ETV Bharat / politics

"माझ्यावर वार कराल तर फाशी द्या. असंच सोडलं तर...,"; कॉंग्रेस नेते सुनील केदारांचा सत्ताधाऱ्यांना थेट इशारा - SUNIL KEDAR reaction

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 28, 2024, 2:47 PM IST

Sunil Kedar : रामटेकच्या काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वेंचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सुनील केदार यांनी सत्ताधाऱ्यांनाच आव्हान देत घराघरात जाऊन तुमचे हाल करेल असा थेट इशारा दिलाय. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता राज्याचं राजकारण तापण्याची चिन्हं आहेत.

"माझ्यावर वार कराल तर फाशी द्या. असंच सोडलं तर...,"; कॉंग्रेस नेते सुनील केदारांचा सत्ताधाऱ्यांना थेट इशारा
"माझ्यावर वार कराल तर फाशी द्या. असंच सोडलं तर...,"; कॉंग्रेस नेते सुनील केदारांचा सत्ताधाऱ्यांना थेट इशारा

सुनील केदार

नागपूर Sunil Kedar : सत्ताधारी भारतीय जनता पक्षातील महत्त्वाचे नेते आणि काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांच्यातील वैर सर्वश्रुत आहे. मध्यंतरी नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या रोखे घोटाळ्या प्रकरणी 5 वर्षांची शिक्षा झाल्यानंतर माजी सुनील केदार आणि भाजपा नेत्यांमध्ये हे वैर आणखीच वाढलंय. काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वेंचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सुनील केदार यांनी एकप्रकारे सत्ताधाऱ्यांनाच आव्हान देत घराघरात जाऊन तुमचे हाल करेन असा इशाराच दिलाय.

काय म्हणाले सुनील केदार : यावेळी बोलताना सुनील केदार म्हणाले, "सत्ताधाऱ्यांनो तुमच्या अधिकाऱ्यांना सांगून द्या, पुढच्या वेळेला सुनील केदारवर वार कराल तर त्याला थेट फाशी द्या. असंच सोडलं तर सुनील केदार तुमच्या घराघरात जाऊन तुमचे हालहाल करेल." तसंच सुनील केदार यांनी महायुतीच्या नेत्यांना घरात घुसून धडा शिकवण्याचाही इशारा दिलाय. रश्मी बर्वेंचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर महाविकास आघाडीची छोटेखानी सभा झाली. त्यावेळी त्यांनी या प्रकारे भाष्य केलय.

मी घाबरत नाही तुम्ही घाबरु नका : या सभेत कार्यकर्त्यांना उद्देशून सुनील केदार यांनी सत्ताधाऱ्यांना घाबरायचं कारण नाही, मी त्यांना घाबरत नाही, तुम्ही ही घाबरू नका. जे व्हायचे आहे ते होऊ द्या असं वक्तव्य केलंय. सुनील केदार एवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी थेट इशारा दिला. सत्ताधाऱ्यांविरोधात लढा शेवटपर्यंत लढणार आणि सामान्य माणसांसाठी लढणार असंही केदार म्हणाले. रामटेकच्या निवडणुकीत ईव्हीएमची काळजी करु नका. ईव्हीएमची काळजी सुनील केदार घेईल. ईव्हीएमची काळजी कशी घ्यायची हे सुनील केदारला पुरतं माहिती असल्याचं सांगून केदारांनी रामटेक लोकसभा मतदारसंघात जोरात प्रचाराला लागण्याच्या सूचनाही कार्यकर्त्यांना केल्या.

हेही वाचा :

  1. आघाडीत बिघाडी! उद्धव ठाकरेंना आघाडी धर्म पाळला नाही; बाळासाहेब थोरात यांची स्पष्टोक्ती - MVA meeting over seat sharing
  2. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याची प्रक्रिया सुरू; राज्यातील 'या' मतदारसंघांचा समावेश; पहिल्या टप्प्यात 5 जागांसाठी 'इतके' अर्ज - Lok Sabha Elections 2024
  3. पाच वर्षात गडकरींच्या संपत्तीत 116 टक्क्यांनी वाढ; महाविकास आघाडीचे उमेदवार विकास ठाकरेंची किती आहे संपत्ती? - Nagpur Lok Sabha Constituency
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.