ETV Bharat / politics

ईडी कारवाई सुरू झाली म्हणजे निवडणुका आल्या; ईडी चौकशीवरुन रोहित पवार आक्रमक

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 23, 2024, 9:12 PM IST

Rohit Pawar On ED Inquiry : आमदार रोहित पवार यांना ईडीनं चौकशीसाठी समन्स बजावलाय. बुधवारी (24 जानेवारी) सकाळी दहाच्या सुमारास ते ईडी कार्यालयात चौकशीसाठी जाणार आहेत. दरम्यान, रोहित पवारांनी ईडीच्या चौकशीला जाण्यापूर्वी त्यांची भूमिका स्पष्ट केलीय.

Rohit Pawar
रोहित पवार

प्रतिक्रिया देताना आमदार रोहित पवार

मुंबई Rohit Pawar On ED Inquiry : शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार बुधवारी ईडी कार्यालयात बारामती ऍग्रो कंपनी प्रकरणी चौकशीसाठी जाणार आहेत. शरद पवार गटाकडून रोहित पवार यांच्या समर्थनार्थ शक्तीप्रदर्शन करून ईडीला आव्हान देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र, आपण कुठल्याही प्रकारे ईडीला आव्हान देण्याचा प्रयत्न करत नसल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं. ईडीनं मागितलेली सर्व कागदपत्रं जमा केल्याचं रोहित पवार यांनी सांगितलंय.

ईडीच्या प्रश्नांना उत्तर देणार : यावेळी रोहित पवार म्हणाले की, बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास ईडी कार्यालयात चौकशीसाठी जाणार आहे. शरद पवारांना मी मंगळवारी भेटलो. यावेळी शरद पवार यांनी सांगितलं की, ते राष्ट्रवादी भवनला असणार आहेत. एखाद्या कार्यकर्त्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न जेव्हा केला जात असेल, तेंव्हा त्याच्या बाजूनं शरद पवार यांच्यासारखे व्यक्ती बाप माणूस उभा राहतो. त्यावेळेस आमच्यासारख्या कार्यकर्त्याला हुरूप येतो. रोहित पवार पुढे म्हणाले की, आजपर्यंत ईडीला ज्या प्रकारे सहकार्य केलं त्याप्रकारे बुधवारी देखील करणार आहे. विचारलेल्या प्रश्नाला योग्य उत्तर देणार आहे.

इतरांना देखील फायदा होईल : 'महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक विषयाबाबत माझी चौकशी सुरू आहे. माझा कारखाना नाही, तर 60 ते 70 लोकांचे कारखाने आहेत. या प्रकरणामध्ये अनेक राजकीय नेत्यांची नावे आहेत. यामध्ये अजित पवारांनी २०२१ मध्ये मीडियाला स्टेटमेंट दिलं होतं की, या केसमध्ये इतर अनेक कारखाने आणि अनेकांची नावे आहेत. त्यात अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारे देखील कारखाने आहेत. मी चूक केली नसून, माझं देखील यात नाव आहे. मी लढणार आहे, यातून मी बाहेर निघेल आणि इतरांना देखील त्याचा फायदा होईल', असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केलाय.

राजकीय द्वेषातून कारवाई : ईडी कारवाई सुरू झाली याचा अर्थ म्हणजे निवडणुका आल्या आहेत. लढायची तयारी माझ्यात आहे. अन्यायाविरोधात लढायचं असेल तर हा विषय घेऊन मी अन्यायाविरोधात लढणार आणि जिंकणार. त्याचा फायदा 64 लोकांना होणार असल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय. तसेच सदरची कारवाई राजकीय द्वेषातून केल्याचं रोहित पवार यांनी स्पष्ट केलंय.

मुंबईत गर्दी करू नये : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आंदोलन करणार आहेत यावर रोहित पवार म्हणाले की, आम्ही विनंती करू शकतो. आमचे कार्यकर्ते काही भाड्याचे नाहीत. आम्ही त्यांना गाडीत बसून आणणार नाही, ते स्वतः येतील. आमचे कार्यकर्ते प्रामाणिक आहेत. महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढण्यासाठी नेहमी ते तयार असतात. कोणावर अन्याय होत असेल तर ते नेहमी पुढाकार घेतात. मग तो साधा शेतकरी, युवा, विद्यार्थी किंवा आमदार असुद्या. तसेच कुणीही मुंबईत गर्दी करू नये, अशी विनंती आम्ही कार्यकर्त्याना केल्याचं रोहित पवार यांनी सांगितलंय.

हेही वाचा -

रोहित पवार यांच्या ईडी चौकशीने कार्यकर्ते आक्रमक; कार्यालयाबाहेर करणार ठिय्या आंदोलन

मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

रामाचा मुद्दा निवडणुकीत वापरणार म्हणून तुमच्या का पोटात दुखतंय; संजय शिरसाटांचा टोला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.