ETV Bharat / entertainment

सारा अली खान आणि अमृता सिंग यांचा क्यूट इब्राहिम अली खानबरोबरचा फोटो व्हायरल, दिसली तैमूरची झलक - Sara Ali khan share pic

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 13, 2024, 12:17 PM IST

Sara Ali khan : सारा अली खान, अमृता सिंग आणि इब्राहिम अली खानचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये इब्राहिम हा तैमूरसारखा दिसत आहे. सारानं शेअर केलेला हा बालपणीचा फोटो आता अनेकांना आवडत आहे.

Sara Ali khan
Etv Bharat ((Sara Ali khan instagram))

मुंबई - Sara Ali khan : हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेत्री सारा अली खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सारा अली खान दररोज सोशल मीडियावर तिच्या फोटोंनी खळबळ माजवत असते, मात्र यावेळी तिनं तिच्या बालपणीचा एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती तिच्या आई आणि भावाबरोबर दिसत आहे. मदर्स डेच्या निमित्तानं तिनं हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोत तिचा भाऊ इब्राहिम अली खान हा हुबेहूब तैमूर अली खानसारखा दिसत आहे. हा फोटो खूप जुना आहे. सारा अली खानने मदर्स डेच्या खास निमित्त आलियानं तिच्या बालपणीची ही झलक शेअर करत कॅप्शनमध्ये लिहलं, संपूर्ण जगाला मदर्स डेच्या शुभेच्छा."

सारा अली खान शेअर केलेला फोटो चर्चेत : आता हा फोटो पाहिल्यानंतर या पोस्टवर एका व्यक्तीनं लिहिलं, "तो हुबेहूब तैमूरसारखा दिसतो." दुसऱ्या एकानं लिहिलं, "इब्राहिम आणि तैमूर खूप सारखे दिसतात." आणखी एकानं लिहिलं, "इब्राहिम तैमूरसारखाच क्यूट होता." याशिवाय काहीजण या फोटोवर हार्ट आणि फायर इमोजी शेअर करत आहेत. आता सारानं शेअर केलेला फोटो अनेकांना आवडत आहे.

सारा अली खान आगामी चित्रपट : सारा अली खान अलीकडेच 'मर्डर मुबारक' आणि 'ए वतन मेरे वतन' या चित्रपटांमध्ये दिसली होती. हे दोन्ही चित्रपट मोठ्या पडद्यावर नव्हे तर ओटीटीवर प्रदर्शित झाले होते. या दोन्ही चित्रपटांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. 'मर्डर मुबारक' हा मल्टीस्टारर चित्रपट होता, तर सारा 'ए वतन मेरे वतन'मध्ये इमरान हाश्मी आणि स्पर्श श्रीवास्तवबरोबर दिसली होती. आता लवकरच ती आदित्य रॉय कपूरबरोबर 'मेट्रो इन दिनो'मध्ये दिसणार आहे. दोघेही या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये सध्या व्यग्र आहेत. अलीकडेच, या चित्रपटाच्या संबंधित एक अपडेट समोर आले आहे की, चित्रपटाची शेड्यूल रिलीज डेट बदलण्यात आली आहे.

इब्राहिम लवकर करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण : इब्राहिम अली खानबद्दल बोलायचं झालं तर त्यानं नुकतेच इंस्टाग्रामवर पदार्पण केलं आहे. त्याच्या इंस्टाग्राम पदार्पणाची बरीच चर्चा सोशल मीडियावर झाली होती. आता लवकरच इब्राहिम 'सरजमीन' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर काजोल आणि पृथ्वीराज सुकुमारन हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

हेही वाचा :

  1. विकी कौशल सारा अली खान स्टारर 'जरा हटके जरा बचके' लवकरच होणार ओटीटीवर रिलीज - Zara Hatke Zara Bachke
  2. 'मदर्स डे'निमित्त बॉलिवूड चित्रपटामधील आईवरचे प्रसिद्ध डायलॉग; पाहा फोटो - Happy mothers day
  3. अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचा फोटो व्हायरल, चाहत्यांनी केलं कौतुक - anushka sharm
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.