लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठा निर्णय: मुंबई पोलीस दलात खांदेपालट; एकाचवेळी 18 पोलीस उपायुक्तांच्या बदल्या

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 13, 2024, 7:01 AM IST

Mumbai Police Transfer

Mumbai Police Transfer : देशात लवकरच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी मुंबई पोलीस दलातील 18 पोलीस उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

मुंबई Mumbai Police Transfer : राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. मात्र शहरातील कायदा आणि सुव्यवस्था संभाळण्यास पोलीस दल सक्षम असल्याचा दावा सरकारच्या वतीन करण्यात येत आहे. त्यातच आता मायानगरी मुंबईतील पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. रश्मी शुक्ला यांनी पोलीस महासंचालक पदाचा पदभार घेतल्यानंतर पोलीस दलात मोठे फेरबदल केले आहेत. त्यातच सोमवारी त्यांनी मुंबई पोलीस दलातील तब्बल 18 पोलीस उपायुक्तांचा खांदेपालट केला आहे. शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेच्या दोन उपायुक्तांच्या बदल्यांचाही यात समावेश आहे.

Mumbai Police Transfer
बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांची यादी

दत्ता नलावडे यांची गुन्हे शाखेत बदली : मुंबई पोलीस दलातील परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांची ऑपरेशन विभागात बदली करण्यात आली आहे. अकबर पठाण यांच्या जागी झोन ​​9 चे पोलीस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय यांना झोन 3 मध्ये पाठवण्यात आलं आहे. तर पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांना परिमंडळ 10 मधून गुन्हे शाखेच्या डिटेक्शन 2 ची जबाबदारी देण्यात आली आहे.

तेजस्वी सातपुते यांच्याकडं परिमंडळ 5 ची जबाबदारी : मुख्यालयातील 2 विभागाच्या पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांना मनोज पाटील यांच्या जागी परिमंडळ ​​5 मध्ये पाठवण्यात आलं आहे. तर विशेष कृती दलाचे पोलीस उपायुक्त मंगेश शिंदे यांना दत्ता नलावडे यांच्या जागी परिमंडळ ​​10 मध्ये पाठवण्यात आलं आहे.

राज तिलक रोशन यांचीही बदली : पोलीस उपायुक्त राज तिलक रोशन यांची गुन्हे शाखा डिटेक्शन 1 मधून बदली करण्यात आली आहे. त्यांच्याकडं परिमंडळ 9 ची जबाबदारी देण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांची ऑपरेशन विभागातून बदली करण्यात आली असून त्यांच्याकडं गुन्हे शाखा डिटेक्शन 1 ची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

आनंद भोईटेंची मुंबई पोलीस दलात एन्ट्री : आनंद भोईटे यांना पुणे ग्रामीण बारामती इथून मुंबई पोलीस दलात आणण्यात आलं आहे. आनंद भोईटे यांना आता अजयकुमार बन्सल यांच्या जागी परिमंडळ 11 चे पोलीस उपायुक्त म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणं अमली पदार्थ विरोधी कक्षाचे पोलीस उपायुक्त प्रकाश जाधव यांची संरक्षण विभागात बदली करण्यात आली आहे. तर अकोल्याचे दत्तात्रय कांबळे यांची विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे.

हेही वाचा :

  1. अखेर रश्मी शुक्लांनी स्वीकारला DGP पदाचा पदभार; म्हणाल्या, 'महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य'
  2. मुंबईत सहा ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची खोटी माहिती, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.