बंगळुरुच्या दोन मेट्रो स्थानकांवर शेवटच्या मैलाची कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी महिला देताहेत ई-ऑटोरिक्षा सेवा

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 28, 2024, 5:39 PM IST

Women provide e-autorickshaw service

E Autorickshaw Service : बंगळुरुच्या दोन मेट्रो स्थानकांवर शेवटच्या मैलाची कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी महिला ई-ऑटोरिक्षा सेवा देत आहेत. येलाचेनहल्ली मेट्रो स्थानकाहून द लो एमिशन ऍक्सेस टू पब्लिक ट्रान्सपोर्ट (LEAP), अल्स्टॉम या बहुराष्ट्रीय कंपनीचा एक उपक्रम आहे. प्रत्येक स्टेशनपासून 4 किमी परिघात ही सेवा दिली जाईल.

बंगळुरु (कर्नाटक) E Autorickshaw Service : बंगळुरुच्या नम्मा मेट्रो स्थानकांवरील शेवटच्या मैलाची कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी इंदिरानगर येथे महिलांनी चालवल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक ऑटो रिक्षांचा ताफा सुरू केला. येलाचेनहल्ली मेट्रो स्थानकावर द लो एमिशन ऍक्सेस टू पब्लिक ट्रान्सपोर्ट (LEAP), अल्स्टॉम या बहुराष्ट्रीय कंपनीचा एक उपक्रम आहे जो कमी कार्बन उत्सर्जनासाठी भविष्यकालीन पर्याय देतो. WRI इंडिया या संशोधन संस्थेच्या सहकार्याने हा उपक्रम राबवला जातो. ज्याचा उद्देश सरकारी धोरणे आणि नागरी समाजाच्या कृतींवर प्रभाव टाकणे आहे. बंगळुरु मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (BMRCL) आणि मेट्रोराइड यांच्या सहयोगानं हे अ‍ॅप सुरू आहे. जे फर्स्ट आणि लास्ट माईल कनेक्टिव्हिटीसाठी समर्पित आहे.

प्रत्येक स्टेशनपासून 4 किमी परिघात सेवा : ''कार्यक्रमाच्या प्रायोगिक टप्प्याचा एक भाग म्हणून, आम्ही येलाचेनहल्ली आणि इंदिरानगर स्थानकावर शेवटच्या मैलाची सेवा म्हणून इलेक्ट्रिक ऑटो तैनात करू. जे प्रत्येक स्टेशनपासून 4 किमीच्या परिघात प्रवाशांना सेवा देतील'', असे अल्स्टॉम इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक ऑलिव्हियर लॉयसन यांनी सांगितले. हा प्रायोगिक उपक्रम माजी खासदार राजीव गौडा, स्टेट इन्स्टिट्यूट फॉर द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ कर्नाटकचे उपाध्यक्ष आणि ब्रँड बंगळुरु समितीचे सदस्य यांनी सुरू केला. बीएमआरसीएलच्या कार्यकारी संचालक कल्पना कटारिया यावेळी उपस्थित होत्या. लॉईसन म्हणाले की, ''इंदिरानगरची निवड पायलट प्रोजेक्ट म्हणून करण्यात आली. कारण ते शहराच्या मध्यभागी असलेले एक व्यावसायिक केंद्र आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक होते.''

मेट्रो प्रवाशांना लक्षणीय फायदा : निवासी क्षेत्र असले तरी येलाचेनहल्ली देखील झपाट्याने मोठ्या आयटी हबमध्ये बदलत आहे. लॉयसन यांच्या मते, ''या दोन स्थानकांमधील शाश्वत वाहतूक पर्यायांमुळे शेवटच्या मैलाच्या कनेक्टिव्हिटीच्या समस्या दूर करून मेट्रो प्रवाशांना लक्षणीय फायदा होऊ शकतो. महिला चालकांना विशेषत: या कार्यक्रमांतर्गत आणण्याचे कारण म्हणजे लिंग सर्वसमावेशकता सुनिश्चित करणे आहे. ई-ऑटोच्या महिला चालकांसोबत महिलांना अधिक सुरक्षित वाटेल.''

विधवेने स्वीकारला ऑटो चालवण्याचा पर्याय : सरस्वती ही 40 वर्षीय विधवा, जिने तीन वर्षांपूर्वी आपल्या पतीच्या निधनानंतर ऑटो चालविण्याचा मार्ग स्वीकारला. ''ऑटोरिक्षा खरेदी करण्यासाठी तिला आगाऊ गुंतवणूक करावी लागली नाही'', असं तिनं सांगितलं. असं असलं तरी आणखी एक फायदा म्हणजे तिला कामाचे तास निवडता येतात. ''मी सकाळची पाळी निवडली आहे. मी दुपारी ४ पर्यंत काम पूर्ण करते. जेणेकरून माझ्या मुली कॉलेजमधून परत येण्यापूर्वी मी घरी जाऊ शकेन. मला दररोज 800 रुपये पगार मिळतो. जरी मला अनेक राइड्स मिळत नसल्या तरीही,'' असं सरस्वती म्हणाली. ''ज्यांनी तिच्या घराजवळ असलेल्या येलाचेनहल्ली मेट्रो स्टेशनवर ऑटो चालवण्याचा पर्याय निवडला आहे. आम्ही आणि आमचे भागीदार बेंगळुरूच्या लोकांच्या सोयीसाठी काम करत आहोत'', असं लॉयसन म्हणाले.

हेही वाचा:

  1. समीर वानखेडे यांच्या तक्रारीवरून IPS ज्ञानेश्वर सिंह यांच्याविरुद्ध न्यायालयात एटीआर दाखल
  2. सचिन तेंडुलकरने जगभरातील पर्यटकांना जम्मू आणि काश्मीरचा अनुभव घेण्यासाठी दिलं निमंत्रण
  3. बाप शेतकरी असल्यानं बँकांनी नाकारलं कर्ज, माळरानावर उभारली 'बाप' आयटी कंपनी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.