ETV Bharat / entertainment

'बडे मियाँ छोटे मियाँ' निर्मात्यांनी मशिदीत बॉम्बस्फोट झाल्याच्या खोट्या दाव्यांचं केलं खंडन - Bade Miyan Chote Miyan

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 14, 2024, 3:46 PM IST

Bade Miyan Chote Miyan
बडे मियाँ छोटे मियाँ

Bade Miyan Chote Miyan: मशिदीत बॉम्बस्फोटाच्या दृश्याच्या पसरलेल्या अफवांदरम्यान, 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक निवेदन जारी करत यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

मुंबई - Bade Miyan Chote Miyan: 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपटातील एका मशिदीत बॉम्बस्फोटाच्या दृश्याविषयी पसरलेल्या अफवांदरम्यान, चित्रपटाच्या निर्मात्यांनी या खोट्या दाव्यांचे खंडन केलं आहे. यानंतर सीनबाबत निर्मात्यांनी एक निवेदनही जारी केलंय. 'बडे मियाँ छोटे मियाँ'च्या निर्मात्यांनी एका निवेदनाद्वारे इंटरनेटवर पसरवलेले गैरसमज दूर केला आहे. या निवेदनात म्हटले आहे की, "इंटरनेटवर असे काही व्हिडिओ आहेत जे आमच्या 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपटात मशिदीमध्ये बॉम्बस्फोट झाल्याचा खोटा दावा करत आहेत. निर्माते म्हणून, आम्ही हे सांगू इच्छितो की आम्ही सर्व सांस्कृतिक आणि धार्मिक गोष्टीचा आदर करतो आमच्या चित्रपटात बॉम्बस्फोट आहे. या दृश्यात कोणतेही धार्मिकस्थळ किंवा मशिदी नाही.''

'बडे मियाँ छोटे मियाँ' स्टार कास्ट : निर्मात्यांनी प्रेक्षकांना या निराधार आरोपांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन केले आहे. या चित्रपटाचा एकमेव उद्देश प्रेक्षकांचे मनोरंजन करणे हा आहे. या स्पष्टीकरणाचा उद्देश कोणताही गैरसमज दूर करणे आहे. प्रेक्षकांना कोणतीही चिंता न करता या चित्रपटाचा तुम्ही आनंद घेऊ शकता." बडे मियाँ छोटे मियाँ' एक ॲक्शन-एंटरटेनर चित्रपट आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय आणि टायगरशिवाय सोनाक्षी सिन्हा, मानुषी छिल्लर आणि आलिया इब्राहिम या अभिनेत्री प्रमुख भूमिकेत आहेत. याशिवाय या चित्रपटामध्ये साऊथ अभिनेता पृथ्वीराज सुकुमारननं खलनायकाची भूमिका साकारली आहे.

'बडे मियाँ छोटे मियाँ'ची एकूण कलेक्शन : 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटाची निर्मिती पूजा एंटरटेनमेंट बॅनरखाली जॅकी भगनानी, वाशू भगनानी, दीपशिखा देशमुख आणि हिमांशू किशन मेहरा यांनी केली आहे. 'बडे मियाँ छोटे मियाँ' हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 11 एप्रिल 2024 रोजी प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटाबरोबर बॉक्स ऑफिसवर अजय देवगण स्टारर चित्रपट 'मैदान' देखील रिलीज झाला आहे. दरम्यान या चित्रपटाच्या कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर या 'बडे मियाँ छोटे मियाँ' नं रुपेरी पडद्यावर 31.75 कोटीची कमाई केली आहे. हा चित्रपट 350 कोटीच्या बजेटमध्ये बनविण्यात आला आहे.

हेही वाचा :

  1. सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबारामागे लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात? पाचवेळा मिळालीय जीवे मारण्याची धमकी - salman khan
  2. अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर दोन अज्ञातांचा गोळीबार, लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीवर पोलिसांचा संशय - Salman Khan
  3. 'बेबी जॉन' ऐवजी, 'कल्कि 2898 एडी' होऊ शकतो रिलीज, जाणून घ्या कारण... - Baby John Postponed
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.