ETV Bharat / sports

माझं नाव फक्त T20 क्रिकेटच्या प्रचाराशी जोडलं जातंय - विराट कोहली - Virat Kohli on t20 cricket

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 26, 2024, 7:27 PM IST

Virat Kohli
Virat Kohli

Virat Kohli : पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात सामनावीर ठरलेला 'रॉयल चॅलेंजर्स बंगलोर'चा (RCB) स्टार फलंदाज विराट कोहलीनं मोठं वक्तव्य केलं आहे. आजकाल माझं नाव फक्त टी-20 क्रिकेटच्या प्रचाराशी जोडलं गेलं आहे, पण तरीही मी त्यासाठी सक्षम आहे, असं विराट कोहलीनं म्हटलं आहे.

बेंगळुरू Virat Kohli : या वर्षी जूनमध्ये अमेरिका तसंच वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी विराट कोहलीच्या नावाची चर्चा सुरू आहे. त्यावर विराट कोहलीनं मोठं वक्तव्य केलं आहे. 'मी अजूनही या फॉरमॅटमध्ये खेळण्यास सक्षम' असल्याचं त्यानं म्हटलं आहे. मुलाच्या जन्मामुळं कोहली दोन महिने क्रिकेटपासून दूर होता. सोमवारी झालेल्या आयपीएल सामन्यात त्यानं 49 चेंडूत 77 धावा केल्या. ज्यामुळं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं (RCB) पंजाब किंग्जला हरवून सामना आपल्या नावावर केला. यावेळी कोहलीला सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड करण्यात आली.

खेळण्यात सुधारणा कराव्या लागतात : सामन्यानंतर विराट कोहली म्हणाला, 'मला माहीत आहे की आजकाल, जेव्हा-जेव्हा टी-20 क्रिकेटचा विषय येतो, तेव्हा माझं नाव क्रिकेटच्या प्रचारासाठी जोडलं जातं. पण तरीही मी त्यासाठी सक्षम आहे. मला त्यासाठी काहीही सिद्ध करण्याची गरज नाही. पण टी-20 फॉरमॅटमध्ये खेळात सुधारणा करण्याची गरज आहे', असं कोहलीनं म्हटलं आहे. 'तुम्हाला तुमच्या खेळात नेहमी काहीतरी नवीन करावं लागतं. लोकांना माहीत आहे की, मी कव्हर ड्राईव्ह चांगलं खेळतो. त्यामुळं ते मला रिकाम्या जागेत शॉट्स मारू देत नाहीत. अशा परिस्थितीत, तुम्हाला एक धोरण तयार करावं लागतं. तसंच तुमच्या खेळण्यात सतत सुधारणा कराव्या लागतात.

कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी : दुसऱ्या मुलाच्या जन्मामुळं कोहली इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत खेळू शकला नव्हता. त्यामुळं कोहलीला कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळाली होती. 'आम्ही देशात नव्हतो. आम्ही अशा ठिकाणी होतो, जिथं लोक आम्हाला ओळखत नव्हते. मी दोन महिने माझ्या कुटुंबासोबत सामान्य माणसाप्रमाणं वेळ घालवला. एक कुटुंब म्हणून आमच्यासाठी हा एक अद्भुत अनुभव होता. मला माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळाली, याबद्दल मी देवाचा ऋणी आहे. 'आपल्याला कोणीही ओळखत नसताना सामान्य माणसाप्रमाणं रस्त्यावर चालणं, सर्वसामान्यांसारखं दैनंदिन जीवन जगणं हा एक अद्भुत अनुभव होता,' असं कोहलीनं म्हटलं आहे.

हे वाचंलत का :

  1. कोहलीचा 'विराट' विक्रम ; आयपीएलमध्ये ठोकलं शंभरावं अर्धशतक, ठरला पहिला भारतीय खेळाडू - Virat Kohli Register 100 Fifty
  2. विराटच्या तडाखेबंद फलंदाजीनं आरसीबीचा आयपीएलमध्ये पहिला विजय, पंजाब किंग्जचे उडविले रंग - RCB VS Punjab Kings
  3. IPL 2024 Schedule : 'आयपीएल'चं संपूर्ण वेळापत्रक जाहीर; फायनल चेन्नईत - IPL 2024 Schedule
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.