ETV Bharat / entertainment

अंकिता लोखंडे रणदीप हुड्डासोबत हिंदी चित्रपटसृष्टीत करणार कमबॅक

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 1, 2024, 11:25 AM IST

Ankita Lokhande : अभिनेत्री अंकिता लोखंडे हिंदी चित्रपटसृष्टीत पुन्हा एकदा परतणार आहे. ती रणदीप हुड्डासोबत 'स्वातंत्र्य वीर सावरकर'मध्ये दिसणार आहे.

Ankita Lokhande
अंकिता लोखंडे

मुंबई - Ankita Lokhande : अभिनेत्री अंकिता लोखंडेचे चाहते 'बिग बॉस 17'मध्ये ती न जिंकल्यामुळे नाराज झाले आहेत. अनेकजण तिला बिग बॉसच्या ट्रॉफीचा दावेदार मानत होते. ट्रॉफी न जिंकूनही ती स्टार म्हणून शोमधून बाहेर पडली आहे. या शोमधून बाहेर येताच तिचे नशीब खूप चमकले आहे. कारण लवकरच अंकिता लोखंडे बॉलिवूडमध्ये दमदार कमबॅक करणार आहे. तिचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'स्वातंत्र्य वीर सावरकर' अखेर रिलीजसाठी सज्ज झाला आहे. अंकिता आगामी देशभक्तीपर चित्रपटात रणदीप हुड्डासोबत दिसणार आहे. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 22 मार्च 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.

अंकिता लोखंडे करणार कमबॅक : 'स्वातंत्र्य वीर सावरकर' हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट प्रेक्षक आतुरतेने पाहत होते. दरम्यान, आता प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली आहे, कारण रणदीप हुड्डा आणि अंकिता लोखंडे स्टारर 'स्वातंत्र्य वीर सावरकर' मोठ्या पडद्यावर बॉक्स ऑफिसवर धमाल करण्यासाठी येत आहे. अंकिता लोखंडेच्या 'बिग बॉस 17'मधील कठीण प्रवासानंतर 'स्वातंत्र्य वीर सावरकर' या चित्रपटाच्या माध्यामातून ती नक्कीच प्रेक्षकांची मनं जिंकेल. यापूर्वी अंकितानं 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' या चित्रपटामध्ये काम केलं आहे. या चित्रपटामध्ये तिने झलकारी बाईची भूमिका केली होती. तिची ही दमदार भूमिका सर्वांना आवडली.

'स्वातंत्र्य वीर सावरकर' चित्रपटाबद्दल : 'स्वातंत्र्य वीर सावरकर' चित्रपटासाठी रणदीप हुड्डानं खूप कमी वजन केलं होतं. या चित्रपटासाठी त्यानं खूप मेहनत घेतली आहे. या चित्रपटामध्ये वीर सावरकर यांच्या आयुष्यातील वेगवेगळे टप्पे दाखवण्यात आले आहेत. दरम्यान, 'बिग बॉस 17' मध्ये यशस्वीपणे चाहत्यांची आणि फॉलोअर्सची मने जिंकल्यानंतर, अंकिता लोखंडेची पुढची पायरी म्हणजे ती एक अभिनेत्री म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत उतरत आहे. रणदीप हुड्डानं 'स्वातंत्र्य वीर सावरकर' या चित्रपटाचं दिग्दर्शनही केलंय.

हेही वाचा :

  1. कुणाल खेमूनं मुलीसाठी उघडलं 'पापा पेडीक्योर', पाहा रंजक फोटो
  2. रामानंद सागर यांचे रामायण टीव्हीवर पुन्हा दिसणार
  3. रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानीच्या लग्नाचे स्थळ ऐनवेळी बदलले, वाचा रंजक कारण
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.