ETV Bharat / entertainment

अंकिता लोखंडे आणि विकी जैन स्टारर म्युझिक अल्बम 'ला पिला दे शराब' फर्स्ट लूक पोस्टर रिलीज - ankita lokhande and vicky jain

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 30, 2024, 1:59 PM IST

Laa Pila De Sharaab song : अंकिता लोखंडे आणि तिचा पिती विकी जैन म्युझिक अल्बम 'ला पिला दे शराब'मध्ये एकत्र दिसणार आहे. आता या म्युझिक अल्बममधील फर्स्ट लूक पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे.

Laa Pila De Sharaab song
ला पिला दे शरब गाणं

मुंबई - Laa Pila De Sharaab song : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे आपल्या बिझनेसमन पतीबरोबर 'ला पिला दे शराब' हा नव्या म्युझिक अल्बममध्ये दिसणार आहे. बिग बॉसच्या शेवटच्या सीझनमध्ये धमाका केल्यानंतर आता ही जोडी पुन्हा एकदा धमाल करायला येत आहे. अंकितानं 'ला पिला दे शराब' या गाण्याचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. 'ला पिला दे शराब'ची रिलीज डेट अद्यापही समोर आलेली नाही. आता अंकिताचे चाहते तिच्या आगामी म्युझिक अल्बमची वाट पाहात आहेत. अनेकजण आपल्या प्रतिक्रिया या पोस्टवर देत आहेत.

अंकिता लोखंडेचा म्युझिक अल्बम : या पोस्टरमध्ये अंकिता निळ्या रंगाच्या अनारकली सूटमध्ये दिसत आहे. फोटोत विकी आणि अंकिता एकमेकांकडे पाहत आहेत. विकीच्या हातात वाईनचा ग्लास आहे. काळी पॅन्ट आणि स्काय रंगाच्या शर्टमध्ये विकी जैन हा दारु शौकिनाच्या भूमिकेत दिसत आहे. अंकितानं नवीन गाण्याचं पोस्टर लॉन्च करत पोस्टमध्ये लिहिलं की, ''हा म्युझिक अल्बम लवकरच येईल.'' 'ला पिला दे शराब' हे गाणं लोकप्रिय गायक विशाल मिश्रा यांनी गायलं आहे. याशिवाय मनन भारद्वाजनं यांनी गाण्याचे बोल लिहिले आणि संगीतबद्धही केलं आहेत. तसेच गाण्याचं दिग्दर्शन मिहिर गुलाटी यांनी केलंय. हे गाणं टी-सीरीजची निर्मिती आहे. अंकिता आणि विकी बिग बॉसच्या शेवटच्या सीझनमध्ये एकत्र दिसले होते.

'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाबद्दल : बिग बॉसच्या घरामध्ये दोघांमध्ये खूप भांडणं होताना दिसली होती. यानंतर बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर पुन्हा एकदा हे जोडपे आपला सुखी संसार जगताना दिसत आहे. विकी आणि अंकिता अनेकदा एकत्र बॉलिवूडमधील पार्ट्यांमध्ये दिसतात. नुकताच अंकिताचा 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आहे. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर काही खास कामगिरी करू शकलेला नाही. या चित्रपटामध्ये अंकितानं वीर सावरकर यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 22 मार्च रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचा रणटाईम 2 तास 56 मिनिटांचा आहे. या चित्रपटाकडून रणदीपला खूप अपेक्षा होत्या, मात्र 'स्वातंत्र्यवीर सावरकर' फ्लॉप होण्याच्या मार्गावर आहे.

हेही वाचा :

  1. चमकीला ट्रेलर लाँचमधील परफॉर्मन्स पाहून काही जण परिणीतीला म्हणाले, 'आज गाने की जिद्द ना करो' - Parineeti Chopra Singing
  2. 'द ग्रेट इंडियन कपिल शो' नेटफ्लिक्सवर आज स्ट्रीमिंग होईल, पाहा प्रोमो - the great indian kapil show
  3. अक्षय कुमार स्टारर 'खेल-खेल में'मधून फरदीन खान करणार कमबॅक - fardeen khan
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.