ETV Bharat / sports

छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभासाठी 2 लाखांपेक्षा जास्त खेळाडू सज्ज, युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 24, 2024, 5:09 PM IST

Shivaji Maharaj Krida Mahakumbh : शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं मुंबईत क्रीडा महाकुंभाचं आयोजन केलं जाणार आहे. पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारानं या स्पर्धेचं आयोजन केलं जाणार आहे.

Shivaji Maharaj Krida Mahakumbh
Shivaji Maharaj Krida Mahakumbh

मुंबई Shivaji Maharaj Krida Mahakumbh : राज्याचे कॅबिनेटमंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून साकारलेली 'श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ' स्पर्धा येत्या 26 जानेवारी ते 19 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं मुंबई शहरात आणि उपनगरात देशी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रथमच या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. 26 जानेवारीला वरळीतील जांभोरी मैदान येथे स्पर्धेचं उ‌द्घाटन होईल.

सव्वादोन लाख खेळाडूंची नोंदणी : छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभात लगोरी, लेझिम, लंगडी, पंजा लढवणे, दोरीच्या उडया, रस्सीखेच, फुगडी, मल्लखांब, कबड्डी, मानवी मनोरे, आखाडा कुस्ती, पावनखिंड दौड, खो-खो, विटीदांडू, शरीर शौष्ठव, ढोलताशा या 16 पारंपरिक खेळांचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी तब्बल सव्वादोन लाख खेळाडूंनी नोंदणी केली. या स्पर्धा विविध वजनी गटात आणि वयोगटात घेण्यात येणार आहेत. आखाडा कुस्ती, पावनखिंड दौड, शरीर शौष्ठव आणि ढोलताशा है चार खेळ अंतिम स्तरावर एकाच ठिकाणी आयोजित करण्यात येतील.

27 गडकिल्ल्यांचं प्रदर्शन : या स्पर्धेच्या उद्घाटनावेळी महाराष्ट्रातील 27 किल्ल्यांचं प्रदर्शन उभारलं जाणार असून, उपस्थित नागरिकांना प्रदर्शनाच्या माध्यमातून किल्ल्यांची माहिती दिली जाणार आहे. त्याचसोबत दांडपट्टा, लाठीकाठी यासारख्या शिवकालीन युद्धकलांची प्रात्यक्षिकं सुद्धा यावेळी सादर केली जाणार आहेत. या स्पर्धेसाठी रायगडावरून शिवज्योतिचं मुंबईमध्ये आगमन होणार आहे.

मुंबई शहर आणि उपनगरातील मैदानं सज्ज : हा क्रीडा महोत्सव मुंबई उपनगरात अंधेरी, बोरीवली, कुर्ला, मुलुंड या चार तालुक्यांमध्ये तसेच मुंबई शहरात दोन ठिकाणी आयोजित केला जाईल. मल्लखांब, कबड्डी आणि खो-खो या खेळ प्रकारांच्या तालुकास्तरीय स्पर्धा, मुंबई उपनगर आणि शहरात प्रत्येकी एका ठिकाणी आयोजित होणार असून, इतर 9 खेळांच्या तालुकास्तरीय स्पर्धा 6 ठिकाणी होणार आहेत. अंतिम स्पर्धा एकाच ठिकाणी आयोजित केली जाईल. यासाठी एकूण 20 मैदानं आणि सभागृह तयार आहेत.

हे वाचलंत का :

  1. साहेबांविरुद्ध पहिल्या दोन कसोटींसाठी कोहलीच्या जागी 'पाटीदार' खेळाडूची वर्णी; पहिल्या सामन्यात करु शकतो पदार्पण
  2. आयसीसी वनडे आणि कसोटी 'टीम ऑफ द इयर' जाहीर, वाचा कोणत्या भारतीयांनी मिळवलं संघात स्थान
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.