ETV Bharat / bharat

जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला,  जवानाचा मृत्यू, दुसऱ्या जवानाची प्रकृती चिंताजनक - Terrorist attack Air Force convoy

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 4, 2024, 8:07 PM IST

Updated : May 5, 2024, 6:46 AM IST

Terrorist Attack Air Force Convoy : जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात शनिवारी भारतीय हवाई दलाच्या (एआयएफ) ताफ्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. गोळीबारात पाच जवान जखमी झाले आहेत.

Terrorist attack Air Force convoy
Terrorist attack Air Force convoy (Archive photo)

जम्मू आणि काश्मीर Terrorist Attack Air Force Convoy : जम्मू आणि काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात शनिवारी दहशतवाद्यांनी भारतीय हवाई दलाच्या (एआयएफ) ताफ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात भारतीय हवाई दलाच्या जवानाचा मृत्यू झाला. तर आणखी एका जवानाची प्रकृती चिंताजनक आहे. तर तिघांची प्रकृती स्थिरी असल्याचं सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यानं सांगितलं. स्थानिक राष्ट्रीय रायफल्सच्या तुकडीनं परिसरात शोधमोहिम सुरू केली आहे. सैन्यदलानं परिसरात गस्त आणि वाहनांची तपासणी वाढवली आहे.

दहशतवादी हल्ल्यात जवान जखमी : सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, "भारतीय सैन्याचे पाच जवान या हल्ल्यात जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, "सुरनकोटच्या सनई गावात गोळीबार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर भारतीय सैन्य तसंच पोलिसांचे जवान प्रभावित भागात पाठवण्यात आले आहेत. सध्या शोध मोहीम सुरू आहे."

कुठे झाला हल्ला? : शोध मोहिमेत मदत करण्यासाठी भारतीय सैन्य आणि पोलिसांच्या इतर तुकड्या या भागात पाठवण्यात आल्या आहेत. हा हल्ला सुनारकोटच्या सेनाई गावात झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला शनिवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास झाला. हल्ल्यानंतर भारतीय जवानांनीही दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिलं. उल्लेखनीय आहे की, अनंतनाग-राजौरी-पुंछ लोकसभा मतदारसंघात 25 मे रोजी मतदान होणार आहे. जखमी जवानांना उपचारासाठी उधमपूर येथील सैनिक रुग्णालयात नेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. या सर्वांवर डॉक्टरांचे विशेष पथक उपचार करत आहे.

2024 मधील सर्वात मोठा हल्ला : जम्मू-काश्मीरमधील पुंछ परिसर अनेकदा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असतो. गेल्या वर्षीही हा भाग भारतीय सैन्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा साक्षीदार होता. 2024 मधील या भागातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला मानला जात आहे. सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, भारतीय हवाई दलाचा ताफा जिल्ह्यातील सुरनकोट भागातील सनई टॉपकडे जात असताना हा हल्ला झाला. दहशतवाद्यांनी ताफ्यातील दोन वाहनांना लक्ष्य केरत गोळीबार केलाय.

बांदीपोरामध्ये दहशतवाद्यांच्या अड्ड्याचा पर्दाफाश : सुरक्षा दलांनी शुक्रवारी जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यात दहशतवाद्यांच्या एका अड्ड्याचा पर्दाफाश, तेथून शस्त्रास्त्रं आणि दारूगोळा जप्त केलाय. पोलिसांनी सांगितलं की, दहशतवाद्यांच्या अड्ड्यातून एक एके सीरीज रायफल, चार मॅगझिन आणि शस्त्रे, दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. संबंधित कलमांतर्गत अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

हे वाचलंत का :

  1. जम्मू-काश्मीरमधील पनारा गावात दहशतवाद्यांशी चकमक, ग्राम रक्षक दलाच्या जवानाला वीरमरण - Terrorist attack in Panara village
  2. पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामध्ये आत्मघाती हल्ला, 5 चिनी नागरिकांसह एक पाकिस्तानी ठार - 6 Chinese killed in suicide attack
  3. ठाण्यातील ज्यू धर्मीयांचं प्रार्थना स्थळ बॉम्बने उडवण्याच्या धमकीचा ई-मेल युरोपमधून आल्याचा खुलासा
Last Updated :May 5, 2024, 6:46 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.