ETV Bharat / sports

कोहलीच्या नावावर आणखी एक 'विराट विक्रम'; भारतीय फलंदाजांना जमलं नाही ते भाऊनं केलंय - Virat Kohli T20 Runs

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 22, 2024, 10:18 PM IST

Updated : Mar 22, 2024, 10:38 PM IST

Etv Bharat
Etv Bharat

Virat Kohli T20 Runs : दोन महिन्यांनी क्रिकेटच्या मैदानात उतरणाऱ्या विराट कोहलीनं दमदार कमबॅक केलाय. आयपीएलच्या सतराव्या हंगामाच्या पहिल्याच सामन्यात कोहलीच्या नावावर विराट विक्रम जमा झालाय.

चेन्नई Virat Kohli T20 Runs : आयपीएलचा पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि चेन्नई सुपर किंग्सदरम्यान (CSK) रंगला. या सामन्यात विराट कोहलीनं टी20 क्रिकेटमध्ये विक्रम रचलाय. आजपर्यंत एकाही भारतीय फलंदाजाला अशी कामगिरी करता आलेली नाही. टी20 क्रिकेटमध्ये 12 हजार धावा करणारा विराट कोहली हा पहिला भारतीय फलंदाज बनलाय.

पहिला भारतीय फलंदाज : विराट कोहलीनं टी20 क्रिकेटमध्ये 12 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. असा विक्रम करणारा विराट हा पहिलाच भारतीय फलंदाज ठरलाय. हा टप्पा गाठण्यासाठी विराट कोहलीला 360 इनिंग खेळाव्या लागल्या आहेत. सर्वात वेगवान 12 हजार धावा करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.

विराट कोहलीचीच हवा : टी २० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये विराट कोहली अव्वल स्थानी आहे. विराट कोहलीच्या नावावर 12 हजार धावा आहेत. त्यानंतर रोहित शर्मा या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर, शिखर धवन तिसऱ्या, सुरेश रैना चौथ्या आणि रॉबिन उथप्पा पाचव्या स्थानावर आहे. त्यामुळं टी 20 फॉरमॅटमध्येही विराटचीच हवा असल्याचं दिसून येतंय.

भल्याभल्यांना टाकलं मागं : विराट कोलहीनं 377 टी 20 सामन्यांमध्ये हा विक्रम रचलाय. हा टप्पा गाठणारा कोहली हा वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज ख्रिस गेलनंतरचा दुसरा सर्वात जलद फलंदाज ठरलाय. ख्रिस गेल, शोएब मलिक, किरॉन पोलार्ड, ॲलेक्स हेल्स आणि धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नर याच्यानंतर विराट कोहलीचा नंबर येतो. त्यामुळं आपल्या तळपत्या बॅटनं विराट कोहलीनं भल्याभल्यांना मागं टाकलंय.

टी-२० मध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज :

  1. विराट कोहली : १२ हजार धावा
  2. रोहित शर्मा: ११ हजार १५६ धावा
  3. शिखर धवन: ९ हजार ६४५ धावा
  4. सुरेश रैना: ८ हजार ६५४ धावा
  5. रॉबिन उथप्पा: ७ हजार २७२ धावा

हेही वाचा -

  1. मराठमोळा ऋतुराज गायकवाड 'चेन्नई सुपर किंग्ज'चा नवा कर्णधार - Ruturaj Gaikwad is new captain
  2. Hardik Pandya : रोहित शर्माचं संघात कोणतं स्थान? हार्दिक पंड्यानं थेटच सांगितलं....
  3. WPL 2024 Final: आरसीबीला 16 वर्षांच्या 'विराट' अपयशानंतर अखेर डब्ल्यूपीएलमधून मिळाली विजेते पदाची 'स्मृती'
Last Updated :Mar 22, 2024, 10:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.