ETV Bharat / politics

'माझ्या माहितीप्रमाणे अमित शाह यांना पंतप्रधान व्हायचं आहे'; संजय राऊत यांचा मोठा दावा

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 28, 2024, 2:49 PM IST

Sanjay Raut On Amit Shah : लोकसभा निवडणुकीचं पडघम वाजू लागलं आहे. केव्हाही लोकसभा निवडणुकाच्या तारखा जाहीर होऊ शकतात. त्यातच खासदार संजय राऊत यांनी आज मोठा दावा केलाय. अमित शाह यांना पंतप्रधान व्हायचं असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केलाय.

MP Sanjay Raut
खासदार संजय राऊ
प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत

मुंबई Sanjay Raut On Amit Shah : केव्हाही लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर आता सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. जागा वाटपासंदर्भात सर्वच पक्षांच्या बैठका सुरू असून, कोण किती जागांवर लढवणार, याबाबत चर्चा सुरू आहे. तर, आपल्या देशाला मिळणारा पुढचा पंतप्रधान कोण? याची उत्सुकता जनतेला लागलीय. एका बाजूला महाराष्ट्रात महाविकास आघाडीत जागा वाटप हा चर्चेचा विषय आहे. या जागा वाटपात वंचित बहुजन आघाडीला किती जागा मिळणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर, दुसरीकडं पुन्हा एकदा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीच शपथ घेणार, का देशाला पंतप्रधान म्हणून नवा चेहरा मिळतोय? याची उत्सुकता देशाला लागली आहे. या पार्श्वभूमीवर आता खासदार संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलं असून 'अमित शाह यांना पंतप्रधान होण्याची इच्छा' असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय.

अमित शाह घराणेशाहीवर बोलतात : मुंबईत आपल्या निवासस्थानी माध्यमांशी बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, "अमित शाह हल्ली परिवार वादावर बोलतात. घराणेशाहीवर बोलतात. या देशातील काही घरांना प्रतिष्ठा आहे. त्यातील एक ठाकरे घराण्याला आहे. या देशात शरद पवारांच्या घराण्याला देखील प्रतिष्ठा आहे. कारण, या दोन्ही घराण्यांनी देशाला, महाराष्ट्राला, समाजाला खूप काही दिलंय. या घराण्यांचे लाभार्थी नरेंद्र मोदी आणि अमित शाहसुद्धा आहेत. हे त्यांनी आपल्या मनाला विचारावं, बाळासाहेब ठाकरे यांच्या घराण्याचा वारसा हिंदुत्वाचा आहे. त्याचाही लाभ भारतीय जनता पक्षानं वारंवार घेतला आहे. बाळासाहेब ठाकरे जर नसते तर भारतीय जनता पक्ष राज्यात औषधालाही दिसला नसता. बाळासाहेबांचं आणि त्यांच्या घराण्याचं बोट धरून राज्यात भाजपा पक्ष वाढलेला आहे."

जय शाह आपल्या घराण्याचे नाहीत का : पुढे बोलताना खासदार राऊत म्हणाले की, "घराणे शाहीची गोष्ट करता, जय शाह आपल्या घराण्याचे नाहीत का? जय शाह आपले चिरंजीव आहेत. त्यामुळं ते भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी काय क्रिकेटमध्ये 100 सेंच्युरी मारल्या आहेत का? त्यांनी काय 5000 विकेट घेतल्या आहेत का? विराट कोहली, सेहवाग पेक्षा जास्त सिक्सर मारले आहेत का? की, त्यांनी क्रिकेटचे प्रशिक्षक म्हणून काम केलं आहे? कोणाच्या घराणेशाहीवर आपण बोलताय? ठाकरे आणि पवारांची घराणेशाही देशाला आणि समाजाला कायम निर्णयदायी दिशा देणारी आहे. येथे कोणाला मुख्यमंत्री बनायचं नाही. माझ्या माहितीप्रमाणे अमित शाह यांना प्रधानमंत्री व्हायचं आहे. पण, मी अजून सांगतो नरेंद्र मोदी प्रधानमंत्री आहेत. सत्तेचा सारीपाट तुमच्या इशाऱ्यावर चालणार नाही. तुमच्याकडं सत्ता, पैसा आणि तपास यंत्रणा आहे म्हणून तुमचं चाललं आहे. ज्या दिवशी तुमच्याकडं हे नसेल तेव्हा तुमची अवस्था देशात काय असेल याचा विचार करा."

मविआच्या जागावाटप ठरलं : महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, महाविकास आघाडीचं जागा वाटप हे अंतिम टप्प्यात आलेलं आहे. मंगळवारी सुद्धा आम्ही तीन प्रमुख पक्षांची वंचित बहुजन आघाडीसह चर्चा झाली. आज पुन्हा आम्ही बैठकीला बसणार आहोत. आज अंतिम बैठक असेल. कारण, आता फार उशीर लावण्यात अर्थ नाही. आमच्या चारही पक्षांमध्ये जागा वाटपासंदर्भात कोणताही संभ्रम नाही. उगाच ओरबडून घ्यायचं, जागांचा आकडा वाढवायचा हे धोरण नाही. प्रत्येक जागा आम्हाला जिंकायची आहे. मंगळवारच्या बैठकीत पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते त्यांची देखील हीच भूमिका आहे. वंचित बहुजन आघाडीनं सुद्धा मान्यता दिलेली आहे. महाराष्ट्रातली प्रत्येक जागा जिंकून देशाच्या संविधानावर जो हल्ला होत आहे तो हल्ला परतवून लावायचा हीच आमची सर्वांची भूमिका आहे. हुकूमशाही विरुद्ध लढायचं, देशाच्या लोकशाहीची पुन्हा एकदा प्राणप्रतिष्ठा करायची आणि देशाच्या संविधानाला जो धोका निर्माण झालेला आहे, त्या संविधानाचं रक्षण करण्यासाठी आम्ही एकत्रित काम करू हा आमचा निर्णय आहे.

हेही वाचा -

  1. मातोश्रीच्या पायऱ्या कोण चढलं होतं?; संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांसह अमित शाहांना सवाल
  2. अशोक चव्हाणांचा भीतीपोटी भाजपात प्रवेश, आगामी निवडणुकीत आमचं बहुमत - संजय राऊत
  3. मुख्यमंत्र्यांबद्दल पोटशूळ असणं हे आता जनतेलासुद्धा कळायला लागलयं- उदय सामंत यांचा संजय राऊतांना टोला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.