ETV Bharat / politics

मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना खुलं आव्हान, 'सागर' बंगल्याच्या सुरक्षेत वाढ

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 25, 2024, 8:11 PM IST

Manoj Jarange VS Devendra Fadnavis : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आता थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर परखड शब्दांत हल्लाबोल केलाय. या सगळ्याच्या पाठिशी देवेंद्र फडणवीसच असल्याचा खळबळजनक आरोप जरांगे पाटील यांनी आंतरवलीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. तसंच "फडणवीसांना जर माझा बळी हवाय, तर मी स्वतः सागर बंगल्यावर जातो," असंही ते म्हणाले. याच पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्र्यांच्या सागर बंगल्याबाहेर सुरक्षा यंत्रणेत वाढ करण्यात आली आहे.

after Manoj Jarange Patil challenge security increased at deputy CM Devendra Fadnavis sagar bungalow in mumbai
मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना खुलं आव्हान, 'सागर' बंगल्याच्या सुरक्षेत वाढ

मुंबई Manoj Jarange VS Devendra Fadnavis : राज्य सरकारनं विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला 10 टक्के स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. मात्र, यावरुन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील नाराज असल्याचं पहायला मिळतंय. याच पार्श्वभूमीवर आज (25 फेब्रुवारी) बोलत असताना मनोज जरांगे पाटलांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. तसंच त्यांना खुलं आव्हान देत जरांगे म्हणाले की, "देवेंद्र फडणवीस तुम्हाला मला मारायचंच असेल, तर मी स्वतः सागर बंगल्यावर येतो, मला मारून दाखवा”, असं ते म्हणाले. यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाल्याचं बघायला मिळतंय. याच पार्श्वभूमीवर आता फडणवीसांच्या सागर बंगल्या भोवतीच्या सुरक्षा यंत्रणेत वाढ करण्यात आली आहे.

डीसीपी मोहित गर्ग यांनी केली पाहणी : मनोज जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांना केलेल्या आव्हानानंतर हा वाद अजूनच पेटून उठणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्या भोवती कडेकोट पोलीस बंदोबस्त करण्यात आलाय. तसंच डीसीपी मोहित गर्ग यांनी स्वतः या ठिकाणची पाहणी केली आहे. मात्र, असं असलं, तरीही या प्रकरणावरुन आता पुन्हा एकदा मराठा आंदोलक मुंबईकडं येण्याची शक्यता आहे.

नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील? : मनोज जरांगे पाटलांनी आज जालन्यातील अंतरवली सराटीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी फडणवीसांवर हल्लाबोल करत ते म्हणाले की, "देवेंद्र फडणवीसांना माझा बळी घ्यायचा आहे. मला फडणवीसांकडून जीवे मारण्याचा प्रयत्न होतोय. फडणवीसांना राज्यातील मराठा समाजाचा प्रभाव संपवायचा आहे. सगे-सोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणीत अडथळे निर्माण करायचे आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीशिवाय राज्यात काहीही होऊ शकत नाही." तसंच फडणवीसांनी मराठा समाजात फूट पाडा आणि राज्य करा, या राजकारणाचाही वापर केला आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

हेही वाचा -

  1. 'आंदोलन संपवण्यासाठी मला मारण्याचा प्रयत्न'; मनोज जरांगे यांचा फडणवीसांवर गंभीर आरोप
  2. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणारच नाही, रामदास आठवले स्पष्टपणे बोलले
  3. असल्या भंगार लोकांवर बोलायचं नाही, मनोज जरांगे पाटील यांची बारस्कर महाराजांवर प्रतिक्रिया
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.