ETV Bharat / politics

फोडाफोडीसाठी भाजपाकडून साम, दाम आणि दंडाचा वापर– अनिल देशमुख - Anil Deshmukh On BJP

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 21, 2024, 10:52 PM IST

Anil Deshmukh allegation on BJP says Saam Daam and Dand were used by BJP to divide the party
अनिल देशमुख

Anil Deshmukh Criticized BJP : पक्ष फोडाफोडीसाठी भाजपाकडून साम, दाम आणि दंडाचा वापर करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप, माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केला आहे. ते बारामतीत बोलत होते.

अनिल देशमुख यांनी बारामतीत प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना भाजपावर टीका केली

बारामती Anil Deshmukh Criticized BJP : बारामती येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी ‘गोविंदबाग’ निवासस्थानी भेट घेतली. यावेळी शरद पवार आणि अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत भटक्या विमुक्त सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांचा पक्ष प्रवेश पार पडला. त्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना अनिल देशमुख यांनी भाजपावर जोरदार टीका केली.

काय म्हणाले अनिल देशमुख? : पुत्र आणि कन्येच्या प्रेमापोटी शिवसेना, राष्ट्रवादी फुटली अशी टीका केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी केली होती. या टीकेला उत्तर देत अनिल देशमुख म्हणाले की, "भाजपानं गेल्या दोन वर्षांपासून राज्यात तोडफोडीचं राजकारण सुरु केलंय. त्यांनी फोडाफोडीसाठी साम, दाम आणि दंडाचा वापर केला. भाजपाच्या माध्यमातून सर्वप्रथम शिवसेना फोडण्यात आली. प्रत्येक आमदाराला 50 कोटी देऊन आमचं सरकार पाडलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांना कशाची तरी भीती दाखवत राष्ट्रवादी पक्ष फोडण्यात आला. भाजपाच्या फोडाफोडीला जनता कंटाळली असून लोकसभा निवडणुकीत जनता याचं उत्तर देईल."

विधानसभा निवडणुकीपर्यंत घरवापसी होणार : पुढं ते म्हणाले की, "सुप्रिया सुळे यांच्या कामाविषयी गेल्या 15 वर्षातील तपशील देशाला माहित आहे. केंद्र आणि राज्याच्या माध्यमातून त्या विकासासाठी प्रयत्नशील राहिल्या आहेत. कामाच्या बाबतीत सतर्क असणाऱ्या खासदार म्हणून त्यांची ओळख आहे. बारामती मतदारसंघातील जनता त्यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून देईल." तसंच आमचे जे लोक त्यांच्यासोबत गेलेत. त्यातील अनेकांना आपली दिशाभूल झाल्याचं लक्षात आलंय. त्यामुळं लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीपर्यंत त्यातील अनेकजण घरवापसी करतील. तर बाहेरून येणारे पहिल्या पंक्तीत बसले आणि आम्ही मूळचे असून बाजूला आहोत, असं सांगत भाजपा आमदार नाराजी व्यक्त करत असल्याचंही देशमुख म्हणाले.

हेही वाचा -

  1. Devendra Fadnavis : "काळ्या पैशाचा स्त्रोत बंद झाल्यामुळं...", देवेंद्र फडणवीसांचे राहुल गांधींना सडेतोड उत्तर
  2. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा वाद : 'भाजपाला सगळे पक्ष संपवायचे', शिंदे गटाच्या 'या' नेत्याचा भाजपावर हल्लाबोल
  3. 'सरकारला निष्पक्ष निवडणुका नको आहेत'; अरुण गोयल यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेससह तृणमूल काँग्रेसची भाजपावर टीका
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.