ETV Bharat / bharat

शॉर्टसर्किटनं घराला लागली आग; दोन सिलिंडरच्या स्फोटात पाच जणांचा होरपळून मृत्यू

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 6, 2024, 10:52 AM IST

UP Lucknow Explosion : काकोरी इथं घराला लागलेल्या आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास काकोरीतील हाता हजरत साहेब वार्डमध्ये घडली. शॉर्टसर्किटनं आग लागल्यानंतर घरातील दोन सिलिंडरचा स्फोट झाल्यानं आगीचा भडका उडाला.

UP Lucknow Explosion
शॉर्टसर्किटनं घराला लागली आग

लखनऊ UP Lucknow Explosion : घरात ठेवलेल्या दोन सिलिंडरचा स्फोट झाल्यानं पाच जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. ही घटना काकोरी शहरातील हाता हजरत साहेब वार्डमध्ये मंगळवारी रात्री साडेदहा वाजता घडली आहे. मृतांमध्ये तीन मुलांचा समावेश असून इतर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना ट्रॉमा केअर सेंट्ररमध्ये उपचारासाठी रेफर करण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन विभागाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर ही आग अटोक्यात आणली.

UP Lucknow Explosion
आग लागलेल्यानंतर घटनास्थळावर जमलेली गर्दी

शॉर्टसर्किटमुळे आग लागल्यानं झाला सिलिंडरचा स्फोट : मंगळवारी रात्री साडेदहा वाजता काकोरी इथल्या हाता हजरत साहेब वार्डमधील मुशीर उर्फ ​​पुट्टू यांच्या घरात शॉर्टसर्किटनं आग लागली. त्यामुळं घरात ठेवलेल्या सिलिंडरचा मोठा स्फोट झाला. त्यानंतर आगीनं रौद्र रुप धारण केलं. यावेळी घरात मुशीर (50) त्यांची पत्नी हुस्न बानो (45) मुशीरचा मेहुणा अजमाद यांच्या दोन मुली उमा (04) आणि हिना (02), भाची रइया (07), आदी होते. मात्र आग लागल्यानं त्यांना घराच्या बाहेर पडता आलं नाही. त्यामुळं शॉर्ट सर्किटनं आग लागल्यानंतर पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला.

UP Lucknow Explosion
शॉर्टसर्किटनं घराला लागली आग

लग्नाच्या वाढदिवशी काळाचा घाला : हाता हजरत साहेब वार्डमधील मुशीरच्या लग्नाच्या वाढदिवसाला मंगळवारी सगळे जमले होते. यावेळी रात्री दुसऱ्या मजल्यावर शॉर्टसर्किट झाल्यानं घरामध्ये आगीची ठिणगी पडली. त्यामुळं लागलेल्या आगीत घरात ठेवण्यात आलेल्या दोन सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटानं घराचं छतही कोसळलं. या आगीत मुशीर, हुस्न बानो, उमा, हिना आणि रइया यांचा होरपळून मृत्यू झाला.

UP Lucknow Explosion
शॉर्टसर्किटनं घराला लागली आग

मोठा स्फोट झाल्यानं नागरिकांना बसला हादरा : आग लागल्यानंतर घटनास्थळावर मोठी धावपळ झाली. मोठा स्फोट झाल्यानं नागरिकांना चांगलाच हादरा बसला. या आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी झाले. यात मुशीरची मुलगी ईशा (17), लकब (21), अजमाद (34), मुशीरचा भाऊ बबलूची मुलगी अनम (18 वर्षे) यांचा समावेश आहे. आगीची माहिती मिळताच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

UP Lucknow Explosion
शॉर्टसर्किटनं घराला लागली आग

हेही वाचा :

  1. आझाद नगर झोपडपट्टीला भीषण आग; अनेक घरं जळून खाक, एकाचा मृत्यू
  2. दिल्लीतील अलीपूर मार्केटमध्ये भीषण अग्नितांडव, 11 जणांचा होरपळून मृत्यू
  3. बांगलादेशच्या राजधानीत सात मजली इमारतीत अग्नितांडव; 44 जणांचा होरपळून मृत्यू
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.