ETV Bharat / entertainment

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानात घेतला 'या' साऊथ स्टार्सनं भाग - LOK SABHA ELECTIONS 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 13, 2024, 1:38 PM IST

Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यामध्ये अनेक साऊथ स्टार्सनी मतदान केलंय. आता सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

Lok Sabha Elections 2024
लोकसभा निवडणूक 2024 (Etv Bharat)

हैदराबाद - Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी साऊथकडील तेलंगणा राज्यातील 17 जागांवर मतदान होत आहे. मतदानासाठी लोक पहाटेपासूनच मतदान केंद्रावर पोहोचत आहेत. दरम्यान साऊथ चित्रपटसृष्टीमधील अभिनेता ज्युनियर एनटीआर, अल्लू अर्जुन, मेगास्टार चिरंजीवी, पवन कल्याण', नागा चैतन्य 'आरआरआर' दिग्दर्शक एसएस राजामौली आणि त्यांचा मुलगा एसएस कार्तिकेय, या स्टार्सनं आपला मतदानाचा हक्क बजावला आहेत. अभिनेता पवन कल्याणनं मंगळागिरी येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं. आता या मतदान केंद्रावरून काही व्हिडिओ समोर आले आहेत. आता हे व्हिडिओ अनेकांना आवडत आहेत.

मतदान केंद्रावरून फोटो व्हायरल : नागा चैतन्यनं सकाळी मतदान केंद्रावरून जाऊन आपला हक्क बजावला आहे. नागा सध्या त्याच्या पुढील चित्रपट 'थंडेल'साठी चर्चेत आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर साऊथ अभिनेत्री साई पल्लवी दिसणार आहे.दरम्यान एसएस राजामौली हे मुलगा एसएस कार्तिकेयसह मतदान करण्यासाठी केंद्रावर पोहोचले होते. मतदान करताना पिता-पुत्र कॅमेऱ्यात कैद झाले. मतदान केल्यानंतर एसएस राजामौली यांनी थेट माध्यमांशी संवाद साधला. "आम्ही जबाबदार आहोत आणि आम्हाला देशाची काळजी आहे, कृपया घरातून बाहेर पडा आणि मतदान करा." याशिवाय अनेक स्टार्स आपल्या चाहत्यांना वोट करण्यासाठीचं आवाहन केलं आहे.

मतदान केंद्रावर दिसले स्टार्स : ऑस्कर विजेते एमएम कीरावानी आणि श्रीकांत हे देखील जुबली हिल्समधील मतदान केंद्रावर दिसले. आतापर्यंत चिरंजीवी, पवन कल्याण, ज्युनियर एनटीआर, अल्लू अर्जुन यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी मतदान केलं आहे. त्यांचा मतदान केल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. दरम्यान अलीकडेच मेगास्टार चिरंजीवी यांना दिल्लीतील राजभवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मविभूषण हा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. व या कार्यक्रमात त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा राम चरण, सून उपासना, पत्नी सुरेखा आणि मुलगीही होती. या मोठ्या सन्मानाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आता अनेकजण केंद्रावर जाऊन मतदान करत आहेत.

हेही वाचा :

  1. सारा अली खान आणि अमृता सिंग यांचा क्यूट इब्राहिम अली खानबरोबरचा फोटो व्हायरल, दिसली तैमूरची झलक - Sara Ali khan share pic
  2. अल्लु अर्जुननं हैदराबादमध्ये केलं मतदान, वायएसआर काँग्रेसला पाठिंब्याबद्दल सोडलं मौन - Lok Sabha Election 2024
  3. फाऊंंटन सीनसाठी मनीषा कोईरालानं 12 तास घालवले पाण्याखाली, केली पोस्ट शेअर - Manisha Koirala
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.