मुंबई - Ayan Mukerji Raha : चित्रपट निर्माता अयान मुखर्जी रविवारी 5 मे रोजी रणबीर कपूर आणि आलिया भट्टची मुलगी राहा कपूरबरोबर एका कॅफेबाहेर दिसला. आता राहाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तिच्याबरोबर अयान मुखर्जी दिसत आहे. अयाननं राहाला कडेवर घेतले आहे. आता तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. यावेळी त्यानं कॅज्युअल निळा टी-शर्ट आणि पांढरा शॉर्ट्स घातला होता, तर रणबीर-आलियाच्या राजकुमारी राहानं प्रिंटेड पायजमा सेट परिधान केला होता. कारच्या दिशेनं जात असताना राहाच्या हातात एक पाकीट दिसलं होत.
राहा कपूरचा व्हिडिओ व्हायरल : यानंतर अयाननं त्याच्यामागून येणाऱ्या लोकांवर नाराजी व्यक्त केली आणि तो त्याच्या गाडीच्या दिशेकडे गेला. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा अयान खूप जवळचा आहे. दरम्यान या व्हायरल व्हिडिओवर अनेकजण कमेंट्स करून आपल्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. या व्हिडिओवर एकानं लिहिलं, "राहा ही तिच्या आजोबा ऋषी कपूरसारखी दिसते." दुसऱ्या एकानं लिहिलं, "राहा खूप क्यूट आहे, तिचे डोळे खूप सुंदर आहे." आणखी एकानं लिहिलं, "राहा आलियासारखी दिसते." याशिवाय काहीजण या पोस्टवर फायर आणि हार्ट इमोजी पोस्ट करून राहावर कौतुकाचा वर्षाव करत आहे.
वर्कफ्रंट : दरम्यान रणबीर कपूर यांचा आलिया भट्ट चांगला मित्र असून तो अनेकदा त्यांच्याबरोबर वेगवेगळ्या पार्ट्यांमध्ये दिसतो. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी गेल्या वर्षी ख्रिसमसच्या दिवशी राहाचा चेहरा जगासमोर दाखवला होता, राहा अनेकदा चर्चेत असते. जामनगरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंगमध्ये राहा रणबीर आणि आलियाबरोबर दिसली होती. यावेळी तिचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दरम्यान अयान मुखर्जीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल तर तो 'वॉर 2' या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटात हृतिक रोशन आणि जूनियर एनटीआर दिसणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती यशराज बॅनर करत आहे.
हेही वाचा :