ETV Bharat / sports

IPL 2024 Schedule : 'आयपीएल'चं संपूर्ण वेळापत्रक जाहीर; फायनल चेन्नईत - IPL 2024 Schedule

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 25, 2024, 7:40 PM IST

Updated : Mar 25, 2024, 7:55 PM IST

IPL 2024 Schedule : आयपीएल २०२४ च्या दुसऱ्या टप्प्याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. शेवटचा साखळी सामना १९ मे रोजी होणार आहे. जाणून घ्या आयपीएल २०२४ चं संपूर्ण वेळापत्रक

Etv Bharat
Etv Bharat

मुंबई IPL 2024 Schedule : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर झालंय. आयपीएल 2024 चा अंतिम सेट सामना हा 26 मे रोजी चेन्नईतील स्टेडियम होणार आहे. बीसीसीआयनं याआधी पहिल्या २१ सामन्यांचं वेळापत्रक जाहीर केलं होतं. लोकसभा निवडणुकीमुळं आयपीएल २०२४ चे वेळापत्रक दोन टप्प्यात जाहीर करण्यात आलंय. शेवटचा साखळी सामना १९ मे रोजी होणार आहे. तर आयपीएल २०२४ ची फायनल २६ मे रोजी चेन्नई येथे होणार आहे.

फायनल चेन्नईमध्ये : यापूर्वी 'बीसीसीआय'नं ७ एप्रिलपर्यंतच्या सामन्यांचं वेळापत्रक जाहीर केलं होतं. आता पुढील सामन्यांचं वेळापत्रकही जाहीर करण्यात आलंय. आयपीएलमध्ये सहभागी सर्व १० टीम दोन गटांमध्ये विभागले आहेत. त्यामुळं वेळापत्रकही दोनवेळा जाहीर करण्यात आलंय.

प्लेऑफ आणि क्वालिफायर सामना : 'आयपीएल'चे प्लेऑफ सामने २१ मे पासून सुरू होणार आहेत. स्पर्धेतील पहिला क्वालिफायर सामना हा २१ मे रोजी खेळवला जाणार आहे, हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. यानंतर २२ मे रोजी एलिमिनेटर सामना होणार असून, हा सामनाही अहमदाबादमध्ये होणार आहे.

18 मे रोजी RCB विरुद्ध चेन्नई : दुसरा लीग सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन संघांमध्ये शनिवारी, १८ मे रोजी आरसीबीच्या होम ग्राउंड एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाईल. या मोसमातील हा शेवटचा साखळी सामनाही असेल. या दोन संघांमधील IPL 2024 चा सलामीचा सामना चेपॉक स्टेडियम, चेन्नई येथे खेळला गेला, ज्यामध्ये CSK नं RCB चा पराभव केला होता.

'आयपीएल'चं दोन टप्प्यात वेळापत्रक जाहीर : सध्या देशभरात लोकसभा निवडणुकांचा हंगाम सुरू झालाय. त्यामुळं याचा फटका 'आयपीएल' सामन्यांना बसेल अशी शक्यता होती किंवा हे सामने बाहेरील देशात होतील, अशीही चर्चा होती. मात्र, 'आयपीएल' भारतातच होत असून, दोन टप्प्यात याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. सार्वत्रिक निवडणुकांमुळं 2009 मध्येही आयपीएलचा हंगाम दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आला होता. तसंच २०२० आणि २०२१ हंगाम कोरोनामुळं युएईत आयोजित करण्यात आला होता.

हेही वाचा -

  1. 'बुटका डोंगराच्या माथ्यावर उभा राहिला तरी बुटका असतो, मात्र...'; मुंबईच्या कर्णधारपदाबाबत काय म्हणाले नवज्योत सिंग सिद्धू? - Navjot Sidhu on Rohit Sharma
  2. कोहलीच्या नावावर आणखी एक 'विराट विक्रम'; भारतीय फलंदाजांना जमलं नाही ते भाऊनं केलंय - Virat Kohli T20 Runs
Last Updated :Mar 25, 2024, 7:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.