ETV Bharat / politics

काँग्रेस नसती तर तुमचं काय झालं असतं? चर्चा करायला कधीही तयार... सुप्रिया सुळेंचा भाजपाला टोला

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 17, 2024, 2:11 PM IST

Supriya Sule Challenges BJP : भाजपाच्या वतीनं आज मुंबईत 'काँग्रेस नसती तर काय झालं असतं' या पुस्तकाचं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. यावरून सुप्रिया सुळे यांनी भाजपाला आव्हान दिलं.

Supriya Sule: "काँग्रेस नसती तर काय झालं असतं" यावर कधीही चर्चा करायला तयार - सुप्रिया सुळे
Supriya Sule: "काँग्रेस नसती तर काय झालं असतं" यावर कधीही चर्चा करायला तयार - सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे

पुणे Supriya Sule Challenges BJP : देशात लोकसभा निवडणुका लागल्या आहेत. त्यातच आज राहुल गांधीची भारत जोडो न्याय यात्रा मुंबई दाखल झालीय. महाविकास आघाडी त्याठिकाणी मोठं शक्ती प्रदर्शन करत असताना मुंबईतच भाजपाकडून 'काँग्रेस नसती तर काय झालं असतं', या पुस्तकाचं प्रकाशन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या हस्ते होणार आहे. कुठेतरी भाजपा राहुल गांधीजींचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न करत असल्याच्या राजकीय चर्चा होत आहेत. त्यावर सुप्रिया सुळे यांनी भाजपावर कडाडून टीका केलीय.

मी कधीही चर्चा करायला तयार : यावेळी बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "फिल्डवरल्या नेत्याचं आणि पुस्तक प्रकाशनाचं काही संबंध असेल असं मला वाटत नाही. पण काँग्रेस नसती तर या देशाचं काय झालं असतं? तुमचं काय झालं असतं यावर चर्चा करायला मी कधीही तयार आहे." खासदार सुळे पुढं म्हणाल्या की, "इलेक्ट्रॉल बॉंड्समध्ये मोठा घोटाळा झालाय. त्याचबरोबर राज्यांमध्ये पाच टप्प्यात निवडणुका होत आहेत. मोठ्या टप्प्यांमध्ये निवडणुका का होत आहेत? यामागेही काहीतरी आहे का? हे पाहावं लागेल."

  • शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे निवडणूक लढवण्यासाठी आग्रही आहेत. त्यावर बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाले, " राजकारण हा माझा व्यवसाय नाही. मी या भागातले प्रश्न मांडण्यासाठी संसदेत जाते. त्यामुळं या भागातले प्रश्न मांडण्यासाठीच लढत आहे," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.

रोजगार मेळाव्यात जनतेची फसवणुक : "बारामतीमध्ये महारोजगार मेळाव्यात मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार होता. परंतु, तेवढ्या प्रमाणात रोजगार मिळालेला नाही. त्यामुळं ही जनतेची फसवणूक आहे. कार्यक्रमाचा मंडप राखण्यासाठी पाच कोटी खर्च केले. पण तुम्ही जनतेला फसवलं आहे. इतके रोजगार कुठे गेले, याचा प्रश्न आता विचारला पाहिजे. अरविंद केजरीवाल यांना पुन्हा नोटीस आलीय. निवडणूक आलेली असताना अशा नोटीस येत असतात. परंतु मी कोर्टाचे आभार मानते. त्यांनी कालच जामीन मंजूर केलाय. परंतु, आजच त्यांना नोटीस आल्यानं आश्चर्यचआहे. मोठा दबाव आणि दडपशाही आहे. हे सिद्ध होत आहे," असल्याचंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

हेही वाचा :

  1. "अजित दादांनी भाषणातून मान्य केलं की, आमच्या पक्षात..."; सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया
  2. Supriya Sule On Vijay Shivtare : विजय शिवतारे बारामतीतून निवडणूक लढवणार; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "लोकशाही..."
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.