ETV Bharat / spiritual

आज कुणासाठी आहे मान प्रतिष्ठा आणि आनंदाचा दिवस? वाचा बारा राशींचे आजचे राशी भविष्य - Today Horoscope

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 20, 2024, 4:04 PM IST

Updated : May 20, 2024, 10:27 PM IST

Today Horoscope : ग्रह-नक्षत्र यांच्या स्थितीत होत असलेल्या बदलाचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर पडत असतो. ज्या वेळी ग्रहांचा हा प्रभाव शुभ असतो, तेव्हा व्यक्तीची जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते. कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगलं राहील हे आपण 'ईटीव्ही भारत'वरील या राशी भविष्यात जाणून घेणार आहोत.

Today Horoscope
राशी भविष्य (MH DESK)

  • मेष : आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र सातवा स्थानी आहे. आज आपणाला सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रांत प्रसिद्धी मिळेल. कौटुंबिक आणि दांपत्य जीवनात सुख-समाधान मिळेल. प्रणयाची पराकाष्ठा होईल. मौज-मस्ती आणि मनोरंजनामुळं सहजीवनात लाभ होईल. जोडीदाराशी सुसंवाद साधू शकाल.
  • वृषभ : आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र सहावा स्थानी आहे. आज उक्ती आणि कृती ह्यावर संयम ठेवावा लागेल. कोणाची चेष्टा-गंमत करण्याच्या नादात भांडणाची स्थिती उदभवेल. गैरसमज निर्माण होतील. मौज-मजा, करमणूक यावर खर्च होईल. प्रकृतीकडं लक्ष द्यावं लागेल. एखादी दुर्घटना संभवते. मानसिक उन्मत्तपणा अधिक समस्या निर्माण करील. त्यावर ताबा ठेवावा लागेल.
  • मिथुन : आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र पाचवा स्थानी आहे. आजचा दिवस नवीन कामाच्या आरंभाला अनुकूल नाही. जीवनसाथी आणि संतती ह्यांच्या स्वास्थ्याची काळजी घ्यावी लागेल. चर्चा किंवा वाद-विवाद ह्यात मानहानी होणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. स्त्री मित्रांसाठी पैसा खर्च होईल. शारीरिक आणि मानसिक अस्वस्थतेमुळं उत्साहात कमतरता जाणवेल. आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी सर्वसाधारणपणे चांगला आहे.
  • कर्क : आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र चौथ्या स्थानी आहे. आज शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य लाभणार नाही. छातीत दुखणं किंवा इतर व्याधींचा त्रास जाणवेल. कुटुंबियांशी खडाजंगी उडेल. मानहानी संभवते. स्त्री किंवा वाणी यांमुळं एखादे संकट उभे राहण्याची शक्यता आहे. पैसा खर्च होईल. वेळेवर भोजन मिळणार नाही. निद्रानाशाचा त्रास संभवतो.
  • सिंह : आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र तिसरा स्थानी आहे. आज आपण शरीरात चैतन्य आणि मनाची प्रसन्नता अनुभवाल. मित्रांबरोबर अधिक घनिष्टता अनुभवाल. मित्र किंवा स्वजन यांच्यासह लहानशी सहल कराल. आर्थिक फायदा होईल. प्रिय व्यक्तीचा सहवास मन आनंदीत करेल. नशिबाची साथ मिळेल. आजचा दिवस नवीन काम किंवा योजना स्वीकारण्यास अनुकूल आहे. आज संगीतात विशेष रूची राहील.
  • कन्या : आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र दुसरा स्थानी आहे. कौटुंबिक सुख-शांती आणि आनंद ह्यामुळं आजचा दिवस आनंदात जाईल. आपल्या मधुर वाणीचा प्रभाव आज इतर लोकांना प्रभावीत करेल. प्रवासाची शक्यता आहे. मिष्टान्नासह आज आवडीचं भोजन मिळेल. आयात-निर्यात व्यापारात चांगलं यश मिळेल. परंतु वाद-विवाद, चर्चा ह्यात उग्रता दाखवू नका.
  • तूळ : आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र प्रथम स्थानी आहे. आज आपल्यातील रचनात्मक शक्ती प्रकट होईल. सृजनात्मकताही दिसून येईल. वैचारिक दृढता असेल आणि त्यामुळं कामे सफल बनतील. वस्त्रालंकार, मौज-मजेची साधने आणि मनोरंजन ह्यासाठी पैसे खर्च होतील. आत्मविश्वास वाढेल. जीवनसाथी किंवा प्रिय व्यक्तीचा सहवास रोमांचक आणि आनंददायी असेल.
  • वृश्चिक : आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र बारावा स्थानी आहे. आज आपला पैसा आणि वेळ मनोरंजनासाठी खर्च होईल. स्वास्थ्या संबंधी तक्रार राहील. मनाला चिंता लागून राहील. एखादी दुर्घटना संभवते. कुटुंबीय किंवा सगे-सोयरे यांच्याशी गैरसमज किंवा मतभेद होतील. कोर्ट-कचेरीच्या कामात सावध राहावे लागेल. प्रत्येक विषयात संयम ठेवून व्यवहार केल्यास अनर्थ होणार नाही.
  • धनू : आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र लाभात स्थानी आहे. आज आर्थिक लाभ आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळवून कौटुंबिक जीवनात सुद्धा सुख संतोष अनुभवाल. आज मिळकतीत वाढ आणि व्यापारात लाभ होईल. प्रिय व्यक्तीच्या सहवासात सुखद क्षण अनुभवू शकाल. मित्रांसह पर्यटन स्थळाला भेट द्याल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. पत्नी किंवा संतती ह्यांच्या कडून लाभ संभवतो.
  • मकर : आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र दशमात स्थानी आहे. आज व्यवसायात धन, मान आणि प्रतिष्ठा ह्यात वाढ होईल. व्यापारासाठी धावपळ व वसुलीसाठी प्रवास ह्यातून फायदा संभवतो. वरिष्ठ आपल्यावर खूश असल्यानं पदोन्नती संभवते. सरकार, मित्र किंवा संबंधितांकडून फायदा होईल. कौटुंबिक जीवन आनंदी असेल. संततीची प्रगती पाहून आनंदित व्हाल.
  • कुंभ : आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र भाग्यात स्थानी आहे. आज आपण जरी शारीरिकदृष्टया अस्वस्थ असलात तरीही मानसिकदृष्टया स्वस्थता टिकवण्याचा प्रयत्न करा. आज काम करण्याचा उत्साह कमी राहील. नोकरीत वरिष्ठांच्या नाराजीस सामोरे जावं लागेल. मौज-मजा तसेच सहलीसाठी खर्च होईल. संतती बाबतीत चिंता राहील. प्रतिस्पर्ध्यांबरोबर चर्चेत सहभागी होऊ नका. परदेशातून एखादी चांगली बातमी मिळेल.
  • मीन : आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र अष्टमात स्थानी आहे. आज अवैध कामापासून दूर राहावे. क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. सरकार विरोधी कृत्यांपासून दूर राहावं. प्रकृतीच्या देखभालीसाठी पैसा खर्च करावा लागेल. मानसिक बेचैनी जाणवेल. कुटुंबियांशी असणार्‍या संबंधात नकारात्मकता येऊ देऊ नका. आपणास योग्य दिशा सापडण्यासाठी प्रयत्न करा.

हेही वाचा -

  1. प्रेमीयुगुलांसाठी हा आठवडा ठरेल खास; वाचा साप्ताहिक राशीभविष्य - Weekly Horoscope
  2. 20 मे 2024 पंचांग : काय आहे आजचा शुभ मुहूर्त, योग आणि राहूकाळ - Today Panchang
Last Updated : May 20, 2024, 10:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.