ETV Bharat / entertainment

शाहरुखची कन्या सुहाना खानने अलिबागमध्ये खरेदी केली ९.५ कोटी रुपयांची जमीन

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 24, 2024, 1:08 PM IST

शाहरुख खानची मुलगी सुहाना खाने अलिबाग शहराजवळील थळ या ठिकाणी साडे नऊ कोटींची जमीन खरेदी केली आहे. ७८३६१ चौरस फूट क्षेत्र असलेल्या या जमीनीसाठी सुहानाने 57 लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरली आहे.

Suhana Khan
सुहाना खान

मुंबई - शाहरुख खानची मुलगी सुहाना खानने अलिकडे ओटीटीवर रिलीज झालेल्या 'द आर्चिज' या चित्रपटातून अभिनयात पदार्पण केले होते. तिने आता रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये ९.५ कोटी रुपयांची जमीन खरेदी केली आहे. ही जमीन अलिबागमधील थळ या ठिकाणी आहे. समुद्र बीचपासून जवळ असलेल्या या जमीनीच्या खरेदी व्यवहारासाठी सुहाना खानने 57 लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरली आहे. ही जमीन ७८३६१ चौरस फूट असल्याचे कागदपत्रांवरून दिसून येते.

13 फेब्रुवारी 2024 रोजी व्यवहाराची नोंदणी झाली होती. गेल्या वर्षी जूनमध्ये सुहानाने रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये 1.5 एकर क्षेत्रात पसरलेल्या एका शेतजमिनीत 12.91 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. थळ गाव अलिबाग शहरापासून १२ मिनिटांच्या अंतरावर आहे. शाहरुख खानची थलमध्ये एक जलतरण तलाव आणि हेलिपॅड असलेली सी-फेसिंग प्रॉपर्टी आहे.

अलिबाग हे सध्या मुंबईतील उद्योजक आणि सेलेब्रिटी यांचे आवडते ठिकाण बनले आहे. स्वच्छ समुद्र किनारा लाभलेला अलिबागचा परिसर हा निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. इथे अनेकांनी समुद्र बीचवर आपले आलिशान रेसॉर्ट्स, फार्म हाऊसेस, बंगले सेलेब्रिटींनी उभारले आहेत. अलिबागमधील बंगले एक एकर ते 10 एकरमध्ये पसरलेले आहेत आणि स्थानानुसार त्यांची किंमत 8 कोटी ते 70 कोटी रुपये आहे, असे काही उद्योजकांकडून साांगितले जाते. यामुळे येथील जमिनींना फार मोठे महत्त्व आले असून पर्यटनाचे एक उत्तम स्थळ म्हणून आलिबागची ओळख निर्माण होत आहे. रो-रो आणि स्पीड बोटींनी मुंबईला अलिबाग जोडल्यानंतर अलिबागची कनेक्टिव्हिटी सुधारली. शिवडी ते न्हावा शेवा यांना जोडणाऱ्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक सागरी सेतूमुळे अलिबागला जाणारा रस्ता संपर्क आणखी सुधारला आहे. मुंबईतील लोक रस्ता आणि समुद्र मार्गे येथे सहज पोहोचू शकतात, त्यामुळे वीकेंडला इथे मोठी गर्दी पर्यटक करत असतात. अशा ठिकाणी सुहाना खानने जमिनी घेऊन आपल्या प्रॉपर्टीत भर टाकली आहे.

हेही वाचा -

  1. बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी यामीच्या 'आर्टिकल 370' ने विद्युतच्या अ‍ॅक्शनर 'क्रॅक'ला मागे टाकले
  2. "शूटिंगच्यावेळी एअरफोर्स टीमकडून मिळालं मार्गदर्शन" : मानुषी छिल्लरनं सांगितली 'ऑपरेशन व्हॅलेंटाईन'ची तयारी
  3. छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपटांची सह्याद्री वाहिनीवर आजपासून पर्वणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.