ETV Bharat / international

BAPS हिंदू मंदिर : पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्‌घाटन झालेले युएईमधील मंदिर कसे आहे? जाणून घ्या सविस्तर माहिती

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 14, 2024, 8:18 PM IST

Updated : Feb 14, 2024, 8:24 PM IST

BAPS Hindu Mandir : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (14 फेब्रुवारी) अबुधाबीमध्ये UAE मधील पहिल्या पारंपरिक हिंदू दगडी मंदिराचं उद्‌घाटन झालं. 27 एकर जागेत 700 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या मंदिराबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

BAPS Hindu Mandir
BAPS हिंदू मंदिर

अबू धाबी (UAE) BAPS Hindu Mandir : संयुक्त अरब अमिरातीमधील पहिल्या पारंपरिक हिंदू दगडी मंदिराचं आज (14 फेब्रुवारी) रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्‌घाटन झालं. (First Hindu Mandir in UAE ) ते आजपासून भाविकांसाठी खुलं केलं जाणार आहे. संयुक्त अरब अमिराती विविध धर्मांना मान्यता देण्याच्या बाबतीत कितीतरी पुढारली आहे, हे हिंदू मंदिराच्या बांधकामातून दिसून येते.

जाणून घ्या BAPS हिंदू मंदिराबद्दल माहिती:

1) BAPS (बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था) ही वेदांवर आधारित एक सामाजिक-आध्यात्मिक, हिंदू श्रद्धा आहे. याची स्थापना अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात भगवान स्वामीनारायण यांनी केली. १९०७ मध्ये शास्त्रीजी महाराज यांनी औपचारिकपणे स्थापना केली.

2) BAPS व्यावहारिक अध्यात्मावर आधारित आहे. आजच्या जगात आध्यात्मिक, नैतिक आणि सामाजिक समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करते. त्याची ताकद त्याचा हेतू आणि शुद्धतेमध्ये आहे. BAPS चे जगभरात 3,850 पेक्षा जास्त केंद्रांचे नेटवर्क आहे. त्याच्या प्रसारातून संस्थेला अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. ही संस्था संयुक्त राष्ट्र्संघाशीदेखील निगडीत आहे.

3) 2014 मध्ये पंतप्रधान मोदी सत्तेवर आल्यानंतर या हिंदू मंदिराची संकल्पना मांडण्यात आली. 2015 मध्ये पंतप्रधानांच्या UAE दौऱ्यादरम्यान यूएई सरकारनं मंदिरासाठी जमीन दिली. इंदिरा गांधींच्या भेटीनंतर 34 वर्षांनंतर प्रथमच भारताच्या पंतप्रधानांनी या देशाला भेट दिली. त्यातून पहिल्यांदाच धोरणात्मक निर्णय झाला.

4) मोदींच्या भेटीनंतर, UAE सरकारने BAPS मंदिराला 13.5 एकर जमीन उपलब्ध करून देण्यासाठी रॉयल डिक्री जारी केली. यूएई सरकारनं 2019 मध्ये BAPS ला अतिरिक्त 13.5 एकर जमिनीचं वाटप केले. यामुळे BAPS ला वाटप करण्यात आलेल्या एकूण जमीन ही 27 एकर झाली.

5) 2018 मध्ये दुबई ऑपेरा हाऊसमधून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पंतप्रधान मोदींनी अरब राष्ट्राच्या त्यांच्या दुसऱ्या राज्य भेटीवर पायाभरणी केली होती. एप्रिल 2019 मध्ये शिलान्यास झाला. मंदिराच्या बांधकामाला डिसेंबर 2019 मध्ये सुरुवात झाली. तब्बल 700 कोटी रुपये खर्च करून बांधलेले हे मंदिर पश्चिम आशियातील सर्वांत मोठे हिंदू मंदिर होणार आहे. आश्चर्यकारक वास्तुशिल्प, 3,000 लोकांची क्षमता असलेले प्रार्थनागृह, एक समुदाय केंद्र, एक प्रदर्शन हॉल आणि इतर अनेक मंदिराची वैशिष्ट्यं आहेत.

6) मंदिराची उंची 32.92 मीटर (108 फूट), लांबी 79.86 मीटर (262 फूट) आणि 54.86 मीटर रुंदी (180 फूट) आहे. भारतीय कारागिरांनी तयार केलेले आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये एकत्र केलेले हे मंदिर अंदाजे 55,000 चौरस मीटर क्षेत्र व्यापलेले आहे. हे 1.80 लाख चौरस मीटर (50,000 घनफूट) गुलाबी गुलाबी वाळूचा खडक, 1.50 लाख चौरस मीटर (18,000 चौरस फूट) शुद्ध पांढरा इटालियन संगमरवरी आणि 18,000 विटा वापरून तयार केले आहे.

7) गुलाबी वाळूचा खडक आणि पांढरा इटालियन संगमरवरी दगड भारतात कोरला आहे. 402 पांढऱ्या संगमरवरी खांबांवर राजस्थान आणि गुजरातमधील 2,000 हून अधिक कारागिरांनी नक्षीकाम केले आहे. या मंदिराची रचना वैदिक वास्तुकला आणि शिल्पकलेवर आधारित आहे.

8) भगवान शिवाला समर्पित मंदिरात शिव पुराणातील श्लोक आहेत. तसेच 12 ज्योतिर्लिंगाचे भाविकांना दर्शन घेता येते. तर जगप्रसिद्ध असलेली 'जगन्नाथ यात्रेचा उत्सवदेखील पाहता येतो. भागवत आणि महाभारतातील कथांचा जिवंत प्रत्यह या मंदिरात भाविकांना अनुभवता येतो.

9) अयोध्येतील राम मंदिराप्रमाणेच हे मंदिर लोखंड आणि स्टीलचा वापर न करता बांधण्यात आलं आहे. मंदिरात भारताच्या विविध भागांतील विविध देवतांना समर्पित सात मंदिरे आहेत. यामध्ये भगवान राम, भगवान हनुमान, भगवान शिव आणि त्यांचे कुटुंब यांची मंदिरे आहेत. त्याचबरोबर भगवान जगन्नाथ, भगवान कृष्ण, श्री अश्कर-पुरुषोत्तम महाराज, भगवान तिरुपती बालाजी आणि भगवान अयप्पा मंदिराचादेखील समावेश आहे. प्रत्येक देवतेचे जीवन आणि शिकवण प्रतिबिंबित करणारे हे मंदिर अत्यंत जटील आणि सुंदर कोरीव कामांनी सुशोभित केलेलं आहे.

हेही वाचा:

  1. राज्यसभेसाठी महायुतीचे उमेदवार जाहीर, 'आयारामांचं' नशिब फळफळलं; अजित पवार गटाचे मात्र 'वेट अ‍ॅंड वॉच'
  2. शाहरुख खाननं विमानतळावर साजरा केला 'फॅन'चा वाढदिवस, पापाराझींचे केले कौतुक
  3. आदिवासी तरुणाला नग्न करुन बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल, तीन महिन्यानंतर प्रकरण उघडकीस
Last Updated : Feb 14, 2024, 8:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.