ETV Bharat / politics

ज्यांच्या मनात, कामात राम त्यांच्याकडूनच राम मंदिरासारखे पवित्र कार्य घडू शकतं, फडणवीसांकडून मोदींचं कौतुक

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 20, 2024, 6:38 PM IST

Fadnavis On PM Modi : ज्यांच्या मनात आणि कामात राम आहेत असे पंंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्याकडूनच राम मंदिरासारखं पवित्र कार्य घडू शकतं, (Construction of Ram Mandir) असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोदींचं कौतुक केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला दहशतवादातून मुक्त करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जाणून घेऊया फडणवीसांचे सविस्तर मत (PM Narendra Modi)

Fadnavis On PM Modi
देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी आणि राम मंदिराविषयी बोलताना

ठाणे Fadnavis On PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनात आणि कामात राम आहे. त्यामुळेच त्यांच्याकडून राम मंदिर बांधण्यासारखं पवित्र कार्य घडू शकलं, (Devendra Fadnavis) असे उद्‌गार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र मोदी यांच्या विषयी काढले. दहशतवादापासून सर्व सामान्यांची मुक्तता करण्यासाठी गरज पडेल तेव्हा हाती शस्त्र घेऊन प्रभू रामाने जसा दुर्जनांचा नाश केला तसंच नरेंद्र मोदी देखील सर्जिकल स्ट्राइक आणि एयर स्ट्राइकच्या माध्यमातून या देशात रामराज्य आणू पाहात असल्याचं त्यांनी सांगितलं. (Deputy Chief Minister)

'या' कारणाने मोदींचा जयजयकार : नरेंद्र मोदी यांनी गोरगरिबांसाठी देशात अनेक योजना राबवल्यामुळं दारिद्र्यरेषेखालील जनसंख्येचा आकडा घटल्याचं फडणवीसांनी सांगितलं. काँग्रेसचे पंतप्रधान राजीव गांधी हे दिल्लीहून एक रुपया पाठवत होते; मात्र सामान्य माणसांपर्यंत त्यातील 25 पैसे यायचे. परंतु, मोदी एक रुपया पाठवतात तर पूर्ण पैसे खालपर्यंत मिळतात, अशा शब्दात त्यांनी मोदींची स्तुती केली. स्वार्थी राजकारण्यांपेक्षा संपूर्ण जीवनामध्ये स्वतः आणि आपल्या परिवाराला महत्त्व न देता समाज आणि देश श्रेष्ठ मानल्यामुळेच मोदींचा जयजयकार होत असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

तर मोठं परिवर्तन करू शकतो : राजकारण्यांच्या मुलांनी राजकारणात यावं; परंतु त्यांचे तेवढेच क्वालिफिकेशन महत्त्वाचे ठरू नये. प्रभू श्रीरामांनी राज्य सर्वसामान्यांचं असलं पाहिजे. त्या उक्तीनुसार मोदीजी सर्वसामान्यांना घेऊन सरकार चालवत आहेत. आयुष्यभर आपली तत्त्वं जपत मूल्य ठरवणारी माणसं असतात. तीच युगपुरुष होतात आणि म्हणून अशा प्रभू श्रीरामाला आपण देव समजतो. सामान्य माणसाने मनात आणले तर मोठं परिवर्तन करू शकतो. याचे ज्वलंत उदाहरण छत्रपती शिवराय असल्याचं फडणवीस म्हणाले. आई जिजाऊंच्या प्रेरणेनं स्वराज्याची संकल्पना मांडून स्वराज्य स्थापन करण्याचं स्वप्न उराशी बाळगत शिवरायांनी सामान्य मावळ्यांना एकत्र आणत स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. मोगलांची फौज कितीही असली तरी देव, देश आणि धर्माकरता लढणारे मावळे शेवटी सर्वस्व ठरले. या मावळ्यांमधूनच पुढे सेनापती आणि सरसेनापती तयार झाले. शिवरायांच्या या अतुल्य कामगिरीमुळे त्यांना आपण युगपुरुष समजतो असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हेही वाचा:

  1. संजय राऊत यांच्या टीकेला अजित पवारांचा पलटवार, 'विनाशकाले विपरीत बुद्धी' म्हणत केला हल्लाबोल
  2. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकार ॲक्शन मोडमध्ये, मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक
  3. आमिर खानची मुलगी आयरा खान पती नुपूर शिखरेसोबत गेली हनीमूनला ; फोटो केले शेअर
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.