इमारतीच्या पाचव्या तसंच सहाव्या मजल्यावर धूर पसरत असल्याचं नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ अग्निशमन दलाला माहिती दिली. यानंतर अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणण्यात यश आलं असून अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

हे वाचलंत का :

  1. ''सिड्डू" पिण्याची आग; मेळघाटात मोहफूल वेचण्यासाठी झाडाखाली लावतात आग - Mahua Flowers In Melghat
  2. उज्जैनच्या महाकाल मंदिरात भस्म आरतीवेळी गाभाऱ्यात आग, पुजाऱ्यांसह 14 जण जखमी - Ujjain Mahakal mandir Fire
  3. गोदान एक्सप्रेसच्या दोन बोगींना भीषण आग; नाशिकरोड रेल्वे स्थानकातील घटना - Godan Express Two Bogies Fire
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.