दिलीप वळसे पाटलांच्या सभेत 'शरद पवार जिंदाबाद'च्या घोषणा; वळसे पाटील म्हणाले...

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 25, 2024, 11:30 AM IST

Dilip Walse Patil News

Dilip Walse Patil : निवडणुकांच्या अनुषंगानं सर्वच राजकीय नेते आपआपल्या मतदारसंघात दौरे, प्रचार करत असल्याचं दिसून येतंय. मंत्री दिलीप वळसे पाटील हे शनिवारी आंबेगाव दौऱ्यावर होते. वळसे पाटलांच्या सभेत कार्यकर्त्यांनी 'शरद पवार जिंदाबाद'च्या घोषणा दिल्या होत्या. त्यानंतर दिलीप वळसे पाटलांनी भाषण थांबवल्याचं दिसून आलं.

दिलीप वळसे पाटलांच्या सभेत शरद पवार जिंदाबादच्या घोषणा

पुणे Dilip Walse Patil : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात कालवा संदर्भात महत्त्वाची बैठक शनिवारी पार पडली. या बैठकीला पुणे शहर तसेच पुणे जिल्ह्याचे सर्व आघाडीचे नेते उपस्थित होते. पाणी संदर्भात महत्त्वाची बैठक पार पडल्यानंतर दिलीप वळसे पाटील हे त्यांच्या नियोजित दौऱ्यानुसार पाबळ येथे बैलगाडा शर्यतीसाठी पोहचले होते. यावेळी दिलीप वळसे पाटील यांच्या सभेत गोंधळ घालण्यात आला.

दिलीप वळसे पाटील यांच्या भाषणावेळी गोंधळ : आंबेगाव येथे दिलीप वळसे पाटील यांचा दौरा होता. वळसे पाटील यांनी यावेळी जनतेला संबोधित केलं. शेतीला आणि पिण्यासाठी लागणाऱ्या पाणी संदर्भात दिलीप वळसे पाटील हे भाषणादरम्यान बोलत होते. त्यावेळी पाबळ येथील काही कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या नावाची घोषणाबाजी केली. त्यानंतर वळसे पाटील यांच्या भरसभेत एकच गोंधळ उडाला. त्यानंतर पाटील यांनी भाषण थांबवलं.

शरद पवार जिंदाबादच्या घोषणा : राष्ट्रवादी फुटीनंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यात संघर्ष पाहायला मिळत आहे. अशातच शनिवारी अजित पवार गटाचे नेते राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील पाबळ येथे कार्यक्रमाच्या निमित्तानं आले होते. त्यावेळी त्यांचं भाषणं सुरू असतानाच उपस्थित नागरिकांकडून 'शरद पवार जिंदाबाद'च्या घोषणा देण्यात आल्या. त्यावेळी सभास्थळी एकच गोंधळ उडाला.

शरद पवार यांच्यावर तेवढंच प्रेम : यावेळी दिलीप वळसे पाटील म्हणाले की, "जेवढं प्रेम तुमचं शरद पवार यांच्यावर आहे, तेवढंच प्रेम माझं देखील आहे. मी तर 40 वर्ष त्यांच्यासोबत काम केलंय. पण काही राजकीय परिस्थिती असतात, ज्यामुळं असे निर्णय घ्यावे लागतात. हे काही राजकीय व्यासपीठ नाही आणि मी काही त्यावर बोलणार नाही."


हेही वाचा -

  1. ऊसदरासाठी 'स्वाभिमानी' आक्रमक; पुणे-बंगळूरू महामार्गावर चक्काजाम आंदोलन, पाहा व्हिडिओ
  2. Gram Panchayat Election : दिलीप वळसे पाटील यांची गड आला पण सिंह गेला अशी अवस्था, गावात सरपंचपदी शिंदे गटाचा उमेदवार विजयी
  3. Ajit Pawar Kolhapur Sabha : सभेत शेतकऱ्यांनी झळकवले बॅनर; तर अजित पवार यांचे भाषण सुरू असताना लोक उठून गेले
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.