ETV Bharat / entertainment

दोन अभिनेत्रींबरोबर डेटिंग केल्याबद्दल अपराधी वाटत असल्याची कार्तिक आर्यननं दिली कबुली - Karthik Aaryan

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 12, 2024, 5:09 PM IST

अभिनेता कार्तिक आर्यन एकेकाळी सारा अली खान आणि जान्हवी कपूरबरोबर डेटिंग करत असल्याच्या चर्चा होत्या. आता त्याबद्दल त्याला अपराधी वाटतं. पण नाव न घेता त्यानं याचा खुलासा एका मुलाखतीत केला आहे.

Karthik Aaryan
कार्तिक आर्यन

मुंबई - हिंदी चित्रपटसृष्टीतील हँडसम अभिनेता त्याच्या प्रेमसंबंधाबद्दल नेहमी मौन बाळगून असतो. त्यानं आपलं ओठ कितीही घट्ट शिवले असले तरी त्याच्या प्रेम प्रकरणाची चर्चा मात्र थांबायचं नाव घेत नाही. कार्तिक वेगवेगळ्या काळात सारा अली खान आणि जान्हवी कपूर बरोबरच्या नात्यामुळे चर्चेत राहिला होता. या दोन्ही अभिनेत्रींनी आपल्या मुलाखतीत याबद्दलची वाच्यता केली होती.

'लव्ह आज कल 2' या चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान त्याच्या आणि सारा अली खानच्या डेटिंगची चर्चा सुरू झाली. त्यानंतर 'दोस्ताना 2' च्या शूटिंग दरम्यान कार्तिक आणि जान्हवी यांच्यातील प्रेमसंबंध असल्याच्या कुजबुज आणि चर्चा रंगल्या. पण तथापि, चित्रपटाच्या सेटवर काही संघर्षामुळे, 'दोस्ताना 2' स्थगित करण्यात आला. पुढं जाऊन हा चित्रपट होऊ शकला नाही. त्यानंतर दोघांच्या नात्याच्या चर्चाही हळूहळू कमी झाल्या.

कार्तिक आर्यनने अलीकडेच नेहा धुपियाच्या 'नो फिल्टर नेहा सीझन 6' मध्ये सामील झाला होता. यावेळी त्याला दोन चांगल्या मैत्रिणींशी डेटिंग केल्याबद्दल काही पश्चाताप वाटतो का असं विचारण्यात आलं होतं. याला उत्तर देताना कार्तिकनं नेहाला सांगितलं की, "जर त्या उद्या नंतर चांगल्या मैत्रिणी झाल्या तर." भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टी अजूनही महत्त्वाच्या असल्याचं नेहाचं म्हणणं असतानाही कार्तिकने अपराधी असल्याची कबुली दिली. एखाद्या समाजिक मंचावरुन जर एखाद्या एक्सनं मर्यादा ओलांडायचा प्रयत्न केला तर काय याबद्दल कार्तिक आर्यन मस्करीनं म्हणाला, "तुमचा वर्तमान कसा आहे?"

दरम्यान, सारा आणि जान्हवी या दोघींनी 'कॉफी विथ करण सीझन 7' मध्ये हजेरी लावली आणि फिल्म इंडस्ट्रीतील त्यांच्या मैत्रीवर प्रकाश टाकला. एका हलक्या-फुलक्या भागात, होस्ट करण जोहरने साराला तिचा एक्स अजूनही महत्त्वाचा वाटतो का असं विचारले असता ती म्हणाली होती की, ''तो अनेकांचा एक्स आहे''. हे सांगताना जान्हवीला हसू आवरता आलं नव्हतं. एक्सचा संदर्भ देताना ती कार्तिक आर्यन विषयी बोलत होती.

त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सचा विचार करायचा तर कार्तिक आर्यन दिग्दर्शक कबीर खान आणि साजिद नाडियादवाला निर्मिती करत असलेल्या 'चंदू चॅम्पियन' या स्पोर्ट्स ड्रामामध्ये दिसणार आहे. 14 जून रोजी थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी शेड्यूल करण्यात आलेला हा एक आकर्षक चित्रपट आहे. या शिवाय, कार्तिक 'भूल भुलैया 3' आणि 'आशिकी 3' मध्ये स्टार म्हणून अभिनय करण्यासाठी सज्ज झाला आहे.

हेही वाचा -

  1. मन्नतच्या बाहेर शाहरुख खानच्या चाहत्यांना दिसला ईदचा चाँद, पाहा व्हिडिओ - Shahrukh Khan Eid
  2. शाहरुख चमकला, तापसी लग्नानंतर पहिल्यांदाच दिसली, स्टार स्टडेड पार्टीत इम्रान हाश्मीची मल्लिकाशी भेट - ANAND PANDIT PARTY
  3. स्टार स्टडेट ईद पार्टीमध्ये सलमान खानचा रुबाब, जल्लोष करणाऱ्या चाहत्यांना केलं अभिवादन - Salman Khan Eid
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.