ETV Bharat / entertainment

"कोणाच्याही बापाची फिल्म इंडस्ट्री नाही", नेपोटिझमवर विद्या बालनचं स्पष्ट उत्तर - Actress vidya balan

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 13, 2024, 10:05 AM IST

Vidya Balan On Nepotism
विद्या बालन नेपोटिझमवर

Vidya Balan On Nepotism: विद्या बालननं बॉलीवूडमधील नेपोटिझमवर विधान केलं आहे. तिनं दिलेल्या एका मुलाखतीमध्ये घराणेशाहीबद्दल आलेल्या अनुभवाविषयी सांगितलं.

मुंबई - Vidya Balan On Nepotism: हिंदी चित्रपटसृष्टीमधील सुंदर अभिनेत्री विद्या बालन तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात ही 'हम पांच' या मालिकेपासून केली होती. यानंतर तिनं एका म्युझिक अल्बममध्ये काम केलं. यानंतर तिनं हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करण्यासाठी खूप संघर्ष केला. शेवटी तिला संजय दत्त आणि सैफ अली खान यांच्याबरोबर 2005मध्ये 'परिणीता' या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली. तिचा या चित्रपटमधील अभिनय अनेकांना आवडला आणि तिला अनेक ऑफर्स येऊ लागल्या. यानंतर तिनं अनेक चित्रपटामध्ये काम केलं. दरम्यान आता विद्या बालननं नेपोटिझमबद्दल एक खुलासा केला आहे.

नेपोटिझमवर विद्यानं बालननं केला खुलासा : विद्याला अलीकडेच एका मुलाखती विचारे की, नेपोटिझमचा कधी फटका सहन करावा लागला आहे. यावर तिनं म्हटलं, "मला या प्रश्नाचे उत्तर कसे द्यावे हे मला कधीच कळले नाही. कोणाच्याही बापाची फिल्म इंडस्ट्री नाही, नाहीतर प्रत्येक बापाचा मुलगा, प्रत्येक बापाची मुलगी यशस्वी झाली असती." 'मला असे वाटते की मी एकटी रेंजर आहे'. संधींच्या बाबतीत मला वाटत नाही की माझा वाटा कोणी नाकारू शकेल. त्यामुळे, मला वाटते की यात काही फरक पडत नाही. टॅलेंटमुळे ऑफर्स मिळतात, असं तिनं म्हटलं. याशिवाय तिनं पुढं सांगितलं की, तिच्या पूर्वीच्या नात्यामध्ये फसवणूक झाली होती.

विद्या बालनचा आगामी चित्रपट : विद्या बालन तिच्या आगामी चित्रपट 'दो ओर दो प्यार' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट दोन जोडप्याच्या जीवनावर आधारित आहे. 'दो ओर दो प्यार' हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 19 एप्रिल रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये विद्या बालनशिवाय इलियाना डिक्रूझ , सेंथिल राममूर्ती , प्रतीक गांधी, अरुण अजीकुमार आणि इतर कलाकार दिसणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन शिरसा गुहा ठाकुरता यांनी केलंय. 'दो ओर दो प्यार' चित्रपटाची कहाणी अमृता बागची ईशा चोप्रा सुप्रतीम सेनगुप्ता यांनी लिहिली आहे. याशिवाय पुढं ती कार्तिक आर्यनबरोबर 'भूल भुलैया ३'मध्ये दिसणार आहे दरम्यान विद्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर तिनं निर्माता सिद्धार्थ रॉय कपूरबरोबर डिसेंबर 2012 मध्ये लग्न केलं.

हेही वाचा :

  1. 'होय महाराजा' म्हणत प्रथमेश परब करणार विनोदाची आतषबाजी! - Prathamesh Parab
  2. दोन अभिनेत्रींबरोबर डेटिंग केल्याबद्दल अपराधी वाटत असल्याची कार्तिक आर्यननं दिली कबुली - Karthik Aaryan
  3. मन्नतच्या बाहेर शाहरुख खानच्या चाहत्यांना दिसला ईदचा चाँद, पाहा व्हिडिओ - Shahrukh Khan Eid
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.