ETV Bharat / entertainment

आयुष शर्मा अभिनीत 'रुस्लान' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित ; पाहा व्हिडिओ

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 12, 2024, 2:11 PM IST

Aayush Sharma's Ruslaan Teaser OUT : सलमान खानचा मेहुणा आणि अभिनेता आयुष शर्मा स्टारर 'रुस्लान' या चित्रपटाचा प्री- टीझर आज रिलीज झाला आहे. या चित्रपटामध्ये तो स्टंट करताना दिसणार आहे.

Aayush Sharma's Ruslaan Teaser OUT
आयुष शर्माच्या रुस्लान चित्रपटामधील टीझर रिलीज

मुंबई - Aayush Sharma's Ruslaan Teaser OUT : अभिनेता सलमान खानचा मेहुणा आणि अभिनेता आयुष शर्मा गेल्या वर्षभरापासून त्याच्या 'रुस्लान' या ॲक्शन चित्रपटामुळे खूप चर्चेत होता. या चित्रपटाची घोषणा 19 एप्रिल 2023 रोजी करण्यात आली होती. याशिवाय 23 फेब्रुवारीला या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली होती. आता आज 12 मार्च रोजी चित्रपटाचा प्री- टीझर रिलीज करण्यात आला आहे. यापूर्वी 'रुस्लान' चित्रपटातील आयुषचे मोशन पोस्टर रिलीज झाले होते, ज्यामध्ये तो सूट आणि बूट घालून हातात गिटार घेऊन उभा दिसत होता. आयुष शर्मा या चित्रपटामध्ये अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे.

'रुस्लान' चित्रपटाचा प्री-टीझर रिलीज : 'रुस्लान' चित्रपटामध्ये साऊथ चित्रपटांचा खलनायक जगपती बाबूही दिसणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन करण ललित भुतानी यांनी केलं आहे. 'रुस्लान'चा टिझर 1.34 मिनिटांचा आहे. या चित्रपटाच्या टीझरमध्ये आयुष अ‍ॅक्शन आणि स्टंट करत आहे. याशिवाय आयुष शर्मा स्टारर या चित्रपटामध्ये सोनाक्षी सिन्हाचा कथित बॉयफ्रेंड झहीर इक्बाल देखील दिसणार आहे. 'रुस्लान'च्या टीझरमध्ये फक्त एक डायलॉग ऐकायला मिळतो, हारायला काही नाही, जिंकण्यासाठी सारे जग आहे आणि यासोबतच टीझर संपतो. 'रुस्लान' चित्रपटात अभिनेत्री सुश्री मित्रा असणार आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

आयुष शर्मानं शेअर केली पोस्ट : या चित्रपटाचे निर्माते केके राधामोहन आहेत. हा चित्रपट 26 एप्रिल 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. 'रुस्लान' चित्रपटाचा प्री - टीझर शेअर करताना आयुषनं त्याच्या पोस्टवर लिहिलं की, ''कोणतेही नियम नाहीत, सीमा नाही, मी ॲक्शन आणि गिटारचा ताल घेऊन येत आहे, रुस्लान प्री-टीझर आऊट.'' आयुष शर्माच्या करिअरमधील हा चौथा चित्रपट आहे. यापूर्वी, आयुषनं सलमान खानबरोब 'अंतिम: द फायनल ट्रुथ' (2021) या चित्रपटात काम केलं होतं. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर फारसा व्यवसाय केला नाही. 'अंतिम: द फायनल ट्रुथ' चित्रपटात सलमाननं सरदार पोलिसाची भूमिका साकारली होती.

हेही वाचा :

  1. Krystyna Pyszkova : मिस वर्ल्ड क्रिस्टिना पिस्कोव्हाला 'या'मुळे आवडतो शाहरुख खान
  2. सीएए कायद्याची अंमलबजावणी तमिळनाडू सरकराने करु नये, थलपती विजयच्या भूमिकेनं खळबळ
  3. Pulkit And Kriti Wedding : पुलकित सम्राटचे मुंबईतील निवासस्थान दिव्यांनी उजळले; 'या' दिवशी होणार लग्न
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.