ETV Bharat / health-and-lifestyle

लैंगिक छळ म्हणजे काय? अशा प्रकरणांमध्ये काय असू शकते शिक्षा, जाणून घ्या काय आहे कायदा?

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 23, 2024, 7:47 PM IST

Sexual Harassment : लैंगिक छळाच्या घटना वरचेवर वाढत आहेत. अनेक कार्यालयांमध्ये महिलांचे लैंगिक शोषण होत असल्याच्या बातम्या ऐकायला मिळत आहेत. अशा प्रकरणांमध्ये काय आणि किती शिक्षा असू शकते तसंच कोणते कायदे आहेत जाणून घेऊया.

Sexual Harassment
लैंगिक छळ म्हणजे काय ?

हैदराबाद : हे जग स्त्रिया आणि मुलींच्या बाबतीत लोक म्हणतात तितकं सरळ नाही. अनेक प्रसंगी, ती घरात आणि शाळांमध्ये हिंसाचार आणि लैंगिक छळाची शिकार बनते. आता तिला काम करतानाही या समस्येला सामोरं जावं लागतं. देशभरातील सुमारे 50 टक्के नोकरदार महिला त्यांच्या करिअरच्या आयुष्यात एकदा तरी लैंगिक छळाच्या बळी ठरल्या आहेत. पण लोकलज्जा आणि भीतीनं तक्रार करण्याचे धाडस करू त्या करु शकत नाहीत.

बहुतेक प्रकरणे दाबली जातात : आपल्या समाजात क्वचितच अशी कोणतीही स्त्री असेल जिला लैंगिक छळाची माहिती नसेल. काही महिलांना दररोज लैंगिक छळाचा सामना करावा लागतो. आपल्या समाजात उघडकीस येणाऱ्या लैंगिक छळाच्या प्रकरणांपेक्षा कितीतरी अधिक प्रकरणे घडतात मात्र ती उघडकीस येऊ दिली जात नाहीत. लैंगिक छळाची प्रकरणे लपवून ठेवण्याची अनेक कारणं आहेत. ज्यामध्ये समाजात अपमान, न्याय मिळवण्यासाठी अनेक वर्षे न्यायालयात जावे लागते किंवा त्रासानंतर धमक्या येतात. या सर्व कारणांमुळे अनेकदा ही प्रकरणे दडपली जातात. ही बाब लपवणे हे छळ वाढण्याचे प्रमुख कारण आहे.

लैंगिक शोषण म्हणजे काय? लैंगिक छळ म्हणजे काय ते जाणून घ्या. संमतीशिवाय होणार्‍या कोणत्याही प्रकारच्या लैंगिक क्रियांना लैंगिक छळ म्हणतात. मुलगा आणि मुलगी दोघेही या श्रेणीत येत असले, तरी अनेकदा मुलींसोबत लैंगिक छळ अधिक होताना दिसतो. देशातील विविध राज्यांतील कार्यालयांमध्ये महिलांचे लैंगिक शोषण होताना दिसते. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे लैंगिक शोषणाची केवळ एक लाख दोन लाख प्रकरणे नाहीत तर लाखो प्रकरणे नोंदवली गेली आहेत. अनेक वेळा मुलींना समजू शकत नाही की त्यांच्यासोबत लैंगिक छळ झाला आहे.

लैंगिक छळामध्ये कशाचा समावेश आहे : मुलीला तिच्या संमतीशिवाय स्पर्श करणे, घाणेरडे मेसेज पाठवणे, मुलीचे जबरदस्तीने चुंबन घेणे, घाणेरडे बोलणे, मुलीवर अश्लील शेरेबाजी करणे, शिट्टी मारणे, तिच्या लैंगिक जीवनाबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करणे आणि फोनवर किंवा तिच्यासमोर तिच्याशी लज्जा उत्पन्न होईल असे बोलणे. विनोद, या सर्व गोष्टी लैंगिक छळाच्या अंतर्गत येतात. आपल्या देशात लैंगिक छळाची प्रकरणे नोंदवल्या गेलेल्यापेक्षा जास्त लपवली जातात. मात्र, अलीकडच्या काळात त्यात काही बदल झाले आहेत. अशा घटनांविरोधात अनेक महिला उघडपणे पुढे येतात. परंतु अशी प्रकरणे फारच दुर्मीळ आहेत आणि त्याचे कारण म्हणजे संबंधित कायद्याचे ज्ञान नसणे.

लैंगिक छळावर कायदा : सन 2013 पर्यंत भारतीय संविधानाच्या कलम 354 नुसार लैंगिक छळाच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, जर आरोप सिद्ध झाला तर त्याला आयपीसी कलमांतर्गत एक वर्ष ते 5 वर्षे कारावासाची शिक्षा होऊ शकत होती. केस काहीही असो पण 2013 नंतर या कायद्यात सुधारणा करून लैंगिक छळाची चार विभागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. कलम- 354-A, कलम- 354-B, कलम- 354-C, कलम- 354-D.

मुंबई महानगर न्यायदंडाधिकाऱ्यांना दिलेल्या एका निकालानुसार या कायद्यांतर्गत महिलेलाही दोषी ठरवता येते. एखाद्या महिलेने दुसऱ्या महिलेला या कलमाच्या अंतर्गत बाबींमध्ये त्रास दिला असल्यास तिलाही दोषी ठरवण्यात येऊ शकते अशा आशयाचा हा निकाल देण्यात आला होता.

1. कलम 354-अ लैंगिक छळ :

  • अयोग्य किंवा दुर्भावनापूर्ण हेतूने स्त्रीला स्पर्श करणे.
  • स्त्रीच्या संमतीशिवाय जबरदस्तीने अश्लील किंवा लैंगिक सामग्री दाखवणे.
  • सेक्सची मागणी किंवा विनंती.
  • स्त्रीबद्दल असभ्य किंवा लैंगिक टिप्पणी करणे.

2. कलम 354-अ अंतर्गत शिक्षा :

  • १ ते ३ वर्षे सश्रम कारावास आणि दंड.
  • हा जामीनपात्र, दखलपात्र गुन्हा आहे आणि कोणत्याही दंडाधिकार्‍याद्वारे न्यायपात्र आहे.
  • हा गुन्हा संमिश्र नाही.

कलम 354-बी : एखाद्या महिलेवर हल्ला करणे किंवा तिचे कपडे काढण्याच्या उद्देशाने बळाचा वापर करणे. जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या महिलेला नग्न करण्यास भाग पाडते किंवा तिला नग्न होण्यास प्रवृत्त करते, तेव्हा त्याच्याविरुद्ध कलम 354-बी अंतर्गत गुन्हा दाखल केला जातो.

3. कलम 354-बी अंतर्गत शिक्षा :

  • शिक्षा - 3 ते 7 वर्षे सश्रम कारावास आणि दंड.
  • हा अजामीनपात्र, दखलपात्र गुन्हा आहे आणि कोणत्याही दंडाधिकार्‍याद्वारे खटला चालवला जातो.
  • हा गुन्हा संमिश्र नाही.

कलम 354 सी अश्लील व्हिडिओ बनवणे/फोटो घेणे : जेव्हा एखाद्या महिलेचा अश्लील व्हिडिओ बनवला जातो. त्याशिवाय महिलेचे कोणतेही खासगी कृत्य सार्वजनिक करणे देखील या कलमांतर्गत समाविष्ट आहे. जर त्याने असे केले तर त्याच्यावर कलम 354-सी अंतर्गत गुन्हा दाखल केला जातो.

4. कलम 354-सी अंतर्गत शिक्षा :

  • प्रथमच दोषी आढळल्यास 1 ते 3 वर्षे कारावास
  • दुसऱ्यांदा दोषी आढळल्यास 7 वर्षे कारावास आणि दंड
  • हा अजामीनपात्र, दखलपात्र गुन्हा आहे आणि कोणत्याही दंडाधिकार्‍याद्वारे खटला चालवला जातो.
  • हा गुन्हा संमिश्र नाही.

कलम 354-डी स्टकिंग : कोणत्याही वाईट हेतूने एखाद्या महिलेचा पाठलाग करणार्‍या किंवा दुसर्‍यासाठी असे करणार्‍या किंवा इंटरनेट, ई-मेल किंवा इलेक्ट्रॉनिक संप्रेषणाद्वारे तिच्यावर नजर ठेवणारी कोणतीही व्यक्ती यांच्यावर कलम 354-डी अंतर्गत गुन्हा दाखल केला जातो.

5.कलम 354-डी अंतर्गत शिक्षा :

  • प्रथमच दोषी आढळल्यास 1 ते 3 वर्षे कारावास.
  • दुसऱ्यांदा दोषी आढळल्यास ५ वर्षे कारावास आणि दंड.
  • हा अजामीनपात्र, दखलपात्र गुन्हा आहे आणि कोणत्याही दंडाधिकार्‍याद्वारे खटला चालवला जातो.
  • हा गुन्हा संमिश्र नाही.

हेही वाचा :

  1. ग्लूटेन फ्री आहार म्हणजे काय? 'हे' आहेत त्याचे आरोग्य फायदे
  2. सिताफळ आरोग्यासाठी उत्तम; खाण्यानं होतील 'हे' जबरदस्त फायदे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.