ETV Bharat / politics

"...तर तुम्हाला बारामतीत दूधच विकावं लागलं असतं"; संजय राऊतांचा अजित पवारांवर हल्लाबोल - Sanjay Raut on Ajit Pawar

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 28, 2024, 12:44 PM IST

Sanjay Raut
...तर तुम्हाला बारामतीत दूधच विकावं लागलं असतं; संजय राऊतांचा अजित पवारांना सणसणाटी टोला

Sanjay Raut : शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांना जोरदार टोला लगावलाय. ते आज पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

संजय राऊत

पुणे Sanjay Raut : ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना भाजपानं उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघातून लोकसभेसाठी उमेदवारी दिली. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाष्य केलंय. "पक्षानं उमेदवारी दिली आणि त्यांनी ती स्वीकारली हा त्या पक्षाचा आणि त्या व्यक्तीचा प्रश्न आहे. महाविकास आघाडी म्हणून तो मतदारसंघ आमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे. तिथं ज्यांनी पक्ष वाढवला, मोठा केला तसंच युतीचे शिल्पकार ज्यांना म्हटलं जातं, असे प्रमोद महाजन यांची कन्या पूनम महाजन यांचं तिकीट कापून प्रमोद महाजन यांची 'लेगसी' ही पूर्णपणे संपवून टाकली. उज्ज्वल निकम हे जरी भाजपाचे उमेदवार असले तरी तिथं महाविकास आघाडीचा उमेदवार हा 100 टक्के जिंकणार आहे. उज्ज्वल निकम यांनी जळगावमधून उमेदवारी घ्यायला हवी होती," असा सल्ला संजय राऊत यांनी दिला.

तुम्हाला आजही दूध विकावं लागलं असतं : "अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या देखील निवडणुकीत पडणार आहेत." तसंच तुम्ही जे काम केलं आहे, ते काम करण्यासाठी तुम्हाला सामर्थ्य हे सुप्रिया सुळे यांचे वडील शरद पवार यांनी दिलंय. नाहीतर तुम्हाला बारामतीत आजही दूध विकावं लागलं असतं, तेही 'राजदूत'वरुन," असं म्हणत संजय राऊतांनी अजित पवार यांना टोला लगावलाय.

अजित पवारांवर हल्लाबोल : बारामतीत अजित पवार हे तळ ठोकून आहेत. यावर संजय राऊत म्हणाले की, "बारामतीत तळ ठोका, तंबू बांधा किंवा स्वतः ला बांधून घ्या, काहीही होणार नाही. ते म्हणतात की, मी विजयासाठी मैदानात उतरत असतो, मग 2019 ला पार्थ पवार कसे पडले? अजित पवार हे आपली कातडी वाचवणारे नेते आहेत. अजित पवार यांनी कातडी वाचवण्यासाठी पक्षांतर केलंय. हीच कातडी वाचवण्यासाठी ते आज शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करत आहेत."

महाविकास आघाडीच्या 30 ते 35 जागा येतील : अनेक ठिकाणी महायुतीकडून उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाहीत. याबाबत संजय राऊत यांना विचारलं असता ते म्हणाले की, "अनेक ठिकाणी उमेदवार हे देण्यात आले नाहीत. सध्याची परिस्थिती पाहता राज्यात 30 ते 35 जागा आम्ही जिंकू." तसंच अनेक मतदारसंघात फडणवीस आणि अजित पवार हे धमक्या देत असल्याचंही यावेळी राऊत म्हणाले. बारामतीची लढाई ही अस्मितेची लढाई आहे. आमच्यासाठी 48 च्या 48 जागा या महत्त्वाच्या आहेत. बारामतीत शरद पवारांचा पराभव शक्य नाही. आज सुप्रिया सुळे यांच्यासाठी त्यांच्या घरातीलच नाही तर आम्ही सर्व सुप्रिया सुळे यांची भावंडं असून, त्यांचा प्रचार करत आहोत. त्या प्रचंड बहुमतानं जिंकून येणार असल्याचा विश्वास राऊतांनी व्यक्त केलाय.

हेही वाचा :

  1. चंदा दो धंदा लो.. हा खेळ महाराष्ट्रात सुरू; 'श्रीकांत शिंदेंकडून 500 कोटींचा घोटाळा,' संजय राऊतांचा गंभीर आरोप - Sanjay Raut Allegations
  2. 'तुमचं नमो नमो चालते, पण जय भवानी नाही'; संजय राऊतांचा भाजपावर हल्लाबोल, म्हणाले 'तुमचं हिंदुत्व नकली' - Sanjay Raut Attack On Pm Modi
  3. लोकसभा निकालानंतर भाजपावर आकडे लावण्याची वेळ येईल, इंडिया आघाडी 300 पेक्षा जास्त जागा जिकंणार - संजय राऊत - LOK SABHA ELECTION 2024
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.