ETV Bharat / politics

"1999 पासूनच उद्धव ठाकरे...", देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट - Devendra Fadnavis

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 12, 2024, 3:33 PM IST

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज (12 मे) एका मुलाखतीदरम्यान ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केलाय. त्यामुळं राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे.

Devendra Fadnavis criticized Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस (ETV Bharat)

मुंबई Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी ऐन रंगात आली आहे. तसंच याच पार्श्वभूमीवर घेण्यात येत असलेल्या प्रचारसभेत सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांवर तर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर आरोप-प्रत्यारोप केले जाताय. असं असतानाच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीवेळी उद्धव ठाकरेंबाबत एक नवा गौप्यस्फोट केलाय. त्यामुळं राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? : एका मुलाखतीत बोलत असताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "1999 पासूनच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडू लागली होती. त्यांना तेव्हापासून आपण मुख्यमंत्री व्हावं असं वाटत होतं. म्हणून त्यांनी अपक्ष आमदारांच्या मागण्यांकडं दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली. दरम्यानच्या काळात नारायण राणे पुन्हा मुख्यमंत्री होतील असं ठाकरेंना वाटलं. त्यामुळं त्यांनी नारायण राणेंना रोखण्याचं काम केलं. जनहितापेक्षा त्यांना पद महत्त्वाचं वाटत होतं", असा मोठा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीसांनी केलाय.

फडणवीस म्हणजे कच्चं मडकं : दुसरीकडं देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या गौप्यस्फोटासंदर्भात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना विचारलं असता ते म्हणाले की, "देवेंद्र फडणवीस हे राजकारणातील कच्चं मडकं असल्यानं त्यांना फारसं गांभीर्यानं घेऊ नका", असा खोचक टोला राऊतांनी फडणवीसांना लगावला. तसंच 1999 साली आम्ही निवडणुकीत हरलो होतो. हे त्यांना माहित नसावं. किंवा तेव्हा ते राजकारणात सक्रिय नसतील. त्यांचा अभ्यास कमी आहे. कॉपी करून मुलं पास होतात तसं ते कॉपी करून पास झालेत, असा हल्लाबोलही यावेळी राऊतांनी केला.

हेही वाचा -

  1. अनिल देशमुखांचा गौप्यस्फोटानंतर देवेंद्र फडणवीस यांनी दिला इशारा; म्हणाले"निवडणुकीच्या काळात..." - Devendra Fadnavis
  2. "सुप्रिया सुळेंना सर्वकाही..."; अजित पवार का बाहेर पडले? देवेंद्र फडणवीसांनी थेटच सांगितलं.... - Devendra Fadnavis On NCP
  3. विजय वडेट्टीवार पाकिस्तानात...?; देवेंद्र फडणवीसांचा सवाल, ठाकरेंवरही हल्लाबोल - Devendra Fadnavis
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.