ETV Bharat / sports

ETV Bharat Exclusive : मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद हार्दिक पांड्यासाठी कठीण काम - इरफान पठाण

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 8, 2024, 10:57 PM IST

Irfan Pathan : भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण आयपीएलच्या 17 व्या हंगामाच्या प्रमोशनसाठी हैदराबादला पोहोचले आहे. याबाबत इरफान पठाण यांनी ईटीव्हीशी खास बातचीत केली.

Etv Bharat
Etv Bharat

इरफान पठाण यांची मुलाखत

हैदराबाद Irfan Pathan : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सुरू होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. आयपीएलला प्रोत्साहन देण्यासाठी, भारतीय संघाचा भाग असलेले माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण हैदराबादच्या VNRVJIT अभियांत्रिकी महाविद्यालयात पोहचले आहेत. यावेळी त्यांनी ईटीव्ही भारतशी खास बातचीत केली आहे.

रिंकू सिंग करणार धमाका : 'आयपीएल 2024 मध्ये केकेआर संघात कामगिरी करण्यात रिंकू सिंगचा मोठा वाटा असेल. रिंकू सिंग खूप संघर्षानंतर इथपर्यंत पोहोचला आहे. तो गोलंदाजांचंं नियोजन बिघडवणारा फलंदाज आहे. तो लहान खेळाडू आहे, मात्र मोठे पंच मारतो, असं इरफान पठाण म्हणाले.

चेन्नई-मुंबई यशस्वी संघ : चेन्नई सुपर किंग्ज तसंच मुंबई इंडियन्स या दोन संघाच्या यशाच्या श्रेयाबाबत बोलताना इरफान पठाण म्हणाले, उत्कृष्ट संघ व्यवस्थापन तसंच संघात चांगले कोच असल्यामुळं संघाच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली होती. 'दोन्ही संघाचं टीम वर्क खूप मजबूत आहे. त्यामुळं ते इतर संघांपेक्षा वेगळे आहेत.

हार्दिकला आशिष नेहराची उणीव भासणार : हार्दिक पांड्या तसंच गुजरात टायटन्सचे मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा यांची जोडी गेल्या 2 हंगामात खूप यशस्वी ठरली होती. यावेळी हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये सामील झाल्यामुळं दोघांची जोडी तुटली आहे. त्यामुळं याचा सर्वाधिक त्रास हार्दिकला पांड्याला होईल. हार्दिक पांड्याला आशिष नेहराची उणीव भासेल, असं देखील पठाण म्हणाले. जेव्हा हार्दिक पांड्या गुजरात टायटन्सची कमान सांभाळत असे, तेव्हा नेहरा त्यांना मैदानाबाहेरून सतत इनपुट देत होता, ज्यामुळं त्याला कर्णधारपदासाठी खूप मदत झाली. मुंबई इंडियन्समध्ये असं होत नाही, तिथं कर्णधार स्वतः मैदानावर निर्णय घेतो, असं पठाण यांनी म्हटलं आहे.

हैदराबाद प्लेऑफमध्ये पोहोचेल : इरफान पठाणनं आयपीएलच्या 17 व्या सीझनसाठी सनरायझर्स हैदराबादला संघाचं वर्णन शक्तीशाली संघ म्हणून केलंय. 'हैदराबादनं यावेळी जबरदस्त संघ तयार केला आहे. हसरंगाच्या आगमनानं त्यांची टीम मजबूत झाली आहे. एडन मार्कराम, पॅट कमिन्ससारखे बलाढ्य खेळाडू संघाचा भाग आहेत.

हे वाचलंत का :

  1. ऋषभ पंत आयपीएलमध्ये खेळणार की नाही? प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी थेटच सांगितलं
  2. मराठमोळ्या सचिन धसच्या खेळीनं भारतीय यंग ब्रिगेड विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात; कुटुंबीय 'ETV भारत'वर Exclusive
  3. जसप्रीत बुमराहनं कसोटी क्रमवारीत मिळवलं अव्वल स्थान; 'अशी' कामगिरी करणारा क्रिकेटच्या इतिहासातील पहिलाच गोलंदाज
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.