ETV Bharat / sports

दिल्ली कॅपीटल्ससाठी दुष्काळात तेरावा महिना; केकेआर विरुद्धच्या सामन्यानंतर पंतला बीसीसीआयनं ठोठावला 24 लाखांचा दंड; कारण काय? - Rishabh Pant

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 4, 2024, 11:22 AM IST

Rishabh Pant : आयपीएलच्या हंगामात सलग दुसऱ्यांदा ऋषभ पंत आणि दिल्ली कॅपिटल्सला स्लो ओव्हर रेट म्हणजे संथगतीनं गोलंदाजीमुळे मोठा तोटा सहन करावा लागलाय. केकेआरविरुद्धच्या सामन्यानंतर बीसीसीआयनं दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतला 24 लाखांचा दंड ठोठावलाय.

Rishabh Pant
दिल्ली कॅपीटल्ससाठी दुष्काळात तेरावा महिना; केकेआर विरुद्धच्या सामन्यानंतर पंतला बीसीसीआयनं ठोठावला 24 लाखांचा दंड; कारण काय?

विशाखापट्टणम Rishabh Pant : आयपीएल 2024 मध्ये, दिल्ली कॅपिटल्स संघानं 4 पैकी 3 सामने गमावल्यानं त्यांची गुणतालिकेत नवव्या स्थानावर घसरण झालीय. बुधवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्लीला 106 धावांनी मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. सामना गमावल्यानंतर आयपीएलमध्ये दिल्लीची स्थिती वाईट आहे. अशातच बीसीसीआयनं आयपीएलच्या आचारसंहितेअंतर्गत दंडही ठोठावला आहे.

चारपैकी दोन सामन्यांत ऋषभ पंतला दंड : आयपीएलच्या या मोसमात सलग दुसऱ्यांदा स्लो ओव्हर रेटमुळं ऋषभ पंत आणि दिल्ली कॅपिटल्सला मोठा फटका बसलाय. बुधवारी केकआर विरुद्ध झालेल्या सामन्यात स्लो-ओव्हर रेटमुळं दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतला 24 लाख रुपये, तर दिल्ली कॅपिटल्सच्या प्लेइंग इलेव्हन खेळाडूंना (6 लाख किंवा त्यांच्या मॅच फीच्या 25 टक्के रक्कम यापैकी जे कमी असेल) दंड ठोठावण्यात आला. आयपीएलमध्ये सलग दुसऱ्यांदा स्लो ओव्हर रेट ठेवल्याबद्दल दोषी आढळल्यानंतर बीसीसीआयनं कर्णधार ऋषभ पंत आणि संपूर्ण दिल्ली कॅपिटल्स संघाला हा दंड ठोठावलाय. पंतनं दुसऱ्यांदा आयपीएलच्या नियमांचं उल्लंघन केलंय. विशेष म्हणजे यापूर्वी चेन्नईविरुद्धच्या सामन्यातही स्लो ओव्हर रेटमुळे पंतला 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता.

बीसीसीआयनं जारी केलं प्रसिद्धीपत्रक : बीसीसीआयनं पंतला दंड ठोठावण्यासंदर्भात एक प्रसिद्धीपत्रक जारी केलंय. त्यात म्हटलंय की, विशाखापट्टणम येथील डॉ वायएस राजशेखर रेड्डी ACA-VDCA क्रिकेट स्टेडियमवर कोलकाता नाइट रायडर्स विरुद्धच्या आयपीएल सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतनं (ऋषभ पंतचा संघ) स्लो ओव्हर रेट ठेवल्यानं दंड ठोठावण्यात आलाय.

दिल्ली कॅपिटल्सचा मोठा पराभव : दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात यंदाच्या आयपीएलमधील 16वा सामना डॉ वाय एस राजशेखर रेड्डी ACA- VDCA क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाइट रायडर्सनं (KKR) ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सचा (DC) 106 धावांच्या मोठ्या फरकानं पराभव केला.

हेही वाचा :

  1. कोलकाताच्या 'नरेन'अस्त्रासमोर 'दिल्ली' राजधानी एक्सप्रेस 'फेल'; आठ दिवसांत दोनदा मोडला आरसीबीचा 'हा' विक्रम - DC vs KKR Live Score IPL 2024
  2. सुनील नारायणची वादळी खेळी, 39 चेंडूत ठोकल्या 85 धावा - DC Vs KKR Live Score
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.