ETV Bharat / entertainment

अनिल आणि फराहनं 'द ग्रेट इंडियन कपिल शो'ला केलं हायजॅक, पाहा प्रोमो... - The Great Indian Kapil Show

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 22, 2024, 5:49 PM IST

'The Great Indian Kapil Show' Promo Out : 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा नवीन प्रोमो आज, 22 मे रोजी रिलीज झाला आहे. या प्रोमोमध्ये अनिल कपूर आणि फराह खान कपिलच्या शोला हायजॅक करताना दिसत आहेत.

The Great Indian Kapil Show Promo Out
द ग्रेट इंडियन कपिल शो प्रोमो रिलीज ('द ग्रेट इंडियन कपिल शो' चा लेटेस्ट प्रोमो (@kapilsharma Instagram))

मुंबई - 'The Great Indian Kapil Show' Promo Out : कॉमेडी किंग कपिल शर्माचा ओटीटी शो 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा नवा प्रोमो बुधवारी 22 मे रोजी रिलीज करण्यात आला आहे. 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या आगामी एपिसोडमध्ये बॉलिवूडचा 'झकास' अभिनेता अनिल कपूर आणि चित्रपट निर्माता-कोरियोग्राफर फराह खान पाहुणे म्हणून येणार आहेत. 'द ग्रेट इंडियन कपिल शो' आगामी एपिसोडचा नवीन प्रोमो हा खूप मजेदार आहे. या शोला अनिल कपूर आणि फराह खाननं हायजॅक केल्याचं प्रोमोत दिसत आहे.

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा नवा प्रोमो रिलीज : आज कपिलनं त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा प्रोमो पोस्ट केला आहे. या प्रोमोमध्ये त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं की, "जेव्हा अनिल कपूरचं 1, 2, 4 आणि फराह खानचं 5 6 7 8 कपिलला भेटतात, तेव्हा ब्लॉकबस्टर मनोरंजनाची गारंटी असते." व्हायरल होत असलेल्या प्रोमोमध्ये अनिल कपूर 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये स्वागत असल्याचं म्हणताना दिसत आहे. शोच्या नवीन जजची ओळख करून देताना अनिल म्हणतो, "पापाजी आमच्या शोचे जज आहेत." यानंतर फराह खान शोच्या जज अर्चना पूरण सिंगची जागा घेण्यासाठी पुढे जाते. यावर अर्चना पूरण सिंग म्हणते, "तुम्ही तिथेच राहा." यावर फराह म्हणते, "तुम्ही देखील दुसऱ्याची सीट घेतली आहे." यानंतर तिथे उपस्थित असलेले लोक हसतात.

'द ग्रेट इंडियन कपिल शो'मधील आतापर्यंतचे पाहुणे : 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा एक नवीन भाग नेटफ्लिक्सवर दर शनिवारी स्ट्रीम होत असतो. गेल्या आठवड्यात कपिलनं गायक एड शीरनचं पाहुणे म्हणून स्वागत केलं होतं. एपिसोडमध्ये एड शीरननं चाहत्यांचं खूप मनोरंजन केलं होत.यापूर्वी, विकी कौशल, आमिर खान, आई नीतू-बहीण रिद्धिमा यांच्यासह रणबीर कपूर आणि सनी देओल-बॉबी देओल यांसारख्या सेलिब्रिटींनी या शोमध्ये दिसले आहेत. कपिलचा हा शो खूप हिट झाला आहे. आता अनेकजण आगामी एपिसोडची खूप आतुरतेनं वाट पाहात आहेत. व्हायरल झालेल्या प्रोमोच्या पोस्टवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देऊन शोचं कौतुक करत आहेत.

हेही वाचा :

  1. मनीषा कोईरालानं ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची घेतली भेट, फोटो केले शेअर - Manisha Koirala meets UK PM
  2. कोलकाता नाईट रायडर्सनं सामना जिंकल्यानंतर शाहरुख खान झाला खूश, चाहत्यांकरिता दिली सिग्नेचर पोझ - Shah rukh Khan signature pose
  3. करण जोहरच्या आगामी चित्रपटात आयुष्मान आणि साराची जोडी पहिल्यांदाच पडद्यावर दिसणार - AYUSHMANN AND SARA ALI KHAN
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.