ETV Bharat / state

रेस्टॉरंटच्या माजी व्यवस्थापकानं मालकाला धमकी देत 10 लाखांची मागितली खंडणी; गुन्हा दाखल - EXTORTION CASE MUMBAI

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 30, 2024, 7:34 AM IST

Updated : Mar 30, 2024, 7:55 AM IST

Extortion Case Mumbai : रेस्टॉरंटच्या माजी व्यवस्थापकानं मालकाला धमकी देत 10 लाखांची खंडणी मागितल्याची घटमा समोर आलीय. याप्रकरणी रेस्टॉरंटच्या मालकानं दिलेल्या तक्रारीवरुन माजी व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.

रेस्टॉरंटच्या माजी व्यवस्थापकानं मालकाला धमकी देत 10 लाखांची मागितली खंडणी, मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
रेस्टॉरंटच्या माजी व्यवस्थापकानं मालकाला धमकी देत 10 लाखांची मागितली खंडणी, मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मुंबई Extortion Case Mumbai : चर्चगेट रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या प्रसिद्ध रेस्टॉरंटच्या मालकानं माजी व्यवस्थापकावर खंडणीचा आरोप केल्याची माहिती परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे यांनी दिली. रेस्टॉरंटचे मालक जावेद अब्दुल वहाब चमन यांनी दिलेल्या तक्रारीवरुन मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात माजी व्यवस्थापक कृष्णाजी प्रसाद याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

धमकी देत 10 लाख उकळण्याचा प्रयत्न : 'स्टेडियम' रेस्टॉरंटच्या मालकानं तक्रारीत म्हटलंय की, त्यांनी काही वर्षांपूर्वी कृष्णाजी प्रसाद याला नोकरीवरून काढून टाकलं होतं. आता प्रसाद त्यांच्या रेस्टॉरंटचे आयकर तपशील सोशल मीडिया वेबसाइटवर अपलोड करण्याची धमकी देत ​​आहे. दक्षिण मुंबईच्या चर्चगेटमधील 80 वर्षीय प्रसिद्ध इराणी रेस्टॉरंटच्या मालकानं त्याच्या माजी व्यवस्थापकावर त्याच्याकडून 10 लाख रुपये उकळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केलाय, असं मरीन ड्राईव्ह पोलिसांनीही सांगितलं.


आरोपी पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगचा रहिवासी : एका पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, प्रसादनं मालक चमनला सांगितलं की, जर त्यानं त्याला(आरोपीला) 10 लाख रुपये दिले नाहीत तर तो आयकर विभागाकडे कागदपत्रं पाठवेल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड करेल. यानंतर मरीन ड्राईव्ह पोलिसांनी स्टेडियम रेस्टॉरंटमध्ये सुमारे सहा ते सात वर्षे काम करणाऱ्या प्रसादविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 385 (एखाद्या व्यक्तीला खंडणीसाठी भीती दाखवणे) आणि 506 (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आलाय. अधिकाऱ्यानं सांगितलं की, प्रसाद हा दार्जिलिंगचा रहिवासी असून तो सध्या तिथंच आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांचं पथक लवकरच पश्चिम बंगालला जाणार आहे.

हेही वाचा :

  1. खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत मागितली 20 लाखांची खंडणी; दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल
  2. ईडीच्या कारवाईचा धाक दाखवत ओमकार बिल्डरच्या मालकाकडे मागितली 164 कोटींची खंडणी, पाच जणांना अटक
  3. बिल्डरचं अपहरण करुन कुख्यात गँगस्टरनं मागितली 10 कोटींची खंडणी; मुंबई पोलिसांनी खंडणीखोरांना ठोकल्या बेड्या
Last Updated : Mar 30, 2024, 7:55 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.