ETV Bharat / entertainment

अंकिता लोखंडे चित्रपट आणि टीव्ही मालिकेत काम करायला तयार... मोबदला नको, 'फ्री'मध्ये अभिनय करणार! - Ankita Lokhande

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 21, 2024, 4:48 PM IST

Updated : Mar 21, 2024, 5:14 PM IST

Ankita Lokhande : अभिनेत्री अंकिता लोखंडेनं एक आता धक्कादायक विधान केलं आहे. तिनं एका मुलाखतीत चित्रपटात आणि टीव्ही मालिकेत मोबदला न घेता काम करायला तयार असल्याचं म्हटलं आहे.

Ankita Lokhande
अंकिता लोखंडे

मुंबई - Ankita Lokhande : 'बिग बॉस 17' फेम अंकिता लोखंडे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिनं तिच्या करिअरची सुरुवात 'पवित्र रिश्ता' या टीव्ही मालिकेतून केली होती. तिची ही मालिका खूप हिट झाली होती. यानंतर तिचं फॅन फॉलोइंग खूप वाढलं होतं. अंकितानं टीव्हीबरोबर हिंदी चित्रपटसृष्टीत हात आजमावला आहे. आतापर्यत अंकितानं फक्त 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' आणि 'वीर सावरकर' या दोन चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' या चित्रपटामध्ये ती कंगना रनौतबरोबर दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकला नाही.

अंकिता लोखंडेने शेअर केली धक्कादायक गोष्ट : आता तिचा 'वीर सावरकर' हा चित्रपट 22 मार्चला प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला. या चित्रपटात तिच्याबरोबर अभिनेता रणदीप हुडा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान, अंकितानं तिच्या करिअरबद्दल एक धक्कादायक गोष्ट सांगितली आहे. तिनं तिच्या करिअरबद्दल आता एक खुलासा केला आहे. एका मुलाखतीत तिनं म्हटलं, ''माझ्यासाठी भूमिका या खूप महत्त्वाच्या आहेत. मी पैशाच्या मागे धावले नाही. मी नेहमीच प्रथम प्रोजेक्टवर लक्ष केंद्रित केलं. आजच्या काळात मी फुकटात शो आणि चित्रपटात काम करायलाही तयार आहे.'' अंकिता लोखंडे पुढं सांगितलं की, ''टीव्ही निर्माते महिला कलाकारांसाठीही बजेट वाढवत आहेत हे पाहून मला खूप आनंद होत आहे.''

अंकिताला पाहिजे काम करण्याची संधी : पुढं तिनं म्हटलं, '' मी फिल्म इंडस्ट्रीबद्दल काही सांगू शकत नाही. पण, मला टीव्हीवर काही चांगलं करण्याची संधी मिळाली तर मी नक्कीच करेन.'' सध्या अंकिताला टीव्ही आणि चित्रपटांमध्ये काम मिळणं कठीण झालं आहे. आता अंकिता 'वीर सावरकर' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ती बऱ्याचदा पती विकी जैनबरोबर हिंदी चित्रपटसृष्टीतील पार्ट्यांमध्ये दिसते. अलीकडेच अंकिता रिॲलिटी शो 'बिग बॉस 17' मध्ये तिच्या पतीबरोबर दिसली होती. या शोमध्ये या जोडप्यामधील भांडणाची चर्चा सोशल मीडियावर खूप झाली होती. शोमधून बाहेर आल्यानंतर दोघेही एकत्र आनंदी आहेत. अंकिता बरेचदा पतीबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

हेही वाचा :

  1. राणी मुखर्जीनं तिच्या 46व्या वाढदिवसानिमित्त पापाराझीबरोबर कापला केक, व्हिडिओ व्हायरल - Rani Mukreji 46th birthday
  2. Stri and Singham : 'स्त्री'चा दुसरा आणि 'सिंघम'चा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला! - Stri and Singham sequel
  3. एसएस राजामौली आणि त्याचा मुलगा जपान भूकंपातून बचावले, केली पोस्ट शेअर - SS Rajamouli
Last Updated : Mar 21, 2024, 5:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.