ETV Bharat / entertainment

परिणीती चोप्राचं फॅन पेज बनलं "वधू वर सूचक मंडळ", परीने बना दी जोडी!! - Parineeti Chopra become Matchmaker

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 25, 2024, 3:34 PM IST

Parineeti Chopra become Matchmaker : परिणीती चोप्राच्या फॅन पेजनं दूर राहणाऱ्या दोन प्रेमींना एकत्र आणलंय. भारतातील लखनौचा तरुण आणि जर्मनीची रहिवासी असलेल्या सुंदरीचं याचं साईटवर जुळलं आणि ते आता बोहल्यापर्यंत पोहोचले आहेत. त्यांनी आपल्या लग्नाचे फोटो शेअर करत परिणीतीचं आभार मानलेत.

Parineeti Chopra become Matchmaker
परिणीती चोप्रा बनली मॅचमेकर

मुंबई - Parineeti Chopra become Matchmaker : परिणीती चोप्राच्या फॅन पेजमुळे एक आंतरखंडीय प्रेमकथा फुलली आहे. नकळतपणे परिणीती मॅचमेकर म्हणून ओळखली जाऊ लागलेय. तिच्या एका उत्तर प्रदेशातील लखनौ येथील चाहत्याला जर्मनीत जन्मेलेल्या मूळ भारतीय वंशाची सुंदरी आवडली. परिणीतीच्या फॅनमुळे झालेल्या ओळखीनंतर या दोघांनी आपले फोटो एकमेकांना शेअर केले. दोघांच्यात प्रेमांचा अंकुर रुजला आणि त्यांनी लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला. इतकच नाही तर त्यांनी आपल्या लग्नातले फोटो थेट सोशल मीडियावर शेअर करत परिणीती चोप्राचं आभार मानले आहेत. यानंतर या अनोख्या लग्नाचा मोठा गाजावाजा सोशल मीडियावर झाला.

Parineeti Chopra become Matchmaker
परिणीती चोप्रा बनली मॅचमेकर

परिणीतीने तिच्या चाहत्यांच्या लग्नाचे फोटो पाहिले आणि ते तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर शेअर केले आहेत. वेगवेगळ्या देशांतील लोकांमध्येही प्रेम कसे अनपेक्षितपणे घडू शकते याचं तिला आश्चर्य वाटलं. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिनं "इंटरनेटची शक्ती आणि प्रेम," असं लिहिलंय.

फोटोंमधला दिसत असलेला वर जतिन शर्मा हा लखनौचा आहे, तर त्याची पत्नी आयला चोप्रा ही भारतीय वंशाची आहे. पण तिचा जर्मनीत झाला आणि तिथेचं तिचं संगोपन आणि वाढ झाली. त्यांच्या सोशल मीडिया फीड्सनुसार, जतिनने 2023 मध्ये आयलाला प्रपोज केलं होतं. मार्च 2024 मध्ये या जोडप्याने भारतीय परंपरेनुसार लग्न केलं आहे.

आयलाने इंस्टाग्रामवर त्यांच्या लग्नाच्या समारंभाचे फोटोही पोस्ट केले आहेत. यामुळे आयलाचं भारतीय मुलाशी लग्न करण्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे. याचा आनंद दोघांनीही व्यक्त केला. सर्वांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दलही त्यांनी आभार मानले आहेत. जेव्हा परिणीती चोप्रानं त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर केले तेव्हा आयलाने तिचे आभार मानले आणि हा सर्वात मोठा आशीर्वाद असल्याचे म्हटलंय.

दरम्यान, सप्टेंबरमध्ये राजकारणी राघव चड्ढासोबत लग्न केलेली परिणीती चोप्रा तिचा नवीन चित्रपट 'चमकिला'च्या प्रदर्शनासाठी सज्ज झाली आहे. इम्तियाज अली दिग्दर्शित या चित्रपटात परिणीती आणि दिलजीत दोसांझ मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट १२ एप्रिल रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा -

  1. अमिताभ बच्चन ते अल्लू अर्जुनपर्यंत सेलिब्रिटींनी चाहत्यांना दिल्या होळीच्या शुभेच्छा, पाहा पोस्ट - Holi 2024
  2. होळी पार्टीचा आनंद लुटण्यासाठी ही टॉप 5 गाणी प्ले तुमच्या लिस्टमध्ये नक्की सामील करा - Top 5 Holi Song
  3. बच्चन कुटुंबानं पारंपरिक पद्धतीनं साजरा केला 'होलिका दहन' उत्सव - Bachchan family Holika Dahan
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.