शरीरातील एक एक कण भारत मातेसाठी, पंतप्रधान मोदींची ग्वाही; यूएई 100 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवणार व्यापार

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 15, 2024, 8:24 AM IST

Updated : Feb 15, 2024, 8:57 AM IST

PM Modi in UAE

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अबुधाबीत पहिल्या हिंदू मंदिराचं उद्घाटन केलं आहे. यावेळी त्यांनी अनिवासी भारतीयांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी यूएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांची भेट घेतली. या भेटीत अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांनी भारत यूएई द्विपक्षीय व्यापार 2030 पर्यंत 100 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवणार असल्याचा आशावाद व्यक्त केला.

नवी दिल्ली PM Modi in UAE : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अबुधाबी इथं पहिल्या हिंदू मंदिराचं उद्घाटन केलं आहे. यावेळी उपस्थित अनिवासी भारतीयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भव्य स्वागत केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या वेळातील क्षण अन् क्षण आणि शरीरातील कण न् कण भारत मातेसाठी आहे, असं स्पष्ट केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांनी आर्थिक सहकार्य मजबूत करण्यासाठी मान्यता दिली आहे. तसंच भारत आणि यूएई यांच्यातील व्यापार 2030 पर्यंत 100 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवेल, असा आशावाद व्यक्त केला.

पहिल्या हिंदू मंदिराचं उद्घाटन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अबुधाबी इथं पहिल्या हिंदू मंदिराचं उद्घाटन केलं. अबुधाबीत बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेच्या (BAPS) वतीनं हे मंदिर बांधण्यात आलं आहे. या मंदिराच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनिवासी भारतीयांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी " अयोध्येतील राम मंदिरानंतर आज मी अबुधाबीतील मंदिराचं उद्घाटन केलं. माझ्या मित्रांनी मी मंदिराचा सर्वात मोठा पुजारी असल्याचं म्हटलं आहे. मी मंदिराचा पुजारी होण्याची माझी पात्रता आहे का, हे माहिती नाही. मात्र मी भारत मातेचा सर्वात मोठा पुजारी आहे," असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

पंतप्रधान मोदी आणि यूएई अध्यक्ष अल नाह्यान भेट : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अबुधाबी दौऱ्यावर गेल्यानंतर त्यांची यूएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांनी त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर दोन्ही देशादरम्यान पार पडलेल्या 14 फेब्रुवारीला दुबईत शिखर परिषद पार पडली. यात दोन्ही देशांनी आर्थिक भागीदारी करा मजबूत करण्याबाबत चर्चा केली. भारत आणि यूएई या दोन्ही देशादरम्यान 1 मे 2022 रोजी सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार ( CAPA ) लागू करण्यात आला आहे. हा भारताचा तिसरा सगळ्यात मोठा करार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही सातवी भेट : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मागील 9 वर्षातील ही सातवी यूएई भेट होती. या भेटीत दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय गुंतवणूक करार हा देशांमधील विविध क्षेत्रातील गुंतवणुकीला आणखी प्रोत्साहन देण्यासाठी मदतीचा ठरेल, असंही यावेळी स्पष्ट करण्यात आलं.

हेही वाचा :

  1. पंतप्रधान मोदींचं दुबईत जोरदार स्वागत; मोदींच्या भेटीनंतर काय म्हणाले दुबईतील भारतीय ?
  2. Burj Khalifa : तिरंग्याच्या रंगात उजळला 'बुर्ज खलिफा', अशा प्रकारे झाले पंतप्रधान मोदींचे स्वागत
Last Updated :Feb 15, 2024, 8:57 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.